-
गुढीपाडवा हा साडेतीन मुहूर्तापैकी एक. त्यामुळे नवीन गोष्टी सुरु करण्यासाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. या दिवशी गुढी उभारुन नव्या संकल्पाचा शुभारंभ केला जातो.
-
वैदिक पंचांगानुसार, हिंदू नववर्ष म्हणजेच गुढीपाडवा या वर्षी २२ मार्चपासून सुरू होत आहे. या दिवशी बुधवार असल्याने बुध या नवीन वर्षाचा राजा मानला जातो आणि शुक्र या वर्षाचा मंत्री.
-
या नवीन वर्षाचे नाव पिंगल असून त्याची सुरुवात दुर्मिळ योगाने होत आहे. नवीन वर्षात शनिदेव ३० वर्षांनंतर कुंभ राशीमध्ये स्थित आहेत. म्हणूनच हे हिंदू नववर्ष सर्व राशींसाठी खूप खास असणार आहे.
-
पण त्यातील ३ राशी अशा आहेत, ज्यांच्यासाठी हिंदू नववर्षापासून चांगले दिवस सुरू होण्याची शक्यता असून त्यांच्यासाठी हे वर्ष आनंददायी आणि फायदेशीर सिद्ध होऊ शकते. चला तर जाणून घेऊया कोणत्या आहेत या भाग्यशाली राशी…
-
हिंदू नववर्ष मिथुन राशीच्या लोकांसाठी आनंददायी आणि लाभदायक ठरु शकते. नियोजनबद्ध पद्धतीने काम केल्यास या लोकांना व्यवसायात चांगले यश मिळू शकते. तसेच त्यांना नशिबाची चांगली साथही मिळू शकते.
-
सूर्यदेव तुमच्या लाभाच्या ठिकाणी राहतील. त्यामुळे तुम्हाला गुंतवणुकीतून नफा मिळू शकतो, नवीन व्यवसाय करार निश्चित केले जाऊ शकतात. दुसरीकडे व्यापारी आपला व्यवसाय वाढवू शकतात.
-
सिंह राशीसाठी हिंदू नववर्ष फायदेशीर ठरू शकते. या वर्षात तुम्हाला वडिलधाऱ्या व्यक्तींकडून सहकार्य आणि लाभ मिळू शकतो. याशिवाय तुमचे धार्मिक कामात मन रमू शकते.
-
जमीनीसंदर्भातील प्रकरणं पार पडू शकतात, प्रवासाची शक्यताही आहे. जुन्या गुंतवणुकीतून फायदा होऊ शकतो. मुलाकडून काही चांगली बातमी मिळण्याची शक्यता आहे.
-
हिंदू नववर्ष या राशीतील लोकांसाठी अनुकूल ठरू शकते. या वर्षात तुम्हाला काही चांगली बातमी मिळू शकते. यासोबतच घरात आनंद आणि समाधान राहू शकते. साधनसंपत्तीत वाढ होण्यासह कामाच्या ठिकाणी सहकारी आणि अधिकारी यांचे सहकार्य आणि प्रोत्साहन मिळण्याची शक्यता आहे.
-
शिवाय तुमच्या वागण्या आणि बोलण्यातही खूप आत्मविश्वास येऊ शकतो. या नवीन वर्षात तुमची आर्थिक स्थिती मजबूत राहू शकते. व्यावसायिक लोकांना चांगली ऑर्डर मिळू शकते. ज्यामुळे भरपूर पैसा मिळू शकतो.
-
(टीप: वरील लेख हा गृहीतके व प्राप्त माहितीवर आधारित आहे)

Photos: वैष्णवी हगवणेला त्रास देणारी नणंद करिष्मा हगवणे आहे तरी कोण? पवार कुटुंबीयांबरोबरचे फोटो व्हायरल