-
खोक्यांवरून विरोधी पक्षनेते अजित पवार आणि शिंदे गटाचे खासदार कृपाल तुमाने यांच्यात आरोप-प्रत्यारोप सुरु आहे.
-
“राज्य सरकारविरुद्ध लोकांत असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एक ओके तुम्हालाही विसरायचे नाही,” असं आवाहन अजित पवारांनी केलं होतं.
-
“राज्यात महाविकास आघाडीची सत्ता असताना केंद्राकडून अपेक्षित सहकार्य झाले नाही. राज्यात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका का घेत नाहीत,” असा सवाल करून अजित पवारांनी उपस्थित केला होता.
-
“गद्दारीला वर्ष होईल. निवडणुका घेण्यापासून त्यांना कुणी अडवलं? काय होईल ही धास्ती त्यांना वाटत आहे. विधानपरिषदेत राज्यकर्त्यांचा पराभव झाल्याने त्यांच्या पायाखालची वाळू सरकली आहे,” असे अजित पवारांनी म्हटलं होतं.
-
“राज्य सरकारविरुद्ध लोकांत असलेली खदखद नक्की बाहेर येईल. गद्दारांना शिवसेना धडा शिकवेलच. पण, पन्नास खोके एक ओके तुम्हालाही विसरायचे नाही,” असे अजित पवारांनी सांगितलं.
-
याबद्दल नागपुरात प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींनी कृपाल तुमाने यांना प्रश्न विचारला. त्यावर तुमाने म्हणाले की, “अर्थमंत्री असताना अजित पवारांनी किती खोके जमवले ते सांगावं. खोक्याशिवाय अजित पवार काम करत नव्हते.”
-
“झोपताना आणि सकाळी उठल्यावर खोके पाहणारे लोक खोक्यांवरच बोलतात,” असा गंभीर आरोप तुमाने यांनी अजित पवारांवर केला आहे.
-
यावर अजित पवारांनी प्रत्युत्तर दिलं आहे. अजित पवार म्हणाले, “तुमाने यांनी सांगावं किंवा महाराष्ट्रातल्या एका व्यक्तीने जरी सांगितलं, तर मी राजकारण सोडेन. यांनी सिद्ध करून दाखवावं. सिद्ध करून दाखवलं नाही, तर खासदाराने उद्यापासून घरी बसायचं.”
-
“पण, हा असला आरोप माझ्यावर करायचा नाही. महाराष्ट्रातल्या सगळ्या आमदारांना विचारा माझी कामाची पद्धत कशी होती ते. उगीच उचलली जीभ लावली टाळ्याला,” अशा शब्दांत अजित पवारांनी तुमानेंना खडसावलं आहे.
PHOTOS : खोक्यांवरून अजित पवार आणि शिंदे गटातील खासदारामध्ये जुंपली; नेमकं काय घडलं?
नागपुरात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमात अजित पवारांनी शिंदे गटाला लक्ष्य केलं. त्याला कृपाल तुमाने यांनी उत्तर दिलं आहे.
Web Title: Opposition leader ajit pawar reply krupal tumane over allegation money ssa