ठाणे : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेसाठी ठाणे सोडल्यामुळे नाराज झालेल्या नवी मुंबईतील गणेश नाईक यांच्या समर्थकांनी शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांच्या ठाण्यातील मिरवणुकीकडे शुक्रवारी पाठ फिरविल्याचे दिसून आले. म्हस्के यांनी मोठे शक्तीप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी जुन्या ठाण्यातून काढण्यात आलेल्या मिरवणुकीत शिंदेसेनेसह भाजप, राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाचे कार्यकर्तेही सहभागी झाले होते. उमेदवारी अर्ज भरण्यासाठी गणेश नाईक कुटुंबियांसह जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित राहीले खरे मात्र त्यांनी मिरवणुकीत सहभागी होण्याचे टाळले. महत्वाचे म्हणजे नवी मुंबईत नाईक समर्थक पदाधिकारी, माजी नगरसेवकांनी या संपूर्ण प्रक्रियेकडे पाठ फिरविल्याचे दिसून आले.

ठाणे लोकसभा मतदारसंघावरुन गेल्या दीड महिन्यांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि भाजप नेत्यांमध्ये कमालीची रस्सीखेच सुरु होती. या मतदारसंघात भाजपची ताकद वाढल्याचे दाखले देत येथून नाईकांचे ज्येष्ठ पुत्र माजी खासदार संजीव नाईक यांच्यासाठी भाजपने आग्रह धरला होता. मुख्यमंत्र्यांसाठी ठाण्याची जागा प्रतिष्ठेची मानली जाते. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत ही जागा सोडणार नाही अशी भूमीका मुख्यमंत्र्यांनी घेतली होती. याशिवाय संजीव नाईक यांची उमेदवारीही शिंदेसेनेला अमान्य होती. उमेदवारी अर्ज भरण्याची अखेरची तारीख ज‌वळ येताच हा मतदारसंघ शिंदेसेनेला सुटणार हे स्पष्ट झाले. या मतदारसंघातून मुख्यमंत्र्यांनी ठाण्याचे माजी महापौर नरेश म्हस्के यांना उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे नाराज झालेल्या नाईक समर्थकांनी गुरुवारी त्यांच्या देखतच मुख्यमंत्र्यांसह उमेदवार म्हस्के यांच्याविरोधात आक्रमक भूमीका घेतल्याचे दिसून आले. यावेळी भाजपच्या स्थानिक कार्यकारणीतील बहुसंख्य पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे प्रदेश कार्यालयात जमा केले.

cold war, MLA Kisan Kathore, Kapil Patil, Bhiwandi Lok sabha constituency, murbad
पराभवानतंरही कपिल पाटील यांच्या बैठकांच्या धडाक्यामुळे किसन कथोरे समर्थक अस्वस्थ
Karnataka Emta, officials,
VIDEO : काँग्रेस खासदार धानोरकर यांच्या भावाकडून कर्नाटक एम्टाच्या अधिकाऱ्यांना शिवीगाळ, कार्यकर्त्यांकडून मारहाण
mohan bhagwat
सरसंघचालक मोहन भागवतांची योगी आदित्यनाथ यांच्याशी बंद दाराआड चर्चा; लोकसभा निकालांनंतर बैठक, अनेकांच्या भुवया उंचावल्या!
Mahayuti base remains Analysis by Devendra Fadnavis
महायुतीचा जनाधार कायम! देवेंद्र फडणवीस यांचे विश्लेषण, उद्धव यांना सहानुभूती नसल्याचा दावा
sugarcane, Raju Shetty,
मागील हंगामातील उसाचे प्रतिटन १०० रुपये द्या – राजू शेट्टी यांची मागणी; आचारसंहितेनंतर बैठकीचे आयोजन – पालकमंत्री मुश्रीफ
Bruno dog, MLA PN Patil,
आमदार पी. एन. पाटील यांच्या पाठोपाठ लाडका ब्रुनो श्वान अंतरला; कुत्र्याची अनोखी स्वामीनिष्ठा
Hasan Mushrif pune car crash
Pune Accident : आरोपीच्या रक्ताच्या नमुन्यात फेरफार, डॉक्टरांच्या अटकेनंतर काँग्रेसचा हसन मुश्रीफांवर आरोप; म्हणाले, “अपघाताच्या रात्री…”
Rohit pawar on Tanaji Sawant
“भ्रष्टाचाराच्या खेकड्याने आता नांग्या…”, अधिकाऱ्याच्या पत्रावरून रोहित पवारांची शिंदेंच्या मंत्र्यांवर टीका

