लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र काँग्रेसला एक मोठा धक्का बसला आहे. महाविकास आघाडीमध्ये काही जागांवरून नाराजीनाट्य रंगल्यानंतर काँग्रेसमध्ये अंतर्गत धुसफूस मोठ्या प्रमाणावर आहे. त्यातच उत्तर मध्य मुंबईसाठी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी जाहीर झाल्यानंतर काँग्रेसचे नेते, माजी मंत्री नसीम खान यांनी उघडपणे आपली नाराजी व्यक्त केली आहे. काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांना पत्र लिहून आपण स्टार प्रचारक पदाचा आणि प्रचार समितीच्या सदस्यत्वाचा राजीनामा देत असल्याचे नसीम खान यांनी सांगितले. काँग्रेसने राज्यात एकही मुस्लीम उमेदवार दिला नाही, याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केली आहे.

“काँग्रेसला मुस्लीमांची मते तर हवी असतात, पण त्यांना उमेदवारी का नाही?”, असा प्रश्न उपस्थित करून नसीम खान यांनी आपली नाराजी उघड केली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार उत्तर मध्य मुंबईतून तिकीट मिळविण्यासाठी नसीम खान प्रयत्नशील होते, मात्र याठिकाणी वर्षा गायकवाड यांना उमेदवारी मिळाल्यामुळे ते नाराज झाले.

NCP MLA Amol Mitkari criticizes Congress state president MLA Nana Patole
“नाना पटोलेंनी स्वतःला संत आणि कार्यकर्त्याला नोकर समजू नये”, राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरी यांची टीका; म्हणाले, “अतिशय संतापजनक…”
satara lok sabha marathi news
अजित पवारांनी आयत्यावेळी शब्द फिरवल्याने साताऱ्यात नाराजी
MP Suresh Gopi
भाजपाच्या केंद्रीय मंत्र्याने गायले काँग्रेसचे गोडवे; इंदिरा गांधींना म्हणाले, ‘मदर ऑफ इंडिया’
Devendra Fadnavis
“गालिब ये खयाल अच्छा है! देवेंद्र फडणवीसांच्या ‘त्या’ टीकेवर काँग्रेसचे प्रत्युत्तर!
sonia gandhi
काँग्रेसच्या संसदीय पक्षाच्या अध्यक्षपदी सोनिया गांधी यांची निवड; मल्लिकार्जून खरगेंचा प्रस्ताव एकमताने मंजूर!
India Block Meeting
विरोधात बसणार की सत्तेत येणार? इंडिया आघाडीच्या बैठकीनंतर मल्लिकार्जुन खरगे म्हणाले…
Ajit Pawar
लोकसभेतील पराभवानंतर अजित पवारांचं कार्यकर्त्यांना आवाहन; म्हणाले, “अपयशाने…”,
Nana Patole On Jayant Patil
‘जयंत पाटील काँग्रेसमध्ये आले तर घेणार का?’ नाना पटोलेंचं मोठं विधान, म्हणाले, “परिवर्तनाची लाट…”

नसीम खान यांनी खरगेंना लिहिलेल्या पत्रात म्हटले की, ते लोकसभा मतदानाचे जे टप्पे उरले आहेत, त्याच्या प्रचारात सहभागी होणार नाहीत. यासाठी नसीम खान यांनी दोन कारणे दिली आहेत. पहिले म्हणजे, महाविकास आघाडीने महाराष्ट्रातील ४८ लोकसभा मतदारसंघापैकी एकाही मतदारसंघात मुस्लीम उमेदवार दिलेला नाही. दुसरे कारण म्हणजे, राज्यातील अनेक मुस्लीम संघटना, नेते आणि पक्षातील कार्यकर्ते यांना अपेक्षा होती की, काँग्रेस पक्ष तरी निदान एखाद्या मुस्लीम नेत्याला उमेदवारी देईल. पण दुर्दैवाने काँग्रेसनेही उमेदवारी दिलेली नाही.

ताजी अपडेट

नसीम खान हे नाराज असल्यामुळे एमआयएम पक्षाने त्यांना लोकसभा लढविण्याचा प्रस्ताव दिला असल्याची चर्चा आहे. थोड्याच वेळात नसीम खान पत्रकार परिषद घेऊन सविस्तर भूमिका मांडणार आहेत. दरम्यान एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांनी नसीम खान यांना एमआयएमकडून निवडणूक लढविण्याचा प्रस्ताव दिला असल्याचे सांगितले जाते