
आयपीएलच्या पंधराव्या हंगामात विराट कोहली चांगली खेळी करताना दिसत नाहीये. या हंगामात तो एकूण तीन वेळा गोल्डन डकवर बाद झाला आहे.

आयपीएलच्या इतिहासात विराट एकूण सहा वेळा गोल्डन डकवर बाद झालेला आहे.

विराटला कोणत्या गोलंदाजांनी गोल्डन डकवर म्हणजेच पहिल्याच चेंडूवर बाद केलंय हे पाहुया. (फोटो- iplt20.com)

सनरायझर्स हैदराबादच्या जगदिशा सूचित या गोलंदाजाने आयपीएल २०२२मधील ५४ व्या सामन्यात विराट कोहलीला शून्यावर बाद केलं. या हंगामात गोल्डन डकवर बाद होण्याची विराटची ही तिसरी वेळ होती. (फोटो- iplt20.com)

याच हंगामात लखनऊ सुपर जायंट्स संघाच्या दुष्मंता चमीराने विराटला गोल्डन डकवर बाद केलं. शून्यावर बाद होण्याची विराटची ही दुसरी वेळ होती. (फोटो- iplt20.com)

आयपीएलच्या १५ व्या हंगामात म्हणजेच आयपीएल २०२२ मध्ये हैदराबाद संघाच्या मार्को जानसेन या गोलंदाजाने विराट कोहलीला पहिल्याच चेंडूवर बाद केलं. (फोटो- iplt20.com)

त्यानंतर मुंबई इंडिन्सकडून खेळणाऱ्या आशिष नेहराने आयपीएल २००८ मध्ये विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद केलं होतं.

आयपीएल २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या नॅथन कुल्टर-नाईल यानेदेखील विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद केलं होतं.

आयपीएल २०१७ मध्ये कोलकाता नाईट रायडर्सच्या नॅथन कुल्टर-नाईल यानेदेखील विराट कोहलीला गोल्डन डकवर बाद केलं होतं.