-
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल नुकतंच लग्नबंधनात अडकले.
-
सुनील शेट्टी यांच्या खंडाळा इथल्या फार्महाऊसवर त्या दोघांच्या लग्नाचे विधी पार पडले.
-
त्या दोघांच्या लग्नापूर्वीच्या अनेक कार्यक्रमांचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होताना दिसत आहे.
-
क्रिकेटपटू केएल राहुल हा सुनील शेट्टीचा जावई होणार आहे.
-
सुनील शेट्टी आणि केएल राहुल यांचे एकमेकांशी फार घनिष्ठ नातं आहे.
-
ते दोघेही अनेक विषयांवर गप्पा मारताना दिसतात.
-
काही महिन्यांपूर्वी दिलेल्या एका मुलाखतीत के एल राहुलने अथिया शेट्टीचे वडील सुनिल शेट्टींबरोबर कोणत्या गोष्टीमुळे खटके उडताना दिसतात, याबद्दल भाष्य केलं होतं.
-
या मुलाखतीदरम्यान के एल राहुल म्हणाला, “सुनील शेट्टी हे क्रिकेटचे मोठे चाहते आहेत.”
-
“त्यांना क्रिकेटची फार चांगली माहितीदेखील आहे.”
-
“अनेकदा आम्ही दोघेही एकत्र बसलेले असताना क्रिकेटवर चर्चा करतो.”
-
“यामुळे अनेकदा आमच्यात वादही होतात.”
-
“त्यांना क्रिकेटविषयी फार माहिती असल्यामुळे ते नेहमीच मला तू फीट नाहीस असं सांगत असतात.”
-
“तू नीट जेवत नाही त्यामुळे तुला दुखापत होते.”
-
“ते फिटनेस आणि जीवनशैली याबद्दल फारच जागरुक असतात”, असे केएल राहुलने यावेळी सांगितले होते.
-
दरम्यान अथिया आणि केएल राहुल लग्नबंधनात अडकल्यानंतर मुंबईत रिसेप्शन पार्टीचे आयोजन करणार आहेत.
केएल राहुल आणि सुनील शेट्टीमध्ये ‘या’ कारणामुळे उडायचे खटके, स्वत:च केलेला खुलासा
अभिनेता सुनील शेट्टीची मुलगी अभिनेत्री अथिया शेट्टी आणि क्रिकेटपटू केएल राहुल नुकतंच लग्नबंधनात अडकले.
Web Title: Kl rahul opened up what he and athiya shetty father suniel shetty often argue about nrp