-
३१ मार्चपासून आयपीएल २०२३ ला सुरुवात झाली आहे. सध्या आयपीएलचा सोळावा हंगाम सुरु आहे.
-
देश-विदेशातील खेळाडू इंडियन प्रीमियरमध्ये खेळताना पाहायला मिळतात.
-
मात्र, क्रिकेटमध्ये बॅट आणि बॉल एवढीच आणखी एक महत्वाची गोष्ट असते ती म्हणजे स्टंप
-
पूर्वी क्रिकेटमध्ये साध्या स्टंपचा वापर केला जायचा
-
अलीकडे आयपीएलमध्ये एलडईडी स्टंपचा वापर मोठ्या प्रमाणात वाढला आहे.
-
एलईडी स्टंपचा शोध ऑस्ट्रेलियातील ब्रॉन्टे अकरमन यांनी लावला होता
-
आता आफ्रिकेतील झिंग विकेट सिस्टम कंपनी एलईडी स्टंप बनवते.
-
मात्र या स्टंपची किंमत किती आहे तुम्हाला माहिती आहे का?
-
हे स्टंप एखाद्या साध्या स्टंपप्रमाणे दिसत असले तरी त्याची किंमत लाखो रुपयांमध्ये आहे.
-
आयपीएलमध्ये वापरले जाणारे एलईडी स्टंप खूप महाग आहेत.
-
अनेक खेळाडूंच्या आयपीएलमधील पगारापेक्षा या स्टंपची किंमत खूप जास्त आहे.
-
इतकंच नाही, तर या स्टंपची किंमत ‘प्लेअर ऑफ द मॅच’च्या बक्षीस रकमेपेक्षा ५० ते ७० पट जास्त आहे.
-
एलईडी स्टंपचा एक संचाची किंमत सुमारे २५ ते ३५ लाख रुपये आहे.
-
म्हणजेच, एका सामन्यात वापरलेले दोन्ही संचाची किंमत ५० ते ७० लाखांच्या दरम्यान आहे.
-
गेल्या विश्वचषकात आयसीसीने एलईडी स्टंपवर सुमारे ५० लाख रुपये खर्च केल्याचे मानले जाते.
-
२०१३ च्या विश्वचषकादरम्यान हे एलईडी स्टंप प्रथम आयसीसीने वापरण्यास परवानगी दिली होती.
-
त्याअगोदर ते ऑस्ट्रेलियात होणाऱ्या प्रसिद्ध बिग बॅश लीगमध्ये वापरले गेले होते.
-
बिग बॅश लीगमधील यशानंतर २०१३ मध्ये प्रथमच त्याचा वापर करण्यात आला.
-
स्टंपमध्ये बेल्ससह उच्च दर्जाच्या बॅटरी असतात. एका बेलची किंमत एका आयफोनएवढी आहे.
-
-
बॉलचा सर्वात हलका स्पर्श देखील ओळखतात.
-
विविध देशांमध्ये एलईडी स्टंपची किंमत वेगवेगळी आहे.
-
आयपीएलमध्ये असे अनेक खेळाडू आहेत ज्यांचे आयपीएल पगार ५० लाखांपेक्षा कमी आहे.
-
त्यामुळे स्टंपची किंमत एखाद्या खेळाडूच्या वर्षभराच्या आयपीएल पगारापेक्षा जास्त आहे. (फोटो जनसत्ता, लोकसत्ता, ट्वीटर, पीटीआय, इंडियन एक्प्रेस)

शेंगदाण्याची चिक्की खायला आवडते का? फॅक्टरीमधील व्हायरल व्हिडीओ पाहून चिक्की खाण्यापूर्वी १०० वेळा विचार कराल