गुजरातमध्ये विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील मतदानासाठी जेमतेम आठवडा उरला असून भाजपाच्या प्रचाराने अस्मिता, ध्रुवीकरणाचे अपेक्षित वळण घेतले आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बनावट मजार आणि अतिक्रमणाचा मुद्दा प्रचारात आणला आहे. आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा यांनी राहुल गांधी सद्दाम हुसेनसारखे दिसत असल्याचे विधान करून त्यांची मुस्लिम देशांतील नेत्याशी तुलना केली आहे. तर, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या पाठोपाठ भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांनी ‘भारत जोडो’ यात्रेतील मेधा पाटकर यांच्या सहभागाचा मुद्दा उपस्थित करून गुजराती अस्मितेला हात घातला आहे.

हेही वाचा- भाजपकेंद्री धोरण समितीमुळे वस्रोद्योगात अपेक्षांना धुमारे

Devendra Fadnavis, Asserts Victory, Victory of mahayuti, mahayuti Victory India's Progress, Yavatmal Washim Campaign, Yavatmal Washim lok sabha seat, lok sabha 2024, election 2024,
“देशाच्या प्रगतीसाठी महायुतीचा विजय हाच योग्य पर्याय,” राळेगाव येथील सभेत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आवाहन
२०१९ ते २०२४ मोदींचा मराठवाड्यातील पट पूर्णपणे बदलला !
girl brother attempt to kidnapped midc police saved abducted youth life
कारमध्ये कोंबून प्रेयसीच्या भावाचे अपहरण….पण,  खुनाचा प्रयत्न करताच….
uddhav thackeray criticized pm narendra modi
“काश्मीर ते मणिपूरपर्यंत खदखद अन् हिंसाचार, तरीही भारतीय नीरोचे…”; ‘त्या’ दाव्यावरून ठाकरे गटाची पंतप्रधान मोदींवर टीका!

बेट द्वारका हे कृष्णाचे निवासस्थान मानले जाते. या बेट द्वारकामध्ये प्रचारसभेत बोलताना अमित शहांनी कथित बनावट मजारींविरोधात आणि तिथल्या अतिक्रमणांविरोधात भाजपने ‘स्वच्छता मोहीम’ सुरू केल्याचा मुद्दा अधोरेखित केला. मजारींविरोधात झालेल्या कारवायांना काँग्रेसने विरोध केला असला तरी, बनावट मजारींच्या अतिक्रमणांविरोधात कारवाई केली जाणारच. मजारींवर कारवाई करताना कोणाला घाबरण्याची गरज नाही, असे शहा म्हणाले.

आसामचे मुख्यमंत्री हिमंत बिस्वा-शर्मा यांनी काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची तुलना इराकचे तत्कालीन हुकुमशहा आणि मुस्लिम देशांतील प्रमुख नेते सद्दाम हुसेन यांच्याशी केली. ‘भारत जोडो’ यात्रेमधील दाढी वाढवलेले राहुल गांधी यांना बघून शर्मा यांनी ही टिप्पणी केली. राहुल गांधी यांचा चेहरा बदललेला आहे. चेहरामोहरा बदलायचाच असेल तर, वल्लभभाई पटेल यांच्यासारखा नाहीतर, अगदी पंडित नेहरूंसारखा तरी करायचा. राहुल गांधी महात्मा गांधीसारखे दिसले असते तरी चालले असते, पण, ते सद्दाम हुसेनसारखे दिसू लागले आहेत, असे शर्मा म्हणाले. अमित शहा आणि हिमंत बिस्वा-शर्मा यांच्यासारख्या भाजपनेत्यांच्या विधानांमधून भाजपचा प्रचार हिंदू-मुस्लिम ध्रुवीकरणाकडे जात असल्याचे दिसू लागले आहे.

हेही वाचा- Gujarat elections 2022 : गुजरातच्या निवडणुकीत नेहरू-पटेल मुद्दा केंद्रस्थानी; भाजपाच्या ‘त्या’ आरोपात कितपत तथ्य?

गुजरातच्या निवडणूक प्रचारात राज्याच्या अस्मितेचा मुद्दा तुलनेत उशिरा मांडला गेला. ‘भारत जोडो’ यात्रेच्या महाराष्ट्रातील टप्प्यात ‘नर्मदा बचाव आंदोलना’च्या नेत्या मेधा पाटकरही सहभागी झाल्या होत्या. राहुल गांधी यांच्यासह मेधा पाटकर पदयात्रा करत असल्याची छायाचित्रे प्रसिद्ध झाल्यानंतर, गुजरातच्या विकासाच्या आड येणाऱ्या मेधा पाटकरांना काँग्रेसने पदयात्रेत स्थान दिल्याची टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली. गुजरातविरोधी नेत्यांना यात्रेमध्ये स्थान देणारा काँग्रेस गुजरातविरोधी असल्याचा प्रचार भाजपनेत्यांनी सुरू केला आहे. मोदी यांच्यानंतर नड्डा यांनीही बुधवारी जुनागडमध्ये भाजप कार्यकर्त्यांशी संवाद साधताना गुजराती अस्मितेचा मुद्दा उपस्थित केला. काँग्रेसला भारत जोडायचा नाही तर तोडायचा आहे. राहुल गांधी हे पदयात्रेमध्ये मेधा पाटकर यांच्यासोबत दिसत असतील तर, गुजरातबद्दल काँग्रेसच्या मनात नेमके काय आहे हे समजू शकते, असे नड्डा म्हणाले. काँग्रेस हा राज्याच्या अस्मितेविरोधात असल्याचा प्रचार भाजपकडून केला जात आहे.

हेही वाचा- Gujarat Elections : …म्हणून भाजपाच्या तिकीटावर निवडणूक जिंकणं हार्दिक पटेलांसाठी असणार मोठं आव्हान!

गुजरातमध्ये २७ वर्षे भाजपची सत्ता असून मतदारांनी भाजपला मते दिली नाहीत तर पुन्हा काँग्रेसचे काळे राज्य सुरू होऊ शकते, अशी भीतीही प्रचारांमधून भाजपचे नेते व्यक्त करत आहेत. गोध्रा वगैरे दंगलींची पार्श्वभूमी असलेल्या मतदारसंघांमध्ये काँग्रेस काळातील दंगलीची आठवण करून दिली जात आहे. काँग्रेसच्या काळात दंगली होत होत्या, विकासाकडे कधीही लक्ष दिले गेले नाही. भाजपची सत्ता आल्यावर मात्र विकासाला प्राधान्य दिले गेले, असा दावा केला जात आहे. गुजरातमध्ये निवडणूक प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यामध्ये भाजपला विजयासाठी आदिवासी मतदारसंघांसह शहरी भागांमध्ये अस्मिता आणि ध्रुवीकरणाची मदत घ्यावी लागत असल्याचे दिसत आहे.