-
लाडक्या बाप्पाच्या आगमनामुळे सर्वत्र आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे. मनोरंजन विश्वातील कलाकारांनी सुद्धा मोठ्या उत्साहात आणि जयघोषात बाप्पाचं स्वागत केलं.
-
अभिनेत्री अभिज्ञा भावे आणि तिचा नवरा मेहुल पै यांच्या घरी बाप्पासाठी साकारलेल्या आकर्षक देखाव्याने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे.
-
अभिज्ञा भावेच्या घरी यावर्षी देखाव्याच्या रुपात अक्कलकोट येथील स्वामी समर्थ महाराजांचं भव्य मंदिर साकारण्यात आलं आहे.
-
अभिज्ञाने नवऱ्यासह बाप्पाच्या स्वामीरुपी मूर्तीची मनोभावे पूजा केली.
-
अभिज्ञाने अक्कलकोट मंदिराच्या सुंदर देखाव्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत.
-
“श्री स्वामी समर्थ गणपती बाप्पा मोरया…अशक्य ही शक्य करतील स्वामी” असं कॅप्शन अभिनेत्रीने या फोटोंना दिलं आहे.
-
बाप्पासाठी साकारलेल्या सुंदर देखाव्याविषयी अभिज्ञा आणि मेहुल सांगतात, “मंदिराचा हा भव्य देखावा साकारला कारण, बाप्पाला आणि आमच्या घरी येणाऱ्या प्रत्येकाला प्रसन्न वाटलं पाहिजे हा आमचा एकमेव उद्देश होता.”
-
अभिज्ञाने शेअर केलेले फोटो सध्या सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
-
अभिज्ञा आणि मेहुलने शेअर केलेल्या फोटोंवर नेटकरी कौतुकाचा वर्षाव करत आहेत.

जरांगेंची टीका अन् फडणवीसांची सूचक प्रतिक्रिया, म्हणाले…..