-
मनोरंजन विश्वातील बरेच कलाकार कोकणातले आहेत. ( फोटो सौजन्य : अभिजीत केळकर इन्स्टाग्राम )
-
लागोपाठ सुट्ट्या आले की हे कलाकार वेळात वेळ काढून आवर्जून कोकणात आपल्या मूळ गावी जातात. ( फोटो सौजन्य : अभिजीत केळकर इन्स्टाग्राम )
-
मे महिन्यात कोणत्या कलाकारांनी कोकण सफर केली हे जाणून घेऊयात… ( फोटो सौजन्य : माधवी निमकर इन्स्टाग्राम )
-
अभिनेत्री कुंजिका काळवीट नुकतीच तिच्या गावी पोहोचली आहे. ( फोटो सौजन्य : कुंजिका इन्स्टाग्राम )
-
तिने गावचे सुंदर फोटो इन्स्टाग्राम स्टोरीवर शेअर केले आहेत. ( फोटो सौजन्य : कुंजिका इन्स्टाग्राम )
-
‘बिग बॉस’ फेम अभिनेता अभिजीत केळकर काही दिवसांपूर्वीच आपल्या कुटुंबीयांबरोबर कोकणात त्याच्या गावी गेला होता. ( फोटो सौजन्य : अभिजीत केळकर इन्स्टाग्राम )
-
‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ या कार्यक्रमातून सगळ्यांना खळखळून हसवणारी वनिता खरात सुद्धा काही दिवसांपूर्वी तिच्या गावी गेली होती. ( फोटो सौजन्य : वनिता खरात इन्स्टाग्राम )
-
अभिनेता निखिल बने वरचेवर चिपळूणला त्याच्या गावी जात असतो. ( फोटो सौजन्य : निखिल बने इन्स्टाग्राम )
-
‘सुख म्हणजे नक्की काय असतं’ या मालिकेतील शालिनी म्हणजेच माधवी निमकर देखील शूटिंगमधून दोन दिवस वेळ काढत तिच्या कोकणातील घरी गेली होती. ( फोटो सौजन्य : माधवी निमकर इन्स्टाग्राम )
![Saurabh Netravalkar Straight Answer About Working After T20 World Cup](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/Saurabh_Netra-2.jpg?w=300&h=200&crop=1)
सुपर ८ फेरी गाठताच सौरभ नेत्रावळकरने कंपनीत केला कॉल; मॅचनंतर काम करण्याबाबत स्पष्टच म्हणाला, “मला कुणी त्रास..”