
लॉकडाउनदरम्यान गेल्या तीन-चार महिन्यांमध्ये मुकेश अंबानी यांच्या रिलायन्स इंडस्ट्रिजमध्ये अनेक बड्या कंपन्यांनी मोठी गुंतवणूक केली. त्यांच्या रिलायन्स जिओच्या व्यवसायातही वाढ झाली, त्यामुळे मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत वाढ होऊन अब्जाधीश मुकेश अंबानी जगातील पाचवे सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. (फोटो सौजन्य : सोशल मीडियावरुन)

म्हणजे मुकेश अंबांनींकडील संपत्तीबद्दल सोप्या शब्दात सांगायचे झाल्यास जेवढ्या वेळात एखादी व्यक्ती कपभर चहा पिते तेवढ्या वेळात मुकेश अंबांनीची संपत्ती लाखो रुपयांनी वाढलेली असते. याच अंबानींच्या संपत्तीसंदर्भातील आकडेवारी आपण या गॅलरीमध्ये पाहणार आहोत.

रिलायन्स जिओ आणि फेसबुक यांच्यात एप्रिल महिन्यात झालेल्या कराराचा फायदा रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांना झाला. फेसबुकसोबत झालेल्या करारामुळे त्यांच्या संपत्तीत मोठी वाढ झाली. या करारानंतर ते आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती झाले. त्यांनी जॅक मा यांना पछाडत पुन्हा एकदा पहिल्या स्थानावर झेप घेतली.

मागील दहा वर्षांमध्ये मुकेश अंबांनींची संपत्ती तिप्पटीने वाढली आहे. २०१० साली मुकेश अंबांनींची अंदाजित संपत्ती २७ बिलियन डॉलर इतकी होती. तर आता २०२० साली ही संपत्ती ८० बिलियन डॉलर इतकी आहे. (फोटो सौजन्य : PTI)

मुकेश अंबानी आपल्या कुटुंबासहीत मुंबईतील २७ मजली इमारतीत राहतात. ही संपूर्ण इमारतच त्यांचे घर असून त्याचे नाव एंटीलिया आहे. हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे महागडे घर आहे. (फोटो सौजन्य : Reuters/Danish Siddiqui)

मुकेश अंबानींच्या या घरामध्ये हेल्थ स्पा, सलून, बॉलरुम, स्नो रूम, खासगी चित्रपटगृह, ३ स्विमिंग पूलसह अनेक सुविधा आहेत. या भव्य इमारतीत १६८ गाड्या पार्क केल्या जाऊ शकतील एवढी जागा असून या घराच्या छतावर हेलिकॉप्टर उतरविण्यासाठी तीन हेलिपॅड्स देखील आहेत.लंडनमधील ‘बकिंघम पॅलेस’ जगातील सर्वात महागडे आणि अलिशान घर आहे.

श्रीमंत भारतीयांच्या यादी पहिल्या क्रमांकावर असणाऱ्या मुकेश अंबानींकडील संपत्ती ही दुसऱ्या क्रमांकावरील व्यक्तीपेक्षा चौपट आहे. राधा किशन दमानी असं भारतातील दुसऱ्या सर्वात श्रीमंत व्यक्तीचे नाव आहे. राधा किशन यांची एकूण संपती १७.८ बिलियन डॉलर इतकी असल्याचे सांगण्यात येते. (फोटो सौजन्य : Reuters)

२००७ मध्ये मुकेश अंबानी यांनी एअरबस ३१९ हे जेट नीता अंबानी यांना गिफ्ट म्हणून दिले होते. या जेटची किंमत ७५ कोटी रुपये इतकी आहे.

मुकेश अंबानी यांनी पत्नीला एका वाढदिवसाला Maybach 62 ही अलिशान कार गिफ्ट केली. या कारची किंमत ५ कोटी १५ लाख रुपये आहे.

मुकेश अंबानी BMW 760 Li ही सर्वात महागड्या गाड्यांपैकी एक गाडी आहे. या गाडीची किंमत तब्बल १० कोटींच्या आसपास आहे. ही गाडी बुलेटप्रूफ असून, या गाडीमध्ये कॉन्फरंस सेंटर, आणि टीव्ही स्क्रीन इत्यादी सोयी आहेत. भारतातील सर्वात महागडी गाडी आहे.

मुकेश अंबानी यांच्याकडे असणाऱ्या यॉटची किंमत एक मिलियन डॉलर पेक्षा जास्त आहे. या यॉटमध्ये सर्व सोयीसुविधा आहेत. एकप्रकारचा पाण्यावर तरंगणारा महलच आहे. ५८ मीटर लांबी आणि ३८ मीटर उंची असणारे यॉटवर सोलर ग्लास रूफ आहे. आतमध्ये पियानो बार, लाउंजसह अनेक शाही सुविधा आहेत. (फोटो सौजन्य : PTI)

२०१८ साली अंबानी यांची मुलगी इशाच्या लग्नाला जगभरातून मोठ्या व्यक्तींनी हजेरी लावली होती. रिपोर्टनुसार, या शाही विवाहला ७०० कोटी रूपयांचा खर्च करण्यात आला होता. हिलरी क्लिंटन यांच्यासोबतचा हा निता आणि मुकेश अंबानींचा फोटो (फोटो सौजन्य : PTI)

मुकेश अंबानींच्या एकूण संपत्तीचा हिशोब केल्यास ते एका मिनीटामध्ये २३ लाखांहून अधिक रुपये कमावतात. (फोटो सौजन्य : PTI)

सन २०१९ मध्ये मुकेश अंबानींच्या संपत्तीमध्ये रोज ३३ कोटी रुपयांची भर पडल्याचे दिसत आहे. (फोटो सौजन्य : सोशल मीडियावरुन)

जागतिक बँकेच्या माहितीप्रमाणे अफगाणिस्तान, बोत्सवाना आणि बोस्नियासारख्या देशांचे एकूण राष्ट्रीय सकल उत्पन्न एकत्र केलं तरी ते अंबानींच्या संपत्तीपेक्षा कमीच आहे. (फोटो सौजन्य : PTI)

एंकदरितच ही आकडेवारी पाहता भविष्यातही अंबानींची संपत्ती वाढत जाणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. कंपॅरिझननं केलेल्या एका सर्वेक्षणानुसातर मुकेश अंबानी हे २०३३ पर्यंत ट्रिलिअनर बनतील असा अंदाज आहे. तर २०२६ मध्ये अॅमेझॉनचे संस्थापन आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जेफ बेझोस हे ट्रिलिअनर बनणार असल्याचं या अहवालात म्हटलं आहे. (फोटो सौजन्य : Reuters)