
बनावट प्रोडक्ट्सचा सुळसुळाट ही लोकप्रिय ब्रँड खरेदी करताना ठरणारी सर्वात मोठी डोकेदुखी. असंच काहीसं शाओमीसोबत घडतंय.

मार्केटमध्ये फेक प्रोडक्ट्सची संख्या खूप वाढलीये त्यामुळे ग्राहकांनी शाओमीचे अॅक्सेसरीज किंवा गॅजेट खरेदी करताना खबरदारी बाळगावी अशाप्रकारचा अलर्ट कंपनीकडून जारी करण्यात आला आहे. गेल्या महिन्यात कंपनीकडून दिल्लीतील पोलिस ठाण्यात कंपनीचे बनावट प्रोडक्ट तयार केले जात असल्याची तक्रार दाखल करण्यात आली आहे.

त्यामुळे जर तुम्हीही शाओमीचं एखादं गॅजेट खरेदी करायचा विचार करत असाल तर काही गोष्टी लक्षात ठेवायला हव्यात त्यामुळे तुमची फसवणूक होणार नाही.

शाओमीची पावर बँक खरेदी करताना सिक्युरिटी कोड तपासून पाहा. सिक्युरिटी कोड mi.com वर चेक करुन प्रोडक्ट खरे आहे की खोटे हे पडताळता येणं शक्य आहे.



शाओमीच्या ओरिजनल बॅटरीवर Li-Poly हे चिन्ह दिसेल, तर फेक प्रोडक्टवर Li-ion हे चिन्ह असेल.

