PHOTOS: मायेचा ओलावा! धनंजय आणि पंकजा मुंडे आले एकत्र
- 1 / 7
राजकीय स्पर्धेमुळे अनेकदा नाते-संबंधात दुरावा येतो. बीड जिल्ह्याच्या राजकारणात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे या भावा-बहिणीच्या नात्याची नेहमीच चर्चा असते. (फोटो सौजन्य- सागर कासार)
- 2 / 7
आज पुण्यात वसंतदादा शुगर इन्स्टिट्युटमध्ये उसतोड कामगारांच्या प्रश्नावर बैठक आयोजित करण्यात आली होती.
- 3 / 7
या बैठकीच्या निमित्ताने सर्वांनाच एक सुखद चित्र पाहायला मिळाले. पंकजा आणि धनंजय मुंडे हे भाऊ-बहिण उसतोड कामगारांच्या प्रश्नांवरील बैठकीच्या निमित्ताने एकत्र आले होते.
- 4 / 7
पंकजा आणि धनंजय मुंडे शेजारी-शेजारी बसले होते. त्यावेळी दोघा भावा-बहिणींमध्ये काही संवादही झाला.
- 5 / 7
पंकजा मुंडे भाजपामध्ये तर धनंजय मुंडे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आहेत. आधी दोघे भाऊ-बहिण भाजपामध्येच होते. पण राजकीय मतभेदांनंतर धनंजय मुंडे यांनी राष्ट्रवादीची वाट धरली.
- 6 / 7
मागच्यावर्षी झालेल्या २०१९ विधानसभा निवडणुकीत धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडेंचा पराभव केला.
- 7 / 7
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारही या बैठकीला उपस्थित होते.