बाप DSP, मुलगी झाली SP; एका जिद्दी मुलीची गोष्ट
- 1 / 10
वडील आणि मुलगी यांच्यामधील नातं हे खूप अनोखं असतं. प्रत्येक मुलीसाठी तिचे वडील हे सुपरहिरो असतात आणि एक आदर्श व्यक्ती म्हणून मुलगी वडीलांकडे पाहत असते... अशाच एका जिद्दी मुलीनं वडिलांचा आदर्श ठेवून पोलीस अधिक्षक पदवी मिळवली...
- 2 / 10
पोलीस उपाधिक्षक असणाऱ्या वडिलांनी मुलीला अभिमानाने सॅल्यूट केला तर वडिलांना सेल्यूट करताना पाहून मुलीच्या डोळ्यात आले... आजच्या सक्सेस स्टोरीमध्ये आपण मुलीच्या जिद्दीची आणि वडिलांच्या कष्टाची गोष्ट पाहणार आहोत....
- 3 / 10
तेलंगना पोलिसांत ३० PSI म्हणून काम करणाऱ्या उमा मेहश्वरा शर्मा यांना मलकानगिरी येथे पुलिस उपायुक्त म्हणून बडती मिळाली. उमा मेहश्वरा यांना एक लाडकी मुलगी आहे. आपल्या मुलीनं पोलीस आधिकारी व्हाव असं त्यांना नेहमीच वाटत होते. सिंधू शर्मानेही आपल्या वडिलांचं स्वप्न पुर्ण करण्यासाठी कठोर मेहनत आणि चिकाटीनं अभ्यास केला. बाप आणि मुलीनं तेलगंना पोलिसांत आपली सेवा दिली.
- 4 / 10
उमा मेहश्वरा शर्मा २०१९ मध्ये निवृत्त झाले. त्यांची मुलगी सिंधू शर्मा २०१४ मध्ये आयपीएस झाली. आपल्या वडिलांनाच आदर्श मानणारी सिंधू त्यांच्याच पावलावर पाऊल ठेवत पोलीस आधिकारी झाली
- 5 / 10
पोलिस अधिक्षक या पदांपर्यंत पोहचण्यासाठी सिंधूनं दिवसरात्र अभ्यास केला.
- 6 / 10
सिंधू शर्मा सध्या तेलंगानाच्या जगतियाल जिल्याची पोलिस अधीक्षक म्हणून काम पाहत आहे. (फोटो सौजन्य - Hameed Shaik Facebook )
- 7 / 10
बाप-मुलीच्या आयुष्यातील एक नाजूक क्षण नेहमीचं चर्चेत राहिला आहे. हैदराबादच्या कसेंगराकलामध्ये २०१८ मध्ये टीआरएसच्या एका रॅलीदरम्यान डीसीपी बाप आणि वरिष्ठ पोलीस आधिकारी मुलीचा आमना-सामना झाला. त्यावेळी DSP वडिलांनी SP मुलीला संपुर्ण जोश आणि गर्वानं सेल्यूट केला. फोटो सौजन्य - Praveen Kumar Swaero यांच्या फेसबुक वॉलवरून
- 8 / 10
मुलीनंही आधिकाऱ्याच्या नात्यानं सेल्यूट केला पण तिचं डोळं पाणावलं होतं. वडिलांसमोर सिंधू नतमस्तक झाली.... (फोटो सौजन्य - Thakur Charan Singh फेसबुक )
- 9 / 10
उपस्थित असणाऱ्या हजारोंच्या चेहऱ्यावर हे पाहून स्मित हास्य होतं. बाप-मुलींमधील सन्मान आणि प्रेम पाहून सर्वांच्या मनात त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेरणा निर्माण झाली होती. (फोटो सौजन्य - Ramakrishna Poosala Facebook )
- 10 / 10
उमा महेश्वर शर्मा यांनी प्रसारमाध्यमांना म्हणाले की, मुलीबरोबर काम करायलं मिळालं हे माझं सौभ्याग्य आहे. ती माझी वरिष्ठ आधिकारी असल्यामुळे मला माझं कर्तव्य पार पाडावं लागले. फोटो सौजन्य - Arepally Rahul Facebook