-
आयुर्वेदाचार्य बालाजी तांबे यांचं निधन झालं आहे. ते ८१ वर्षांचे होते. गेल्या आठवड्यात प्रकृती खालावल्याने त्यांना उपचारासाठी पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. उपचार सुरु असतानाच त्यांची प्राणज्योत मालवली. मंगळवारी संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात पत्नी वीणा, मुलगा सुनिल, संजय आणि स्नूषा व नातवंडे असा परिवार आहे.
-
बालाजी तांबे यांना लहानपणापासूनच वडिलांकडून आयुर्वेदाची शिकवण मिळाली होती.
-
बडोद्यात बालाजी तांबे यांच्या शेजारी काही वैद्य राहायचे. त्यांच्याकडून बालाजी तांबे यांनी नाडीचं मार्गदर्शन आणि औषधीकरण या दोन गोष्टी शिकता आल्या.
-
सेवा करण्यासाठी बालाजी तांबे यांनी आयुर्वेद शिकण्याचा निर्णय घेतला होता.
-
लहानपणी बालाजी तांबे हे पूजादेखील करायचे. त्यांना एका महिन्याचे दोन रुपये मिळायचे.
-
बालाजी तांबे यांनी आयुर्वेदातली आणि अभियांत्रिकीमधली पदवी एकाच वर्षी मिळवली होती.
-
बालाजी तांबे आयुर्वेदिक औषधी शास्त्र आणि आयुर्वेदिक फिजिओथेरपी यावर संशोधन केलं होतं.
-
उपजिविकेसाठी त्यांना इंजिनिअरिंग करण्याचा सल्ला देण्यात आला होता. यानंतर ते इंजिनिअर झाले.
-
सिव्हिलसाठी प्रवेश घेण्याकरिता ते गेले असता त्यांना प्राध्यापकांनी मेकॅनिकल इंजिनिअरिंग घेण्याचा सल्ला दिला.
-
शिक्षण पूर्ण करताना त्यांचं आयुर्वेदही सुरु होतं.
-
सुट्टीच्या दिवशी बालाजी तांबे भाजी मार्केटमध्ये बसायचे. एका एनज्सीकडून त्यांनी वस्तू विकण्याचं काम घेतलं होतं. रविवारी गळ्यात ट्रे अडकवून ते रस्त्यांवर आणि गल्लीतून फिरायचे.
-
एनसीसीमध्ये सी प्रमाणपत्र मिळालं असल्याने इंजिनिअरिंग झाल्यानंतर बालाजी तांबे यांना चीनची लढाई सुरु असल्याने सेकंड लेफ्टनंटचं कमिशन आलं. पण त्यांनी न जाण्याचा निर्णय घेतला. एनसीसीमुळे आपल्याला शिस्त, धैर्य मिळाल्याचं बालाजी तांबे सांगायचे.
-
वडिलांनीच बालाजी तांबे यांना ज्योतीषविद्या शिकवली.
-
१९६४ मध्ये बालाजी तांबे पुण्यात आले. १९८२ पर्यंत ते इंटिरयन डिझाईन फर्निचरचा व्यवसायदेखील केला. याशिवाय ज्या कारखान्यांना सकाळी अतिरिक्त माणसांची गरज असायची तिथे माणसं पुरवण्याचं काम त्यांनी केलं.
-
बालाजी तांबे फक्त तीन ते चार तास झोपत असल्याने त्यांना इतर कामांसाठी वेळ मिळायचा.
-
पुण्यात आल्यानंतर बालाजी तांबे यांच्या ओळखीचं कोणी नव्हतं. पण कारखान्यात भेट होत असल्याने काहीजणांची ओळख झाली होती. त्यांनी गीतेचा क्लास सुरु केला होता.
-
बालाजी तांबे यांचं त्यावेळी नुकतंच लग्न झालं होतं. त्यावेळी बालाजी तांबे यांचं वय २४ आणि पत्नीचं वय १७ होतं.
-
बालाजी तांबे ज्योतिषाचं काम करत असताना किर्लोस्करांचं ब्ल्यू डायमंड हॉटेल बंद पडलं होतं. त्यांच्या कंपनीतील जनरल मॅनेजर बालाजी तांबेंच्या ओळखीचे होते. त्यांनी हॉटेलमध्ये राहणाऱ्यांचं भविष्य पाहण्यासंबंधी विचारणा केली.
-
पण यावेळी तांबे यांनी आपण कॉस्मोलॉजी केली असल्याचं सांगत ते करण्याची दर्शवली. प्रत्येक रुममध्ये कार्ड ठेवल्यामुळे तेथील अनेकजण सल्ला घ्यायचे. यामुळे बालाजी तांबेंची काही पर्यटकांशी ओळख झाली.
-
एका दिवशी त्यांच्या दवाखान्यात २०० परदेशी नागरिक असायचे. पण यामुळे तेथील नागरिक त्रस्त झाले होते. मग बालाजी तांबे यांनी दुसरी जागा शोधण्याचं ठरवलं.
-
यानंतर बालाजी तांबे यांनी दोन बंगले भाड्याने घेतले. एका ठिकाणी राहायचं आणि दुसरीकडे ट्रेनिंग देण्याचं काम करायचे. तिथे त्यांना पहिल्यांदा परदेशातील कार्यक्रमासाठी आमंत्रण मिळालं होतं.
-
यानंतर पुन्हा त्यांनी जागा शोधण्यास सुरुवात केली. ५५ हजारात फ्लॅट घेतल्याने त्यांच्याकडे जास्त पैसा नव्हता. ते लोणावळ्यातपर्यंत पोहोचले होते. तिथे जागा मिळाल्यानंतर ती खरेदी करण्यासाठी त्यांनी पत्नीचे दागिने गहाण ठेवले. दागिने गहाण ठेऊन जागा विकत घेतली होते. मात्र तिथे पूर्ण बांधकाम करण्यासाठी पैसे नव्हते.
-
त्यामुळे सुरुवातीला येणाऱ्या रुग्णांसाठी त्यांनी एमटीडीसीचे बंगले भाड्याने घेतले होते.
-
बालाजी तांबेदेखील १९८९ पर्यंत एमटीडीसीच्या बंगल्यात राहत होते.
-
नंतर त्यांनी मिळणाऱ्या पैशातून त्यांनी आश्रमाची उभारणी केली. (सर्व फोटो : फेसबुकवरुन साभार)

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”