-
छोट्या पडद्यावरून अभिनयाची सुरुवात करणारा लोकप्रिय अभिनेता स्वप्नील जोशी आता मनोरंजनसृष्टीतील आघाडीचा अभिनेता आहे.
-
आओ ना फिर म्हणतं स्वप्नीलनं आपल्या अभिनयाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत.
-
मालिका, चित्रपट, वेब सीरिज या तिन्ही माध्यमांमध्ये त्याने एक वेगळं स्थान निर्माण केलं आहे.
-
सध्या स्वप्नील जोशी काही चित्रपटाच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहे.
-
पण काही दिवसांपूर्वी स्वप्नीलचा एका अभिनेत्रीबरोबर लंडनमधील ब्रीजवरील रोमान्स करतानाचा व्हिडीओ तुफान व्हायरल झाला होता.
-
‘ये रातें ये मौसम’ या गाण्यावरती दोघं रोमान्स करताना पाहायला मिळाले होते.
-
पण स्वप्नीलबरोबर रोमान्स करणारी ही अभिनेत्री कोण? जाणून घ्या
-
दीप्ती देवी असं या अभिनेत्रीचं नाव आहे.
-
लवकरच दीप्ती स्वप्नीलबरोबर ‘इंद्रधनुष्य’ या चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या शुटिंगनिमित्ताने दोघं लंडनमध्ये एकत्र होते. तेव्हा दीप्ती आणि स्वप्नीलने हा रोमँटिक व्हिडीओ शूट केला होता.
-
दीप्ती ही नागराज मंजुळेंच्या ‘नाळ’, ‘घर, बंदूक, बिरयानी’ चित्रपटात पाहायला मिळाली होती. तसेच दीप्ती एकेकाळी मालिकाविश्वातील आघाडीची अभिनेत्री होती.
-
दीप्तीनं ‘अंतरपाट’, ‘मला सासू हवी’ अशा लोकप्रिय मालिकांमध्ये मुख्य भूमिका साकारली होती.
-
तसेच दीप्तीनं हिंदी मालिकेतही काम केलं आहे. ‘बडे अच्छे लगते हो’ या लोकप्रिय मालिकेत ती झळकली होती.

मराठमोळा अभिनेता पियुष रानडे तिसऱ्यांदा अडकला लग्नबंधनात, अभिनेत्री सुरुची अडारकरबरोबर घेतल्या सप्तपदी