हेही वाचा : अमेठीतले काँग्रेस उमेदवार केएल शर्मा कोण आहेत? राजीव गांधींशी काय आहे कनेक्शन?

समर्थक गैरहजर, नाईकांची उपस्थिती

गुरुवारी झालेल्या नाराजी नाट्यानंतर गणेश नाईक आणि त्यांचे कुटुंबिय शुक्रवारी कोणती भूमीका घेतात याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. राजीनामा सादर करुन नवी मुंबईत नाईक यांच्या भेटीसाठी गुरुवारी सायंकाळी परतलेले पदाधिकारी, समर्थकांनी म्हस्के यांच्या मिरवणुकीत सहभागी होणार नाही अशी भूमीका घेतली होती. यावेळी नाईक यांनी मात्र आपण पक्षाचे नेते या नात्याने म्हस्के यांचा अर्ज भरताना उपस्थित राहू अशी भूमिका पदाधिकाऱ्यांकडे स्पष्ट केली होती. शुक्रवारी सकाळी म्हस्के यांच्यासाठी काढण्यात आलेल्या मिरवणुकीत सुरुवातीपासून भाजप आणि राष्ट्रवादी काॅग्रेस पक्षाच्या अजित पवार गटाचे नेते, कार्यकर्ते सहभागी झाल्याचे दिसले. गणेश नाईक मात्र या मिरवणुकीत सहभागी नव्हते. अखेर जिल्हाधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करताना नाईक त्यांचे पुत्र संदीप, संजीव आणि पुतणे सागर नाईक यांच्यासह उपस्थित झाले. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या समवेत म्हस्के यांचा अर्ज दाखल करण्यासाठी गणेश नाईक आणि संजीव नाईक जातीने उपस्थिती होते. यावेळी बेलापूरच्या आमदार मंदा म्हात्रे यांचीही उपस्थिती होती. ‘नरेंद्र मोदी यांना पंतप्रधान करण्यासाठी राज्यातील प्रत्येक जागा महत्वाची असल्याने आपण ठाण्यात उपस्थित राहीलो’, असे गणेश नाईक यांनी यावेळी स्पष्ट केले. असे असले तरी म्हस्के यांच्या मिरवणुकीत नाईक समर्थक असलेले पदाधिकारी, माजी नगरसेवक मात्र अनुपस्थितीत असल्याचे पहायला मिळाले. गुरुवारी रात्रीच नाईकांच्या उपस्थितीत अनेक पदाधिकाऱ्यांनी ही भूमीका मांडली होती. त्यानुसार आम्ही ठाण्यात अर्ज दाखल करण्यासाठी आलो नाही, अशी माहिती एका नाईक समर्थक माजी नगरसेवकाने लोकसत्ताला दिली.

हेही वाचा : लैंगिक अत्याचाराचे आरोप असलेल्या ब्रिजभूषण सिंहांऐवजी मुलाला तिकीट; कुस्तीपटूंच्या आंदोलनाचा परिणाम?

नाराजी दूर होईल

ठाणे लोकसभा मतदारसंघ भाजपला सुटला नसल्याने कार्यकर्त्यांमध्ये नाराजी आहे आणि गुरुवारी ती व्यक्तही झाली. मात्र ही नाराजी दूर होईल आणि कार्यकर्ते नरेंद्र मोदी यांच्या विजयासाठी एकदिलाने काम करतील.

गणेश नाईक, नेते भाजप