तिथेच कानाखाली आवाज काढला असता, परत बोलायची हिंमत नसती झाली -राज ठाकरे
- 1 / 10
राज्यात सध्या शेतकरी आंदोलनाबरोबरच एल्गार परिषदेचा मुद्दाही गाजत आहे. अलिगढ मुस्लिम विद्यापीठाचा माजी विद्यार्थी नेता शरजील उस्मानी याने हिंदू धर्माबद्दल वादग्रस्त विधान केलं होतं. त्यावरून वादंग निर्माण झालेला असून, याच मुद्द्यावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी संताप व्यक्त करत फटकारलं आहे. (सर्व छायाचित्रं संग्रहित)
- 2 / 10
राज ठाकरे यांनी शनिवारी माध्यमांशी संवाद साधला होता. त्यावेळी त्यांनी शेतकरी आंदोलन, वाढीव वीज बिल यासह विविध मुद्द्यांवर भाष्य केलं होतं. भूमिका मांडली होती.
- 3 / 10
यावेळी राज ठाकरे यांना रिहानाच्या ट्विटनंतर सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटबदद्लही प्रश्न विचारण्यात आला होता. त्यावरून त्यांनी मोदी सरकारला सुनावलं होतं.
- 4 / 10
पत्रकारांनी पुण्यात झालेल्या एल्गार परिषदेबद्दल प्रश्न विचारला होता. एल्गार परिषदेत उस्मानी याने केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे, असं माध्यमांच्या प्रतिनिधींनी म्हटलं होतं.
- 5 / 10
या मुद्द्यावर बोलताना राज ठाकरे म्हणाले,"कारवाई काय करायची? त्याला तिकडेच सडकवायला पाहिजे होतं. दोन कानाखाली आवाज काढले असते तिकडेच, परत बोलायची हिंमत नसती झाली त्याची." (सर्व छायाचित्रं संग्रहित)
- 6 / 10
"मला फक्त प्रश्न पडतोय की कुणी वातावरण तयार करण्यासाठी बोलायला लावलं का? कारण हे सध्या अशाच प्रकारचं राजकारण सुरू आहे. कुणाला तरी बोलायला लावायचं. मग पुढे आहेच," असं म्हणत राज ठाकरेंनी सुनावलं.
- 7 / 10
यावेळी राज यांनी सेलिब्रिटींनी केलेल्या ट्विटवर सरकारला फटकारलं होतं. “सरकारनं या गोष्टी करायला नको. ही सगळी खूप मोठी लोकं आहेत. या लोकांना अशा प्रकारचं ट्विट करायला सांगणं. एकाच हॅशटॅगवर सगळ्या लोकांची ट्विट येणं. ही खूपच मोठी माणसं आहेत. त्यांना सरकारने अशा गोष्टींमध्ये पडायला लावू नये."
- 8 / 10
"हा सरकारच्या धोरणाचा विषय आहे. हा काही देशाचा विषय नाही. काही चीनमधून संकट आलंय. पाकिस्तानमधून आलंय. शेतकऱ्यांचं संकट आहेच मोठं, पण या सर्व गोष्टींसाठी सर्व लोकांना… त्या अक्षय कुमारवरती आटपायचा ना विषय," असं राज म्हणाले होते.
- 9 / 10
"लता मंगेशकर, सचिन तेंडुलकर ही भारतरत्नं आहेत. खूप मोठी माणसं आहेत. त्यांना अशा गोष्टी करायला सांगणं… ती साधी माणसं आहेत. सरकारनं त्यांना सांगितलं, त्यांनी ट्विट केलं, पण आज जे ट्रोल होतंय आज त्यांच्यावरच येतंय,” असं म्हणत राज ठाकरे यांनी सरकारला फटकारलं होतं.
- 10 / 10
याचवेळी राज यांनी वीज बिला मुद्द्यावरही मोठा गौप्यस्फोट केला होता. मी शरद पवारांना पत्र पाठवल्यानंतर अदानी पवारांना भेटून गेले. त्यानंतर सरकारनं वाढी वीज बिलं माफ करणार नसल्याची घोषणा केली." असं सांगत राज यांनी बैठकीबद्दल संशय व्यक्त केला होता. (सर्व छायाचित्रं संग्रहित)