-
अभिनेत्री अश्विनी महांगडेने ‘स्वराज्यरक्षक संभाजी’ या मालिकेत छत्रपती संभाजी महाराज यांच्या मोठ्या बहिणीचे म्हणजेच ‘राणूबाई जाधव’ यांची भूमिका साकारली होती.
-
या मालिकेतून अश्विनीला प्रसिद्धी आणि लोकप्रियता मिळाली.
-
महाराष्ट्रात अश्विनी ‘संभाजी राजे यांची मोठी बहीण राणूबाई जाधव’ याच नावाने ओळखली जाते.
-
नुकतंच अश्विनीने ‘राणूबाई’ यांच्या पेहरावात सुंदर फोटोशूट केलं आहे.
-
यावेळी तिने पिवळ्या रंगाची नऊवारी साडी आणि सुंदर दागिने घातले आहेत.
-
दरम्यान, अश्विनीने साडीवर जो कंबरपट्टा घातला आहे, त्याने सर्वांचच लक्ष वेधून घेतलं आहे.
-
या पट्ट्यावर ‘आक्का साहेब’ लिहिलेलं आहे.
-
अश्विनीचं हे हटके फोटोशूट सोशल मीडियावर चर्चेत असून चाहत्यांना अश्विनीला पुन्हा ‘राणूबाई’ यांच्या रूपात पाहून आनंद झाला आहे.
-
सर्व फोटो : pcs_studio_official/इन्स्टाग्राम

सुप्रीम कोर्टाच्या निर्देशानंतर राजकीय हालचालींना वेग, भाजपाकडून ‘प्लॅन बी’ तयार? बावनकुळे म्हणाले…