गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने हरियाणामध्ये काँग्रेसचा धुव्वा उडवल्यानंतर आता पाच वर्षांनी पुन्हा एकदा काँग्रेसनं राज्यातील सर्व १० मतदारसंघ जिंकण्यासाठी कंबर कसली आहे. मुस्लिम वगळता राज्यातील सर्व प्रमुख समुदायांच्या पाठिंब्यावर काँग्रेसने राज्यातील सर्व प्रभावशाली जातींमधील समतोल राखण्याचा प्रयत्न केला आहे. काँग्रेसने गुरुवारी (२५ एप्रिल) रात्री उशिरा हरियाणातील लोकसभेच्या आठ जागांसाठी उमेदवार जाहीर केले. कुमारी शैलजा यांना सिरसामधून, दीपेंद्र सिंह हुडा यांना रोहतकमधून, वरुण चौधरी यांना अंबालामधून, जय प्रकाश यांना हिसारमधून, दिव्यांशु बुधीराजा यांना कर्नालमधून, सतपाल ब्रह्मचारी यांना सोनीपतमधून, राव दान सिंग यांना भिवानी-महेंद्रगडमधून आणि महेंद्र प्रताप यांना फरीदाबाद लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. काँग्रेसने जाट, दलित आणि इतर मागासवर्गीयांना (ओबीसी) प्रत्येकी दोन तिकिटे दिली आहेत. पंजाबी आणि ब्राह्मण समाजाला प्रत्येकी एक तिकीट देण्यात आले आहे.

हिसारचे भाजपाचे खासदार ब्रिजेंद्र सिंह यांना तिकीट मिळालेले नाही. तसेच गुरुग्राम जागेची घोषणा अद्याप व्हायची बाकी आहे. भिवानीच्या जागेवर किरण चौधरी यांची निराशा झाली आहे. त्या आपली मुलगी श्रुती चौधरी हिच्यासाठी तिकीट मागत होत्या. याशिवाय बृजेंद्र सिंह हिसारमधून तिकीट मागत होते. माजी मुख्यमंत्री खट्टर यांच्यासमोर काँग्रेसने प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष दिव्यांशु बुधीराजा यांना कर्नाल मतदारसंघातून उमेदवारी दिली आहे. हरियाणात लोकसभेच्या दहा जागा आहेत. या सर्व जागांसाठी २५ मे रोजी एकाच टप्प्यात मतदान होणार आहे. गेल्या लोकसभा निवडणुकीत भाजपाने सर्व जागा जिंकल्या होत्या.यावेळी काँग्रेस हरियाणात आम आदमी पार्टीबरोबर आघाडी करून निवडणूक लढवत आहे. काँग्रेसने आघाडीत नऊ जागा स्वत:साठी ठेवल्या आहेत. कुरुक्षेत्र ही एक जागा आम आदमी पक्षाला देण्यात आली आहे, जिथून सुशील कुमार गुप्ता रिंगणात आहेत.

Lok Sabha Elections 2024 Narendra Modi
एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला
What Poonam Mahajan Said?
भाजपाने तिकिट कापल्यानंतर पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाल्या, “मी…”
hathras gangrape bjp loksabha (1)
हाथरस बलात्कार प्रकरणामुळे भाजपा अडचणीत? काँग्रेस-सपा भाजपाचा बालेकिल्ला भेदणार का?
Shiv Sena Thackeray Group Leader Chandrakant Khaire Announces His Political Retirement
मोठी बातमी! चंद्रकांत खैरेंनी केली राजकीय निवृत्तीची घोषणा, म्हणाले, “अंबादास दानवे..”

हेही वाचाः एका दगडात दोन पक्षी, मोदी आणि भाजपा दोघांनी ४०० पार जागांचा अर्थच बदलला

सिरसा मतदारसंघातील उमेदवार कुमारी शैलजा आणि अंबाला मतदारसंघातील वरुण चौधरी अनुसूचित जाती (SC) मधून येतात. दीपेंद्र हुडा (रोहतक) आणि जय प्रकाश (हिसार) हे जाट समाजाचे प्रतिनिधित्व करतात. राव दान सिंग (भिवानी-महेंद्रगड) आणि महेंद्र प्रताप (फरिदाबाद) हे दोन ओबीसी उमेदवार आहेत. सतपाल ब्रह्मचारी (सोनीपत) हे ब्राह्मण उमेदवार आहेत आणि दिव्यांशु बुद्धीराजा (कर्नाल) हे पंजाबी समुदायाचे उमेदवार आहेत. गुर्जर समाजातील भाजपाचे फरीदाबादचे उमेदवार कृष्ण पाल गुर्जर यांच्या विरोधात काँग्रेसने गुर्जर असलेले महेंद्र प्रताप यांना उमेदवारी दिली आहे. भिवानीमध्ये भाजपाचे जाट उमेदवार धरमबीर यांच्याशी टक्कर देण्यासाठी अहिर समाजातील राव दान सिंह यांना पक्षाने पसंती दिली आहे.

