-
उत्तर प्रदेशात सध्या ग्रामपंचायत निवडणुकीचे वारे वाहत असून सर्व पक्ष त्यासाठी तयारी करत आहेत. (All Photos: Instagram)
-
मात्र यावेळी एका उमेदवाराची जोरदार चर्चा रंगली आहे.
-
ही उमेदवार दुसरा तिसरा कोणी नसून मॉडेल आणि ब्युटी क्वीन दीक्षा सिंग आहे.
-
दीक्षा सिंग यानिमित्ताने राजकारणात प्रवेश करणार आहे.
-
२०१५ मध्ये सौंदर्य स्पर्धेची रनर अप राहिलेली दीक्षा सिंग थेट ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत उतरली आहे.
-
दीक्षा सिंग जौनपूर जिल्ह्यातील बक्षा मतदारसंघातून निवडणूक लढणार आहे.
-
पण दीक्षाच्या निवडणूक लढण्यामागाचं कारण वेगळं आहे.
-
या जागेसाठी दीक्षा सिंगचे वडील जितेंद्र सिंह तयारी करत होते. पण ही जागा महिलांसाठी राखीव घोषित करण्यात आली आण दीक्षाचा राजकारणात प्रवेश झाला.
-
दीक्षाचे वडील गेल्या अनेक दिवसांपासून निवडणुकीची तयारी करत होते. पण शेवटच्या क्षणी जागा महिलांसाठी राखीव घोषित झाली.
-
दीक्षा सिंगसमोर भाजपा नेते चंद्रसिंग यांच्या सुनेचं आव्हान असणार आहे.
-
जौनपूरमधील पंचायत निवडणूक १५ एप्रिलला पार पडणार आहे.
-
दीक्षा सिंगचे वडील जितेंद्र सिंह यांचा गोवा आणि राजस्थानमध्ये वाहतुकीचा व्यवसाय आहे. तर आई गृहिणी आहे.
-
दीक्षा २०१५ मध्ये मिस इंडिया स्पर्धेत सहभागी झाली होती. यावेळी ती अखेरच्या फेरीपर्यंत पोहोचली होती.
-
दीक्षा बक्षा येथील चित्तोरी गावाची रहिवासी आहे.
-
दीक्षाचं तिसरीपर्यंतचं शिक्षण गावातच झालं, त्यानंतर ती मुंबई आणि नंतर गोव्यात शिफ्ट झाली.
-
दीक्षाने गोव्यातील कॉलेजमधून आपलं शिक्षण पूर्ण केलं.
-
दीक्षाचे इन्स्टाग्रामवर दोन लाखांहून अधिक फॉलोअर्स आहेत. ती नेहमी फोटोशूट करुन आपले फोटो पोस्ट करत असते.
-
दीक्षाने काही जाहिराती कंपन्यांसाठी काम केलं आहे.
-
याशिवाय 'रब्बा मेहर करी' या गाण्यात ती दिसली होती.
-
तसंच नेहा कक्करच्या 'तेरी आँखो मे' गाण्यातही झळकली होती.

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल