-
राजकुमार हिरानी दिग्दर्शित ‘३ इडियट्स’ या चित्रपट हा अनेक अर्थांनी खास आहे. अगदी कमाईचे विक्रम असो किंवा चित्रपटाची कथा, गाणी किंवा अगदी कलाकार सर्व काही छान जुळून आल्यानंतर एक उत्तम कलाकृती कशी तयार होते याचे उदाहरण म्हणजे ‘३ इडियट्स’. याच चित्रपटामध्ये बोमन इराणी यांनीही महाविद्यालयाच्या डीनची भूमिका अगदी चोख पार पडली. विरु सहस्त्रबुद्धे या भूमिकेमध्ये अनेक पैलू होते. मात्र यापैकी खास लक्षात राहिलेली शैली म्हणजे दोन्ही हातांनी लिहिण्याची कला सहस्त्रबुद्धेंकडे होती असं चित्रपटात दाखवण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य: फेसबुक)
-
अर्थात विरु सहस्त्रबुद्धेंप्रमाणे एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिणारे काहीजण जगात नक्कीच आहेत. मात्र अशापद्धतीने दोन्ही हातांनी लिहिण्याचा अनोखा विक्रम मंगळुरूमधील एका मुलीने केला आहे. या मुलीचे नाव आहे आदि स्वरूपा. (फोटो सौजन्य: Twitter/AHindinews वरुन साभार)
-
आदि ही अवघ्या १६ वर्षांची आहे. मात्र एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिण्याच्या आपल्याने कौशल्याच्या जोरावर तीने एका मिनिटात सर्वाधिक शब्द लिहिण्याचा विक्रम केला आहे. (फोटो सौजन्य: Twitter/AHindinews वरुन साभार)
-
आदिच्या या विक्रमाची नोंद, 'एक्सक्लुझिव वर्ल्ड रिकॉर्ड'मध्ये करण्यात आली आहे. याबद्दलचं प्रमाणपत्रही आदिला देण्यात आलं आहे. (फोटो सौजन्य: Twitter/AHindinews वरुन साभार)
-
"मी एकाच वेळी दोन्ही हातांनी लिहिताना एका मिनिटांमध्ये ४० शब्द लिहिले. हा विक्रम आहे. मी माझ्या या कौशल्यावर बरीच मेहनत घेतली आहे. मी आता एका मिनिटांमध्ये ५० शब्द लिहू शकते असा मला विश्वास आहे," असं आदिने एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितलं. (फोटो सौजन्य: Twitter/AHindinews वरुन साभार)

Maharashtra News Updates : “तुम्ही लढा, आम्ही कपडे सांभाळतो”, संजय राऊतांची मोदींवर खरमरीत टीका