-
गेल्या २० दिवसांपासून देशात इंधनाचे दर सतत वाढत आहेत. एकीकडे करोनाचं संकट असतानाच दुसरीकडे इंधन दरवाढीनं मात्र लोकांच्या खिशावर कात्री लागताना दिसत आहे. दरम्यान, डिझेलचे दर पेट्रोलपेक्षाही अधिक होण्याची ही पहिलीच वेळ आहे. दिल्लीत डिझेलचे दर हे पेट्रोलच्या दरापेक्षाही अधिक असल्याचं पाहायला मिळालं.
-
सध्या विरोधक हे सत्ताधारी पक्षाला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तसंच सध्याचे सत्ताधारी हे विरोधात असताना त्यांचे आणि काली कलाकारांचे पेट्रोल डिझेल दरवाढीवर काय विचार होते याची ट्विट्स नेटकऱ्यांनी शोधून काढली आहेत. अशीच काही ट्विट्स आपण पाहणार आहोत.
-
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तत्त्कालिन सरकारवर इंधनाच्या दरवाढीवरून हल्लाबोल केला होता. पेट्रोल-डिझेलच्या दरात मोठी वाढ. हे यूपीए सरकारचं अपयश आहे असं मोदी म्हणाले होते.
-
स्मृती इराणी यांनीदेखील केंद्रावर टीका केली होती. सामान्य माणसाचं यूपीए सरकार आता फक्त काही इंधन कंपन्यांसाठी काम करतं असं त्या ट्विट करून म्हणाल्या होत्या.
-
पेट्रोलचे दर ७.५ रूपयांनी वाढल्यानंतर बॉलिवूडचे ज्येष्ठ अभिनेते अमिताभ बच्चन यांनीदेखील एक जोक शेअर करत सरकारच्या निर्णयावर टीका केली होती.
-
दरवाढीवरून अनुपम खेर यांनीही सरकारवर निशाणा साधला होता. मी माझ्या ड्रायव्हरला उशीरा का आलास असा प्रश्न केला. तेव्हा त्यानं मी सायकलवरून आलो असं म्हटलं. तुझ्या मोटरसायकलला काय झालं असं मी विचारलं तेव्हा त्यानं ती शोपिस म्हणून ठेवली, असा विनोद करत त्यांनी सरकारला टोला लगावला होता.
-
अक्षय कुमारनंदेखील इंधन दरवाढीवरून तत्कालिन सरकारवर निशाणा साधला होता. मी रात्री माझ्या घरीसुद्धा जाऊ शकलो नाही, कारण इंधनाच्या किमती पुन्हा रॉकेटप्रमाणे वाढण्याआधी संपूर्ण मुंबई पेट्रोलसाठी रांगा लावत होती, असं अक्षय म्हणाला होता.
-
इंधन दरवाढीवरून अभिनेता सलमान खान यानंही टीका केली होती. पेट्रोलची काळजी करू नका. तुम्हाला मी एक गोबरचा फोटो पाठवत आहे. तुम्हाला फक्त इतकंच करायचंय की त्याचा तुम्हाला गॅस बनवायचा आहे, असं तो म्हणाला होता.
-
विवेक अग्नीहोत्री यांनीदेखील पेट्रोल डिझेलच्या दरवाढीवरून सरकारवर टीका केली होती. पेट्रोलच्या किंमती वाढवण्यामागे सायकल क्षेत्राला चालना देण्याचा उद्देश असल्याचे ते म्हणाले होते.
-
आजच्या पेट्रोलच्या दरवाढीनंतर सोनिया गांधी यांना देशाला संकटात टाकण्यात यशस्वी झाल्याचे म्हणत अशोक पंडीत यांनीही तत्कालिन सरकारवर टीका केली होती.

Hindu New Year 2025: हिंदू नववर्षात या ५ राशींचे भाग्य चमकणार! नव्या नोकरीसह मिळेल बक्कळ पैसा, जाणून घ्या कसे जाईल हे वर्ष