-
१९ ऑक्टोबर रोजी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या ICC विश्वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात विजय मिळवून ऑस्ट्रेलिया सहाव्यांदा विश्वविजेता बनला. या सामन्यातील पराभवानंतर भारतीय संघाचे सर्व खेळाडू खूप निराश झाले होते.
-
टीम इंडियाचे १२ वर्षांनंतर एकदिवसीय विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न भंगले. त्यामुळे पराभवानंतर खेळाडूंच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे निराशा दिसत होती. ते खूप निराश आणि दु:खी झाले होते.
-
सलग १० विजय मिळवल्यानंतर अंतिम फेरीत पराभवाचा सामना करणे भारतीय खेळाडूंसाठी सोपे नाही. या पराभवानंतर भारतीय कर्णधार रोहित शर्मालाही आपले अश्रू अनावर झाले होते.
-
या सामन्यानंतर वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराजही भावूक झाला होता. यावेळी जसप्रीत बुमराहने मिठी मारून त्याचे सांत्वन केले.
-
पराभवानंतर हतबल झालेल्या विराट कोहलीचे त्याची पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्माने मिठी मारून सांत्वन केले.
-
या फोटोत तुम्ही पाहू शकता की, पराभवानंतर केएल राहुल उदास होऊन जमिनीवर बसला होता.
-
७ सामन्यात २४ विकेट घेणारा मोहम्मद शमीही पराभवानंतर निराश दिसला.
-
जेव्हा पंतप्रधान नरेंद्र मोदी स्टेडियममधील क्रिकेटर्सच्या ड्रेसिंग रूममध्ये पोहोचले तेव्हा मोहम्मद शमी त्यांना मिठी मारून भावूक झाल्याचं दिसला.
-
शुबमन गिल, सूर्यकुमार यादव, जसप्रीत बुमराह आणि केएल राहुल या पराभवानंतर निराश चेहऱ्याने क्रिकेट मैदान सोडताना दिसले.
(फोटो सौजन्य : पीटीआय)
![Mother throw the child for reel woman Dance video viral on social media](https://www.loksatta.com/wp-content/uploads/2025/01/mother-Throw-the-child-reel-viral.png?w=300&h=200&crop=1)
“अगं आई ना तू?”, रील करताना मध्येच आला म्हणून पोटच्या मुलाला अक्षरश: उचलून फेकलं; काळीज पिळवटून टाकणारा VIDEO व्हायरल