-
अरेंज्ड मॅरेज या संकल्पनेनुसार विवाहबद्ध होणाऱ्या जोडप्यांची निवड त्यांच्या कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा समाजातील वडीलधाऱ्यांद्वारे केली जाते. ही प्रथा अनेक देशांतील संस्कृतींमध्ये शतकानुशतके आहे आणि सामाजिक, सांस्कृतिक आणि धार्मिक कारणांसाठी अरेंज्ड विवाहांना प्राधान्य दिले जाते.
-
वर्ल्ड पॉप्युलेशन रिव्ह्यूनुसार, जगातील अनेक देशांमध्ये अरेंज्ड मॅरेज ही एक अगदी सामान्य प्रथा आहे. या यादीत भारताचे नाव पहिल्या क्रमांकावर आहे. या यादीतील टॉप ९ मध्ये कोणते देश आहेत ते जाणून घेऊया.
-
१. भारतात सर्वाधिक प्रमाणात अरेंज्ड विवाह होतात.
-
२. भारतानंतर चीनचा क्रमांक लागतो. येथेही सामान्यपणे अरेंज्ड विवाह होताना दिसतात.
-
३. चीन पाठोपाठ पाकिस्तानमध्ये सर्वाधिक प्रमाणात अरेंज्ड मॅरेजस् होतात.
-
४. जपानमध्येही अरेंज्ड मॅरेज करण्यासच प्राधान्य दिले जाते.
-
५. इराणमध्येही अशीच स्थिती आहे.
-
६. इराक देशातही जवळपास सारखीच स्थिती आढळून येते.
-
७. इंडोनेशियामध्येही सर्वाधिक प्रमाणात अरेंज्ड मॅरेज होत असतात.
-
८. तर बांगलादेशमध्येही सारखीच स्थिती पाहायला मिळते.
-
९. दक्षिण कोरियामध्ये देखील विवाह करण्यासाठी अरेंज्ड संकल्पनेला पहिली पसंती दिली जाते.
(Photos Source: Pexels)
Photos : जगातील ‘या’ देशांमध्ये सर्वाधिक अरेंज्ड मॅरेज होतात, भारत पहिल्या क्रमांकावर!
Arranged Marriage Countries 2024: अरेंज्ड मॅरेजमध्ये विवाहासाठी कुटुंबातील सदस्य, नातेवाईक किंवा समाजातील वडीलधाऱ्यांद्वारे जोडीदार निवडले जातात. यामध्ये वैयक्तिक पसंतीपेक्षा सामाजिक आणि कौटुंबिक मूल्यांना अधिक महत्त्व दिले जाते.
Web Title: Countries with most arranged marriages 2024 spl