गुरुवारी भारतीय जनता पार्टीच्या केंद्रीय निवडणूक समितीने आगामी राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशमधील आठव्या उमेदवाराचे नाव जाहीर केले. भाजपा नेते संजय सेठ यांना राज्यसभेची उमेदवारी देण्यात आली. २७ फेब्रुवारी रोजी होणाऱ्या राज्यसभा निवडणुकीसाठी उत्तर प्रदेशातील १० खासदार वरिष्ठ सदनात पाठविण्यात येणार आहेत. आताचे संख्याबळ लक्षात घेता, सत्ताधारी भाजपा आणि विरोधी समाजवादी पक्ष (एसपी) यांच्याकडे निवडून येण्यासाठी विधानसभेत पुरेसे सदस्य आहेत. प्रत्येक उमेदवाराला ३७ मतांची आवश्यकता आहे. उत्तर प्रदेशमध्ये भाजपा सात आणि समाजवादी पक्ष तीन असे गणित ठरले आहे. परंतु, भाजपाने आपला आठवा उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उतरवल्याने समाजवादी पक्ष अडचणीत सापडला आहे.

कोण आहेत संजय सेठ? त्यांच्या उमेदवारीचा सपावर काय परिणाम होईल?

राज्यसभा निवडणुकीत भाजपाच्या आठव्या उमेदवाराचे नाव घोषित करण्यात आल्याने क्रॉस व्होटिंग होण्याची शक्यता वर्तविली जात आहे. विशेष म्हणजे एकेकाळी संजय सेठ हे अखिलेश यादव यांचे निकटवर्तीय मानले जायचे. २०१६ ते २०१९ दरम्यान वरिष्ठ सदनात त्यांनी समाजवादी पक्षाचा खासदार म्हणूनही काम पाहिले आहे. राज्यसभेचा कार्यकाळ संपण्याच्या तीन महिनेआधीच ६ ऑगस्ट २०१९ रोजी त्यांनी समाजवादी पक्षाचा राजीनामा दिला. आणि काहीच दिवसांनंतर त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश केला.

babajani durrani, Jayant Patil,
परभणीत अजित पवार गटाला धक्का ? बाबाजानी दुर्राणी यांच्या प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या भेटीनंतर तर्कवितर्क
Why Bengal BJP chief wants north Bengal to be merged with Northeast
“उत्तर बंगालमधील जिल्हे मिळून स्वतंत्र राज्य करा”; भाजपा नेत्यांच्या मागणीमागे काय आहे राजकारण?
fadanvis
शिवसेना, राष्ट्रवादीच्या नेत्यांविरोधात तक्रारी, भाजपच्या बैठकीत लोकसभा निकालावर मंथन; जागावाटप लवकर करण्याची मागणी
Anger about allies in BJP meeting  Complaints of Shiv Sena  NCP not working in Lok Sabha Mumbai
भाजपच्या बैठकीत मित्रपक्षांविषयी नाराजी; शिवसेना, राष्ट्रवादीने लोकसभेत काम न केल्याच्या तक्रारी
Thane Congress president, thane,
ठाणे काँग्रेस अध्यक्ष बदलाच्या चर्चेला पूर्णविराम, अफवा पसरवून गटबाजी करणाऱ्यांवर कारवाईचे प्रदेशाध्यक्षाचे संकेत
akola , eknath shinde, eknath shinde news,
पश्चिम वऱ्हाडाला शिवसेना शिंदे गटाकडून बळ, केंद्रीय राज्यमंत्री व विधान परिषद सदस्यत्व
Loksatta anvyarth The highest number of independent candidates were elected in the National Assembly elections of Pakistan despite the party electoral recognition being revoked
अन्वयार्थ: पाक लोकशाही… जात्यातून सुपात!
Ajit pawar, NCP, assembly election 2024, survey, 288 constituencies
२८८ मतदारसंघांचे सर्वेक्षण केल्यानंतरच जागांवर दावा, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधान

