Criminal Cases Against Candidates लोकसभा निवडणूक आता अंतिम टप्प्यात आली आहे. २५ मे व १ जून रोजी होणार्‍या सहाव्या व सातव्या टप्प्यातील मतदानापूर्वी ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स’ (एडीआर)ने एक अहवाल प्रसिद्ध केला आहे. त्यात लोकसभा निवडणूक लढविणार्‍या ८,३३७ उमेदवारांपैकी १,६४४ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती समोर आली आहे. त्यापैकी १,१८८ उमेदवारांवर हत्या, हत्येचा प्रयत्न, महिलांविरुद्धचे गुन्हे व द्वेषयुक्त भाषण यांसारखे गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत.

पहिला टप्पा : १९ एप्रिल

पहिल्या टप्प्यात १,६१८ उमेदवारांपैकी २५२ जणांवर फौजदारी गुन्हे आणि १६१ जणांवर गंभीर फौजदारी गुन्हे दाखल आहेत. एडीआरने दिलेल्या माहितीनुसार, सात उमेदवारांवर हत्येचा आरोप आहे; तर १९ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. १८ उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात महिलांवरील गुन्ह्यांची प्रकरणे जाहीर केली आहेत; ज्यापैकी एकावर भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा आरोप आहे. इतर ३५ उमेदवारांवर द्वेष पसरविणारे भाषण केल्यामुळे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

Arvind Kejriwal interview Prime Minister Modi Amit Shah BJP aam aadmi party
पंचहात्तरीनंतर निवृत्त होण्याचा स्वत:चाच नियम मोदी का पाळणार नाहीत? केजरीवाल म्हणाले…
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Yogendra Yadav BJP Win NDA Congress
“मी भाजपाच्या विजयाची भविष्यवाणी…”, योगेंद्र यादव यांनी दिलं स्पष्टीकरण, पुन्हा सांगितलं किती जागा मिळणार
navneet rana uddhav thackeray
“मी पराभूत झालेय, उद्धव ठाकरेंनी आता तरी…”, नवनीत राणांचं वक्तव्य चर्चेत

हेही वाचा : ममता बॅनर्जींच्या ‘त्या’ वक्तव्याने साधू-संत आक्रमक; ममतादीदींना नोटीस पाठवणारे कार्तिक महाराज कोण आहेत?

दुसरा टप्पा : २६ एप्रिल

दुसऱ्या टप्प्यातील २५० उमेदवारांवर फौजदारी आरोप आणि १६७ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. तीन उमेदवारांवर हत्या केल्याचे; तर २४ जणांवर हत्येच्या प्रयत्नात गुंतल्याचे आहेत, असे अहवालातून उघड झाले आहे. भारतीय दंड संहिता (आयपीसी)च्या कलम ३७६ अंतर्गत बलात्काराच्या आरोपासह २५ उमेदवारांनी महिलांवरील गुन्ह्यांशी संबंधित प्रकरणाचा आरोप असल्याचे आपल्या प्रतिज्ञापत्रातून घोषित केले आहे. तसेच २१ उमेदवारांवर द्वेष पसरविणारे भाषण केल्याचा आरोप आहे. निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यातील ८७ जागांपैकी ५२ टक्के जागा ‘रेड अलर्ट’ मतदारसंघ आहेत. ज्या मतदारसंघातील तीन किंवा अधिक उमेदवारांनी त्यांच्या प्रतिज्ञापत्रात गुन्हेगारी प्रकरणात समावेश असल्याचे जाहीर केले आहे, त्या मतदारसंघांना ‘रेड अलर्ट’ म्हणून जाहीर केले जाते.

तिसरा टप्पा : ७ मे

तिसऱ्या टप्प्यात १३५२ उमेदवारांपैकी २४४ जणांवर फौजदारी गुन्हे आणि १७२ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. गुन्हेगारी रेकॉर्ड असलेल्या २४४ उमेदवारांपैकी पाच जणांवर हत्या केल्याचे आरोप आहेत; तर २४ जणांवर हत्येच्या प्रयत्नाचे आरोप आहेत. त्याशिवाय ३८ उमेदवारांवर महिलांविरुद्धचे गुन्हे दाखल आहेत आणि १७ जणांवर द्वेषपूर्ण भाषण केल्याचे गुन्हे आहेत. त्यातील सात उमेदवारांनी पूर्वीही काही गुन्हे केल्याचे प्रतिज्ञापत्रातून स्पष्ट केले आहे.

चौथा टप्पा : १३ मे

चौथ्या टप्प्यात सर्वांत जास्त उमेदवारांवर गुन्हे दाखल आहेत. त्यात १,७१० उमेदवारांपैकी ३६ उमेदवारांवर फौजदारी आरोप आहेत आणि २७४ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. आकडेवारीनुसार, ३६० उमेदवारांपैकी १७ उमेदवारांवर (२१ टक्के) फौजदारी गुन्हे दाखल आहेत; तर ११ जणांवर हत्येचे गुन्हे दाखल आहेत. ३० जणांवर हत्येचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे आणि ५० जणांवर महिलांशी निगडित गुन्हे दाखल आहेत. त्यातील पाच उमेदवारांवर बलात्काराचे आरोप आहेत.

पाचवा टप्पा : २० मे

पाचव्या टप्प्यात एकूण ६९५ उमेदवारांपैकी १५९ जणांवर फौजदारी गुन्हे आणि १२२ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. पाचव्या टप्प्यातील सुमारे १८ टक्के उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत; ज्यात हत्या, हत्येचा प्रयत्न आणि महिलांशी निगडित अशा गुन्ह्यांचा समावेश आहे. २८ उमेदवारांवर हत्येचा प्रयत्न (आयपीसी कलम ३०७), तर चार जणांवर हत्येचा (आयपीसी कलम ३०२) आरोप आहे.

त्याशिवाय महिलांशी निगडित गुन्ह्यांशी आरोप असलेल्या २९ उमेदवारांपैकी एकावर आयपीसी कलम ३७६ अंतर्गत बलात्काराचा आरोप आहे. या आकडेवारीत १० उमेदवार असे आहेत की, ज्यांनी हिंसा भडकू शकते आणि जातीय तेढ निर्माण होऊ शकते, अशी प्रक्षोभक भाषणे केली आहेत.

हेही वाचा : भाजपाला हजारीबागच्या ‘या’ कुटुंबाची भीती? कारण काय?

सहावा टप्पा : २५ मे

सहाव्या टप्प्यात ८६६ उमेदवारांपैकी १८० उमेदवारांवर फौजदारी गुन्हे आणि १४१ उमेदवारांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकूण १४१ उमेदवारांपैकी १६ टक्के उमेदवारांवर अतिशय गंभीर गुन्हे दाखल आहेत.

सातवा टप्पा : १ जून

सातव्या टप्प्यातील ९०४ उमेदवारांपैकी १९९ उमेदवारांवर फौजदारी गुन्हे, तर १५१ जणांवर गंभीर गुन्हे दाखल आहेत. एकूण ८,३६० उमेदवारांपैकी ८,३३७ उमेदवारांच्या शपथपत्रांचे ‘एडीआर’द्वारे विश्लेषण करण्यात आले. त्यानंतर ही आकडेवारी समोर आली आहे.