-
लोकसभेच्या विरोधीपक्षनेते पदी बसल्यानंतर राहुल गांधी यांचे पहिले भाषण काल पार पडले. या भाषणात राहुल यांनी केंद्र सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य केल्याचे पाहायला मिळाले. त्यांनी केंद्र सरकारने लागू केलेली अग्निवीर सैनिक योजना असो किंवा अन्य नोटबंदी सारख्या भूमिका घेतल्यावरून सरकारवर खोचक टीका केली. तसेच नरेंद्र मोदी यांनी अयोध्येतून निवडणूक लढवली असती तर त्यांना पराभूत व्हाव लागलं असतं असा टोलाही त्यांनी या भाषणादरम्यान मोदींना लगावला. राहुल यांनी महादेव, येशू, बुद्ध, गुरुनानक, महावीर अशा देवतांच्या प्रतिमा दाखवत संसदेत हिंदुत्ववादी असल्याचा दावा करणाऱ्या सत्ताधारी भाजपाला हिंदुत्ववादी नसल्याचे म्हटले आहे. (Photos Source- Rahul Gandhi Social Media)
-
राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील आभार प्रस्तावादरम्यान विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी केलेल्या भाषणातील ठळक मुद्दे जाणून घेऊयात.
-
‘अग्निवीर’वरून खडाजंगी
‘अग्निवीर’ योजनेतून भरती झालेला जवान शहीद झाला तर कुटुंबीयांना नुकसानभरपाईही दिली जात नाही. अग्निवीरांना निवृत्तिवेतन नाही, सुविधाही नाहीत. नोटाबंदीप्रमाणे अग्निवीरदेखील मोदींच्या डोक्यातून आलेली कल्पना असून लष्कराची नव्हे, असा आरोप राहुल गांधींनी केला. -
अयोध्येच्या निकालावरून टोलेबाजी
फैजाबाद मतदारसंघामध्ये भाजप उमेदवाराच्या पराभवाबद्दल राहुल गांधींनी टोलेबाजी केली. ‘लोकांची दुकाने, जमिनी हिसकावून घेतल्या. त्यांना नुकसानभरपाई दिली गेली नाही. लोकांमध्ये भय निर्माण केले,’ असा आरोप गांधी यांनी केला. -
मणिपूरमधील हिंसाचारावरून टीका
मणिपूरला तर भाजपने हिंसेच्या दरीत लोटले आहे. तिथे मोदी एकदाही गेले नाहीत. शेतकऱ्यांवर भाजपने दहशतवादी असल्याचा आरोप केला. भाजपने देशाला भयाचे पॅकेज दिले आहे’, असा गंभीर आरोप गांधींनी केला. -
पंतप्रधान मोदी म्हणतात की, ते देवाचा…
मोदी म्हणतात की, ते देवाचा अवतार आहेत. कदाचित नोटाबंदीसारखे लोकविरोधी निर्णय घेण्याचा ‘आदेश’ वरून आला असेल. खटाखट-खटाखट आदेश आले असतील, त्याचे मोदींनी पालन केले असेल’, अशी उपहासात्मक टीका गांधी यांनी केली. -
नोटबंदीमुळे फक्त…
नोटाबंदीमुळे फक्त अदानी-अंबानींसारख्या उद्याोजकांचे भले झाले. छोटे उद्याोग संपले, रोजगार नष्ट झाले. जीएसटीसारखी करप्रणाली तर फक्त अदानी-अंबानीसारख्या अब्जाधीशांसाठीच केली गेली. -
‘नीट’ व ‘नेट’ पेपरफुटीवरून टीका
‘नीट’ ही व्यावसायिक नव्हे तर, व्यापारी परीक्षा झाली आहे. गुणवत्तेच्या आधारावर नव्हे तर श्रीमंतीच्या आधारावर ही व्यवस्था चालते. नीटवद्वारे श्रीमंत विद्यार्थ्यांना वैद्याकीय क्षेत्रात प्रवेश देण्यासाठी निर्माण झालेली ही कोटापद्धती आहे. ७ वर्षांमध्ये ७० वेळा पेपरफुटी झाली. या सगळ्याचा उल्लेख राष्ट्रपतींच्या अभिभाषणात नाही’, असे राहुल गांधी म्हणाले. -
दरम्यान राहुल गांधी यांच्या भाषणादरम्यान संसदेत सत्ताधाऱ्यांनी बराच गोंधळ घातल्याचे पाहायला मिळाले. खुद्द पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मी विरोधीपक्षाचे नेते जे बोलतील ते गंभीरपणे ऐकतो अशी प्रतिक्रिया दिली तर वेळोवेळी गृहमंत्री अमित शाह, संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आणि इतर एनडीएच्या न्तेयानी राहुल यांना उत्तरे दिल्याचे पाहायला मिळाले. हेही पाहा- PHOTOS : महाराष्ट्र विधान परिषदेच्या ४ जागांचा निकाल काय लागला, कोणी मारली बाजी? वाचा…

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”