अखेर ‘या’ चिनी मोबाइल कंपनीला मागे घ्यावं लागलं खास फिचर
- 1 / 10
चिनी स्मार्टफोन कंपनी वनप्लसनं आपल्या नव्या वनप्लस ८ सीरिजच्या स्मार्टफोनमध्ये एक विशेष कॅमेरा सेन्सर दिला होता. याच्या मदतीनं प्लॅस्टिकच्या वस्तून किंवा कपड्यांच्या आरपार पाहता येत असल्याचा दावा अनेकांकडून करण्यात आला होता.
- 2 / 10
या सेन्सरला कंपनीनं 'X-ray Vision' कॅमेरा सेन्सर असं नावं दिलं दिलं होतं. परंतु आता या सेन्सरला पूर्णपणे बॅन करण्यात आलं आहे.
- 3 / 10
वनप्लसनं OnePlus 8 Pro मध्ये इन्फ्रारेड फोटोक्रोम लेन्स दिली होती आणि त्याद्वारे काही विशेष प्लॅस्टिक आणि कपड्यांच्या आरपार पाहता येणं शक्य होतं.
- 4 / 10
कंपनीनं यापूर्वी हा सेन्सर डिसेबल केला होता. परंतु आता The Sun ने दिलेल्या माहितीनुसार हा सेन्सर कायमचा बॅन करण्यात आला आहे.
- 5 / 10
तो इन्फ्रारेड फिल्टरच्या मदतीनं फोटोंना युनिक कलर देत होता. परंतु फोनच्या रिव्ह्यू युनिट्समध्ये मात्र याचं एक खास फंक्शन समोर आलं.
- 6 / 10
अनेक इलेक्ट्रॉनिक्स आणि कपड्यांच्या आरपार याद्वारे दिसत असल्यानं अनेकांनी प्रायव्हसीबाबत शंका उपस्थित केली होती. ग्राहकांच्या प्रतिक्रियांनंतर कंपनीनं एका अपडेटद्वारे ते डिसेबल केलं होतं.
- 7 / 10
दरम्यान, वनप्लस ८ च्या ग्राहकांना नव्या अपडेटनंतर फोटोक्रोम लेन्सच्या मदतीनं फोटो काढता येणार असल्याची माहिती वनप्लसच्या जनसंपर्क अधिकाऱ्यानं The Sun शी बोलताना दिली.
- 8 / 10
सॉफ्टवेअर अपडेटनंतर पूर्वीप्रमाणे कोणत्याही प्रकारची समस्या उद्भवणार नाही. बुधवारी जारी करण्यात आलेल्या ऑफिशिअल ब्लॉग पोस्टमध्ये या अपडेटबाबत माहिती देण्यात आली.
- 9 / 10
या नव्या अपडेटसोबत उत्तम बॅटरी लाईफ आणि परफॉर्मन्समध्येही बदल करण्यात आले आहेत.
- 10 / 10
OnePlus 8 Pro च्या 'X-ray' फिचरबाबत सर्वप्रथन अमेरिकेतील टेक कमेंटेटर बेन जेस्किन यांनी माहिती दिली होती. तसंच त्यांनी यासंदर्भातील व्हिडीओदेखील शेअर केला होता.