१८ लाखांचे तिकिट, गोल्ड प्लेटेड ताटांमध्ये जेवण अन्..; अशी आहे महाराजा एक्स्प्रेस
- 1 / 15
महाराजा एक्स्प्रेसमधील प्रवास हा जगातील सर्वात लग्झरी आणि महागड्या ट्रेन प्रवासांपैकी एक मानला जातो. याची भव्यता एवढी आहे की पंचतारांकित हॉटेलही त्यासमोर फिक आहे. (सर्व फोटो - महाराजा रेल्वे संकेतस्थळ)
- 2 / 15
या ट्रेनला अनेकदा वर्ल्ड ट्रॅव्हल अवॉर्डही देण्यात आला आहे. या ट्रेननं प्रवास करण्यासाठी तुम्हाला १८ लाख रुपयांपर्यंत खर्च करावे लागतील. अनेकदा तिकिटाच्या दरात चढ उतार होत असतात. पाहुया या रेल्वेची एक झलक.
- 3 / 15
प्रवाशांना लक्झरी सेवा पुरवण्यासाठी २०१० मध्ये महाराजा एक्स्प्रेससची सुरूवात करण्यात आली होती. एक किलोमीटर लांब असलेल्या या रेल्वे गाडीत एकूण २३ डबे आहेत.
- 4 / 15
या २३ डब्यांमध्ये केवळ ८८ प्रवशांना प्रवास करता येतो. राजेशाही अनुभव घेता यावा आणि ट्रेनचा आतील आनंद लुटता यावा यासाठी प्रवाशांची संख्या कमी ठेवण्यात आली आहे.
- 5 / 15
दिल्ली, आग्रा, बिकानेर, फतेहपूर सिक्री, ओरछा, खजुराहो, जयपूर, जोधपूर, उदयपूर, रणथंबोर, वाराणसी आणि मुंबई या मार्गावर ही ट्रेन धावते.
- 6 / 15
प्रवासादरम्यान ताज महाल पॅलेस हॉटेल, राजस्थान सिटी पॅलेस, रामबाग पॅलेस हॉटेल यांसह अनेक पंचतारांकित हॉटेल्सची सुविधा देण्यात येते.
- 7 / 15
सध्या महाराजा एक्स्प्रेसमध्ये प्रवशांसाठई ४ पॅकेज उपलब्ध करून देण्यात येत आहेत. त्यापैकी सर्व पॅकेजेसचे दर निरनिराळे आहेत.
- 8 / 15
आतमधून ही ट्रेन एका शाही हॉटेलप्रमाणे दिसते. ट्रेनमध्ये ऑनबोर्ड रेस्त्रां, डिलक्स केबिन, ज्युनिअर सूट. लाऊंज बार आणि अन्य लक्झरी सुविधा पुरवण्यात येतात.
- 9 / 15
ट्रेनमध्ये ८८ प्रवशांसाठी ४३ केबिन आहेत. यापैकी २० डिलक्स, १८ ज्यूनिअर सूट, ४ सूट आणि १ ग्रँड प्रेसिडेन्शिअल सूट आहे. प्रेसिडेन्शिअल सूट हे एकमेव असं केबिन आहे ज्यात ४ जणांना प्रवास करण्याची मुभा आहे. अन्य केबिनमध्ये केवळ दोन जणांना प्रवास करता येतो.
- 10 / 15
डिलक्स केबिनमध्ये एसी, एलसीडी टिव्ही, आंतरराष्ट्रीय फोनची सुविधा, इलेक्ट्रॉनिक लॉकर, कपाट, वॉशरूमची सुविधा देण्यात येते. याचे कमाल दर ४ लाख ८३ हजार २४० रूपये इतके आहेत.
- 11 / 15
ज्यूनिअर सूटमध्ये प्रवशांसाठी बाहेरील दृश्य पाहण्यासाठी मोठ्या खिडक्या देण्यात आल्या आहेत. डिलक्स केबिनच्या तुलनेत यात जागा आधिक असते. याचे कमाल भाडे ७ लाख ५३ हजार ८२० रूपये इतके आहे.
- 12 / 15
या ट्रेनमध्ये असलेल्या ४ सूट्समध्ये अन्य केबिनप्रमाणे सर्व सुविधा उपलब्ध आहेत. त्याव्यतिरिक्त आतमध्ये मिनी बार, बाथटब, स्मोक अलार्म आणि डॉक्टरांची सुविधा देण्यात येते. या सूटचं सर्वाधिक भाडं १० लाख ५१ हजार ८४० रूपये आहे.
- 13 / 15
या ट्रेनमध्ये केवळ एकच प्रेसिडेन्शिअल सूट आहे. त्यामध्ये २ वेगवेगळ्या बेडरूम आणि बाथरूमचीही सुविधा मिळते. यामध्ये बटलर, बार आणि अन्य सुविधाही देण्यात येतात.
- 14 / 15
महाराजा एक्स्प्रेसमध्ये दोन रेस्त्रोंदेखील आहेत. त्यांचं नाव मोर महल आणि रंग महल आहे. या हॉटेलमध्ये गोल्ड प्लेटेड ताटांमध्ये जेवण दिलं जातं.
- 15 / 15
प्रवासादरम्यान कंटाळा आल्यास यामध्ये आणखी एका केबिनचा लाभ घेता येऊ शकतो. त्याचं नाव सफारी बार असं ठेवण्यात आलं आहे. यामध्ये अनेक गेम्सचा आनंद लुटता येऊ शकतो.