सिरसा आणि अंबाला मतदारसंघातून भाजपाने अशोक तन्वर आणि बंटो कटारिया यांना उमेदवारी दिली आहे. रोहतक आणि हिस्सार हे दोन्ही जाटबहुल मतदारसंघ आहेत, परंतु तेथे पंजाबी आणि ब्राह्मण समुदायाची संख्याही लक्षणीय आहे. रोहतकमध्ये भाजपाचे अरविंद शर्मा हे दीपेंद्र हुड्डा यांच्याशी लढणार आहेत. हिसारमध्ये भाजपाचे रणजित सिंह आणि जयप्रकाश यांच्यात जाट विरुद्ध जाट अशी लढत होणार आहे. सोनीपतमध्ये भाजपाने ब्राह्मण उमेदवार मोहनलाल बडोली यांना उमेदवारी दिली आहे, तर काँग्रेसने सतपाल ब्रह्मचारी यांना उमेदवारी दिली आहे, दोन्ही पक्षातील उमेदवार एकाच समाजाचे प्रतिनिधित्व करतात. २०१९ मध्ये काँग्रेसने सोनीपतमध्ये भूपिंदर हुडा, रोहतकमध्ये दीपेंद्र, कुरुक्षेत्रमध्ये निर्मल सिंग आणि भिवानी-महेंद्रगड मतदारसंघात श्रुती चौधरी या चार जाट उमेदवारांना उभे केले होते. अंबाला आणि सिरसा येथून शैलजा आणि तन्वर हे दोन उमेदवार होते. दोघेही आता सिरसामध्ये एकमेकांविरुद्ध निवडणूक लढवत आहेत. हिसारमधील भव्य बिश्नोई यांना उमेदवारी देण्यात आली असून,बिश्नोई व्होट बँक काबीज करण्यासाठी भाजपानं त्यांना मैदानात उतरवल्याची चर्चा आहे. २०११ च्या जनगणनेनुसार, हरियाणाच्या लोकसंख्येच्या २०.१ टक्के अनुसूचित जाती आहेत, तर OBC लोकसंख्येच्या ४०.९४ टक्के आहेत. जाट समाजाची लोकसंख्या अंदाजे २७ टक्के आहे.

हेही वाचाः काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात भाजपाच्या ‘निर्भयादीदी’ची जादू; कोण आहेत श्रीरूपा मित्रा-चौधरी?

लोकनीती आणि दिल्ली स्थित सेंटर फॉर डेव्हलपिंग सोसायटीज (CSDS) च्या संशोधन संस्थेच्या मते, उच्च जातींमध्ये काँग्रेसच्या १८ टक्क्यांच्या तुलनेत भाजपाला ७४ टक्के मते मिळाली होती. दुसरीकडे जाटांमध्ये काँग्रेसला ३३ टक्के मतांच्या तुलनेत भाजपाला ५० टक्के मते मिळाली. ओबीसींमध्ये भाजपाला ७३ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला २२ टक्के मते मिळाली. भाजपाला अनुसूचित जातींमध्ये ५८ टक्के मते मिळाली, तर काँग्रेसला समुदायातील २८ टक्के मते मिळाली. काँग्रेसला ८६ टक्के मुस्लिम मते मिळाली, जी तिची पारंपरिक वोट बँक आहे, तर भाजपाला समाजातील केवळ १४ टक्के मते मिळाली.

गेल्या लोकसभा निवडणुकीचे निकाल काय?

२०१९ मध्ये फक्त रोहतकमध्ये निकराची लढत पाहायला मिळाली, ज्यामध्ये भाजपाचे अरविंद शर्मा यांनी दीपेंद्र हुडा यांचा केवळ ७५०३ मतांनी पराभव केला. उर्वरित जागांवर भाजपाने मोठ्या फरकाने विजय मिळवला. कर्नालमध्ये संजय भाटिया ६.८ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले, तर फरिदाबादमध्ये क्रिशन पाल गुर्जर ६.३८ लाखांहून अधिक मतांनी विजयी झाले. गेल्या लोकसभा निवडणुकीत कर्नालमधून भाजपाचे संजय भाटिया, भिवानी महेंद्रगडमधून धरमवीर सिंग, सिरसामधून सुनीता दुग्गल, फरिदाबादमधून कृष्णा पाल, सोनीपतमधून रमेशचंद्र कौशिक, गुडगावमधून राव इंद्रजित सिंग, रोहतकमधून अरविंद कुमार शर्मा आणि कुरुक्षेत्रातून नायब सिंग सैनी यांनी विजय मिळवला होता.