-
अभिनेता गोविंदा काही दिवसांपूर्वी राजकारणात पुन्हा सक्रिय झाला आहे.
-
काँग्रेस पक्षाला सोडचिठ्ठी दिल्यानंतर मोठ्या गॅपनंतर त्याने पुन्हा राजकारणाकडे त्याचा मोर्चा वळवला आहे.
-
२०२४ च्या लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर त्याने शिवसेना (शिंदे गट) पक्षात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत प्रवेश केला.
-
त्यानंतर तो महायुतीच्या उमेदवारांच्या नेत्यांसह प्रचारात उतरल्याचे पाहायला मिळालं होतं.
-
आता गोविंदाने नुकतीच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली आहे.
-
सुपरस्टार अभिनेत्याने स्वतःच याबद्दल इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. त्यात मोदी यांच्या भेटीचा फोटो त्याने शेअर केला आहे.
-
पोस्टमध्ये काय लिहिलं?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेतली. ही माझ्यासाठी सन्मानाची गोष्ट आहे.” -
मोदी मुंबईतील उमेदवारांच्या प्रचारासाठी आलेले असताना ही भेट घेतली असल्याचे त्याने शेअर केलेल्या पोस्टमध्ये सांगितले आहे.
-
दरम्यान काही दिवसांपूर्वी त्याने गृहमंत्री अमित शाह यांचीही भेट घेतली होती. त्याचाही फोटो गोविंदाने इंस्टाग्रामवर शेअर केला आहे.
-
(सर्व फोटो गोविंदा इन्स्टाग्राम पेजवरून साभार) हे देखील पहा- PHOTOS : डोंबिवलीमध्ये केमिकल कंपनीत भीषण स्फोट; ८ जणांचा मृत्यू! नेमकं काय घडलं, सध्…
![Eagle carrying an entire adult deer](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2024/06/New-Project-9-10.jpg?w=300&h=200&crop=1)
VIDEO: “म्हणून कुणालाच कमी समजू नका” गरुडानं नजर टाकताच हरणानं थेट डाव टाकला; शेवटी कोण पडलं कुणावर भारी?