-
जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीमधील एक नाव म्हणजे मुकेश अंबानी आणि नीता अंबानी. ते कायम त्यांच्या अलिशान लाइफस्टाइलमुळे चर्चेत असतात. नीता अंबानी या एक शिक्षिका देखील होत्या. मुंबईमधील धीरुभाई अंबानी इंटरनॅशन स्कूलची जबाबदारी देखील नीता अंबानी सांभाळतात. या सगळ्या जबाबदाऱ्या सांभाळत असताना नीता अंबानी काही दिवस फोन बंद ठेवतात आणि लोकांना भेटणे देखील टाळतात. पण त्या असं का करत असतील? असा प्रश्न अनेकांना पडला असले. चला जाणून घेऊया..
-
धीरुभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूल अतिशय लोकप्रिय आहे.
-
या शाळेत अनेक दिग्गजांची मुले शिक्षण घेत असतात.
-
बॉलिवूड अभिनेता शाहरुन खान पासून ते सचिन तेंडूलकरपर्यंत अनेकांची मुले या शाळेत शिक्षण घेताना दिसतात.
-
टाइम्स ऑफ इंडियाला दिलेल्या मुलाखतीमध्ये नीता अंबानी यांनी सांगितले की जेव्हा शाळेच्या अॅडमिशनची वेळ सुरु होते तेव्हा काही दिवस त्या लोकांना भेटणे बंद करतात.
-
केवळ लोकांना भेटणे बंद करत नाहीत तर त्यांचा फोन देखील ऑफ करुन ठेवतात.
-
शाळेचे अॅडमिशन सुरु झाल्यानंतर अनेक लोकं फोन करुन अॅडमिशनसाठी विनंती करतात. तसेच अॅडमिशन मिळवून देणे हे त्यांच्या हातात नसल्याचे त्यांनी पुढे म्हटले आहे.
-
जर हे त्यांच्या हातात असते तर त्यांनी सर्व मुलांचे अॅडमिशन करुन दिले असते असे त्या पुढे म्हटल्या.
-
प्रत्येक मुलाच्या पालकांना वाटत असते आपल्या मुलांचे शिक्षण चांगल्या शाळेत झाले पाहिजे.
-
परंतू त्यानुसार पुरेशी व्यवस्था आपल्याकडे नाही असे त्यांनी म्हटले आहे

अक्षय कुमारला व्याजासहित पैसे परत केल्यानंतर परेश रावल यांचं ‘ते’ ट्विट चर्चेत, म्हणाले, “माझ्या वकिलांनी…”