-
गणेशोत्सव म्हटला की मूर्तीसोबत देखावा पाहण्यासाठीही लोकांची लगबग असते.
-
एरव्ही सार्वजनिक मंडळांमध्ये दिसणारे देखावे आता घरांमध्येही दिसतात.
-
अशाच एका मुंबईतील घरगुती देखाव्याची सध्या चर्चा आहे.
-
या देखाव्यातून गणेशभक्ताने मुंबईकर आणि खासकरुन परळ, दादरमधील नागरिकांच्या समस्येला वाचा फोडली आहे.
-
या देखाव्यात हिंदमाता परिसरात पावसामुळे साचलेले पाणी आणि त्यात अडकलेली वाहने असे दृश्य साकारण्यात आले आहे.
-
मुंबईतील प्रतीक्षानगर येथे राहणाऱ्या फ्रँक्लीन पॉल याने यंदा गणेशोत्सवासाठी हा अभिनव देखावा साकारला आहे.
-
फ्रँक्लीन पॉल याची ही संकल्पना असून उदय राजेंद्र गोटावले यांनी मूर्ती साकारली आहे.
-
केतन दुदवडकर, अद्वैत सापते हे या देखाव्याचे कलाकार आहेत.
-
मुंबईत थोडा जरी पाऊस पडला तरी हिंदमाता परिसरात लगेच पाणी साचतं.
-
नेहमी निर्माण होणाऱ्या या समस्येवर दरवर्षी चर्चा होते, मात्र तोडगा निघत नाही.
-
नेमकी हीच गोष्ट या देखाव्यातून दाखवण्यात आली आहे.
-
पर्यावरणाच्या बाबतीत हलगर्जीपणा दाखवून विकास होऊ शकतो. त्या विकासामुळे आर्थिक भरभराटही होईल. पण ही भरभराट विनाशाकडे वाटचाल करेल. तसं होऊन द्यायचं नसेल तर वेळीच सावध व्हा असा संदेश या देखाव्यातून देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.
-
या देखाव्याचे फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे.
-
हा देखावा पाहण्यासाठी अनेकजण गर्दी करत असून कौतुकाची थाप देत आहेत.
-
(सर्व फोटो : गणेश शिर्सेकर, इंडियन एक्सप्रेस)

“देवा असा अपघात नको रे” भरधाव कारने आईला फुटबॉलसारखे उडवले, लेकराचा आक्रोश, VIDEO पाहून तुमचाही थरकाप उडेल