समाजवादी पक्षासोबत जुने संबंध

संजय सेठ हे लखनौमधील अग्रगण्य रिअल इस्टेट व्यावसायिकांपैकी एक मानले जातात. १९८५ मध्ये त्यांनी एसएएस हॉटेल्स अॅण्ड प्रॉपर्टीज प्रायव्हेट लिमिटेड ही कंपनी स्थापन केली; ज्याचे नाव बदलून नंतर शालिमार कॉर्पोरेशन असे करण्यात आले. २००७ ते २०१२ दरम्यान मायावती यांच्या नेतृत्वातील बसपा सरकारच्या काळात त्यांनी डॉ. बी. आर. आंबेडकर गोमती विहार पार्क (भाग-१ व भाग-२), हजरतगंजमध्ये मोठे पार्किंग, रायबरेली रोडजवळील वृंदावन कॉलनीतील पार्किंग यांसारखे मोठमोठे प्रकल्प हाती घेतले. त्यांच्या कंपनीचा लखनौ येथील जय प्रकाश नारायण इंटरनॅशनल सेंटर (जेपीएनआयसी) हा प्रकल्प निधीअभावी सात वर्षांपासून रखडला आहे.

संजय सेठ हे व्यावसायिक क्षेत्रासह राजकीय क्षेत्रातदेखील तितकेच सक्रिय आहेत. समाजवादी पक्षाचे संस्थापक दिवंगत मुलायम सिंह यादव आणि त्यांचे पुत्र व अखिलेश यांचे सावत्र भाऊ प्रतीक यादव यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध होते. संजय सेठ यांनी मुलायम सिंह आणि अखिलेश यांच्यासाठी अनेक घरे बांधली असे समाजवादी पक्षाच्या एका नेत्याने सांगितले. २०१५ साली विधान परिषद निवडणुकीसाठी संजय सेठ यांचे नाव पुढे करण्यात आले होते; परंतु उत्तर प्रदेशचे तत्कालीन राज्यपाल राम नाईक यांनी इतर चार जणांसह संजय सेठ यांचे नाव नामांकनास पात्र नसल्याचे सांगत नाकारले.

या काळात यादव कुटुंब अंतर्गत कलहाचा सामना करत होते. २८ डिसेंबर २०१६ रोजी अखिलेश यादव यांनी २०१७ च्या विधानसभा निवडणुकीसाठी २३५ उमेदवारांची यादी तयार केली होती. मुलायम सिंह यांनी एक दिवसापूर्वी जाहीर केलेल्या यादीतील अनेकांची नावे अखिलेश यांच्या यादीत नव्हती. दुसऱ्या दिवशी मुलायम यांनी अखिलेश यांना शिस्तभंग केलयाच्या आरोपाखाली सहा वर्षांसाठी पक्षातून काढून टाकले. तीन दिवसांनंतर सपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीने एकमताने अखिलेश यांची पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड केली.

हेही वाचा : दुबईत पंतप्रधान मोदींच्या हस्ते ‘भारत मार्ट’चे उद्घाटन; काय आहे भारत मार्ट? भारताला याचा कसा होईल फायदा?

सपामधील या मंथनादरम्यान संजय सेठ यांनी अखिलेश यांचा विश्वास मिळवला, सेठ यांना पक्षनिष्ठेचे बक्षीसही मिळाले. अखिलेश यांनी पक्षप्रमुख म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर संजय सेठ पक्षाचे राष्ट्रीय कोषाध्यक्ष झाले. २०१९ च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी बसपा आणि सपा यांना एकत्र आणण्यात संजय सेठ यांची महत्त्वपूर्ण भूमिका होती, असे सांगितले जाते. त्या वेळेस दोन पक्षांनी यूपीमध्ये महाआघाडीचा भाग म्हणून एकत्र निवडणुका लढवल्या होत्या. यामुळेच एकेकाळी समाजवादी पक्षाचे निष्ठावंत समजल्या जाणार्‍या संजय सेठ यांना भाजपाने राज्यसभेची उमेदवारी दिल्याचे बोलले जात आहे. संजय सेठ यांना विरोधी पक्षातूनही समर्थन मिळण्याची शक्यता आहे; ज्याचा थेट परिणाम अखिलेश यादव यांच्या नेतृत्वातील समाजवादी पक्षावर होईल.