तरुणांनी करोना लशीसाठी २०२२ पर्यंत थांबायचं का? WHOच्या वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांचं महत्त्वाचं विधान
- 1 / 10
वयपरत्वे प्रतिकारशक्ती कमी होते असे म्हटले जाते, पण ऑक्सफर्ड लशीचा ज्येष्ठांमध्येही चांगला परिणाम दिसून आला. करोनाविरोधात त्यांची प्रतिकारशक्ती वाढली आहे.
- 2 / 10
ऑक्सफर्ड- अॅस्ट्राझेन्का लशीला नियामक संस्थेची परवानगी मिळण्याची शक्यता वाढली आहे. पीफायझर आणि बायोएनटी टेक यांच्या लशीही आघाडीवर आहेत. (Photo: Reuters)
- 3 / 10
याच मुद्यावर जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी करोना लशीचा डोस देताना कुठल्या वयोगटाला प्राधान्य द्यायचे आणि कोणी थांबून रहायचे? यावर महत्त्वपूर्ण विधान केले आहे. (Photo: AP)
- 4 / 10
तंदुरुस्त तरुण लोकांना कदाचित २०२२ पर्यंत करोनावरील लशीचा डोस मिळणार नाही असे जागतिक आरोग्य संघटनेच्या वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन यांनी म्हटले आहे. (Photo: Reuters)
- 5 / 10
करोना व्हायरसवरील लशीचा डोस घेण्यासाठी तरुण तंदुरुस्त लोकांना २०२२ पर्यंत थांबावं लागू शकतं, असे WHO च्या मुख्य वैज्ञानिक सौम्या स्वामिनाथन जागतिक आरोग्य संघटनेच्या सोशल मीडियावरील कार्यक्रमात म्हणाल्या. सार्वजनिक आरोग्य अधिकारी वयोवृद्ध आणि धोका असलेल्या वयोगटावर लक्ष केंद्रीत करतील, असे त्या म्हणाल्या. (Photo: Reuters)
- 6 / 10
"करोनाविरोधात आघाडी राहून लढणारे तसेच आरोग्य सेवकांपासून सुरुवात करावी, यावर बरेच लोक सहमत होतील. पण त्यातही सर्वाधिक धोका कोणाला आहे, हे तुम्हाला ठरवावे लागेल. त्यानंतर वयोवृद्ध आणि इतर" असे स्वामिनाथन म्हणाल्या.
- 7 / 10
हर्ड इम्युनिटी साध्य करण्यासाठी करोनाला पसरु देणे, हे अनैतिक आहे. त्यामुळे विनाकारण मृत्यू दर वाढेल असे WHO ने म्हटले होते.
- 8 / 10
हात स्वच्छ धुणे, सोशल डिस्टन्सिंग आणि मास्क घालणे हे करोनाला रोखण्याचे उपाय आहेत.
- 9 / 10
"लोक हर्ड इम्युनिटीबद्दल बोलतात पण आपण फक्त लशीच्या अनुषंगाने त्याबद्दल बोलले पाहिजे. करोनाची साखळी मोडण्यासाठी, ७० टक्के लोकांचे लसीकरण झाले पाहिजे" असे स्वामिनाथन म्हणाल्या. (Photo: Reuters)
- 10 / 10
अमेरिका, चीन आणि ब्रिटन या देशात करोनावरील लशीच्या मानवी चाचण्या निर्णायक टप्प्यावर पोहोचल्या आहेत. तिथे पुढच्या एक ते दोन महिन्यात लसीकरण सुरु होऊ शकते.