घ्या इथे विश्रांती…
- 1 / 5
देशात करोना विषाणूचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर ते आतापर्यंत डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी, पोलीस कर्मचारी असे सर्व कोविड योद्धे सातत्याने मेहनत करत आहेत. या विषाणूचा सामना करत असताना अनेक कोविड योद्ध्यांनी आपले प्राणही गमावले आहेत.
- 2 / 5
हळुहळु परिस्थिती रुळावर येत असताना काही दिवसांपूर्वी राज्यात बंद असलेली सिनेमागृह पुन्हा एकदा सुरु करण्याचा निर्णय घेण्यात आला. (सर्व फोटो - आशिष काळे)
- 3 / 5
पुण्यातील बंड गार्डन येथील आयनॉक्स सिनेमागृहात कोविड योद्ध्यांची चित्रपट पाहण्याचा आनंद घेत चार निवांत क्षण घालवले.
- 4 / 5
तब्बल ८ महिन्यांच्या कालावधीने राज्यातील सिनेमागृह सुरु झाली आहेत.
- 5 / 5
आजही डॉक्टर, वैद्यकीय अधिकारी ही मंडळी सातत्याने जीवाचं रान करत आहेत. अशावेळी त्यांना काही क्षणांची विश्रांती मिळणं गरजेचंच असतं...नाही का??