
आयपीएलच्या पंधराव्या पर्वातील ६३ व्या सामन्यात राजस्थान रॉयल्सने लखनऊ सुपर जायंट्स संघावर २४ धावांनी विजय मिळवला.

या विजयानंतर राजस्थान रॉयल्सचे प्लेऑफमधील स्थान निश्चित झाले आहे.

लखनऊ-राजस्थान हा सामना अनेक अर्थांनी विशेष ठरला. या सामन्यात संजू सॅमसनने केलेल्या स्टम्पिंगची विशेष चर्चा होत आहे.

५९ धावांवर खेळत असताना दीपक हुडाने युझवेंद्र चहलने टाकलेला चेंडू टोलवण्याचा प्रयत्न केला. मात्र तो चुकला आणि चेंडू थेट यष्टीरक्षक संजू सॅमसनच्या हातात गेला.

चेंडू हातात आल्यानंतर मात्र संजू सॅमसन गोंधळला. दीपक हुडाला यष्टीचित करताना त्याच्या हातातून चेंडू सुटला.

संजू सॅमसनच्या हातातून चेंडू निसटल्यानंतर दीपक हुडाला आपला बचाव करण्याची पूर्ण संधी होती.

मात्र दीपक हुडाने कोणताही प्रयत्न केला नाही. हीच संधी साधत संजू सॅमसनने खाली पडलेला चेंडू उचलून स्टम्पिंग करण्याचा प्रयत्न केला.

यावेळी कोणतीही चूक होऊन नये म्हणून त्याने चेंडूसहित स्टंप उचलून घेतला.

दीपक हुडा बाद झाला आहे हे दाखवण्यासाठी त्याने ही कृती केली.

स्टम्पिंग करताना गोंधळ उडाल्यामुळे दीपक हुडाला जीवदान मिळते का? असे वाटत असताना संजू सॅमसमनने मात्र एकदा चूक होऊनही त्याला बाद केले.

पुढे लखनऊचे फलंदाज खास खेळी करु शकले नाहीत.

या सामन्यात राजस्थानने लखनऊवर २४ धावांनी विजय मिळवला. (वरील सर्व फोटो iplt20.com या संकेतस्थळावरुन साभार)