झारखंडच्या हजारीबाग येथील सिन्हा कुटुंब अनेक वर्षांपासून राजकारणात आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा वाजपेयी यांच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये केंद्रीय मंत्री होते. त्यांचे पुत्र जयंत सिन्हादेखील दोन टर्म भाजपा खासदार राहिले आहेत. मात्र, सिन्हा कुटुंबात आणि भाजपात मतभेद असल्याचे चित्र आहे. माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हा यांचे नातू आणि जयंत सिन्हा यांचे पुत्र आशीर सिन्हा झारखंडच्या हजारीबाग येथे झालेल्या विरोधी पक्ष इंडिया आघाडीच्या प्रचार सभेत सहभागी झाले होते. त्यानंतर काँग्रेसने घोषणा केली की, २२ वर्षीय आशीर पक्षात सामील झाले आहेत. काँग्रेसच्या सूत्रांनुसार यशवंत सिन्हा यांच्या पारंपारिक व्होट बँकेला आकर्षित करण्यासाठी आशीर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला असल्याचे सांगितले जात आहे.

जयंत सिन्हा यांना बजावली कारणे दाखवा नोटीस

आता भाजपाने जयंत सिन्हा यांना हजारीबाग लोकसभा मतदारसंघातील पक्षाच्या उमेदवाराच्या प्रचारात रस न दाखवल्याबद्दल कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. मात्र, जयंत यांनी त्यांच्यावर लावलेल्या आरोपांचे खंडन करण्याची शक्यता असल्याचे सूत्रांचे सांगणे आहे. २०१९ च्या निवडणुकीत ४.७९ लाखांहून अधिक मतांनी विजयी झालेल्या हजारीबागचे दोन टर्म खासदार जयंत यांच्या जागेवर यंदा स्थानिक आमदार मनीष जयस्वाल यांना उभे करण्यात आले आहे. भाजपाने जयस्वाल यांच्या उमेदवारीची घोषणा करण्यापूर्वी जयंत म्हणाले होते की, त्यांना निवडणूक लढवायची नाही, कारण त्यांना जागतिक हवामान बदलाच्या समस्येवर लक्ष केंद्रीत करायचे आहे. पूर्वीही जयंत यांना मंत्रिपद नाकारण्यात आले होते, त्यानंतर भाजपाकडून त्यांना उमेदवारीही नाकारल्याचे बोलले जात आहे.

Ian Bremmer prashant kishor
भाजपाला किती जागा मिळणार? प्रशांत किशोरांपाठोपाठ अमेरिकन राजकीय संशोधकाने केलं विश्लेषण
yogendra yadav
“लोकसभेच्या निकालानंतर अजित पवार आणि एकनाथ शिंदे…”, योगेंद्र यादव यांचं मोठं विधान!
Raghuram Rajan reuters
“निवडणुकीत भाजपाचा पराभव झाला तर…”, भारताच्या अर्थव्यवस्थेबाबत माजी RBI गव्हर्नर रघुराम राजन यांचं मोठं वक्तव्य
Maharashtra Lok Sabha Election Result 2024 Updates in Marathi
Maharashtra Lok Sabha Election Result 2024: महाराष्ट्रातील ४८ मतदारसंघात काय आहे स्थिती? कुणाला मिळाला विजय; कोण आघाडीवर? जाणून घ्या…
Pune Porsche Accident Latest Updates in Marathi
Pune Porsche Accident:अश्विनी आणि अनिश यांना पोर्शने धडक देण्याआधी काय घडलं? डिनर प्लॅन आणि..
What Kangana Said?
कंगनाचा धक्कादायक दावा, “कोणतीही नवी हिरोईन आली की तिला दाऊदसमोर..”
chhagan bhujbal narendra modi
भाजपाच्या ‘४०० पार’च्या घोषणेचा निवडणुकीत फटका बसला? भुजबळांची जाहीर कबुली; मोदींचा उल्लेख करत म्हणाले…
Murlidhar Mohol - Ravindra Dhangeka
Pune Accident : “दोन उद्ध्वस्त कुटुंबांचे अश्रू पुसायचे सोडून बिल्डरची बाजू घेताय?” धंगेकरांचा मुरलीधर मोहोळांना टोला

हेही वाचा : पेपरफुटी आणि बेरोजगारीमुळे भाजपाला निवडणुकीत फटका बसेल? विद्यार्थ्यांच्या भावना काय?

१९९८ नंतर पहिल्यांदाच सिन्हा कुटुंबातील कोणीही हजारीबागच्या रिंगणात नाही. वाजपेयींच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारमधील माजी केंद्रीय मंत्री यशवंत सिन्हाही निवडणुकीत विरोधकांच्या बाजूने आहेत. त्यांनी जयस्वाल यांच्या विरोधात उभे असलेले काँग्रेसचे उमेदवार जय प्रकाश भाई पटेल यांना पाठिंबा जाहीर केला आहे. भाजपाने आता मुलगा जयंत यांच्यावर ताशेरे ओढले असून, ते संघटनात्मक काम का करत नाही आणि मतदान का केले नाही, असे प्रश्न केले आहेत. ते पक्षाची प्रतिमा मलिन करत असल्याचे पक्षाने म्हटले आहे. कदाचित ते त्यांच्या वडिलांच्या मार्गावर जाऊ शकतात, अशी भीतीही भाजपाला आहे.

हजारीबागचे सिन्हा कुटुंब आणि यशवंत सिन्हा भाजपाविरोधी भूमिका

माजी आयएएस अधिकारी यशवंत सिन्हा यांनी १९८० च्या दशकात राजकारणात येण्यासाठी प्रतिष्ठित पद सोडले. त्यांचे पुत्र जयंत आयआयटी दिल्ली आणि हार्वर्ड बिझनेस स्कूलचे माजी विद्यार्थी आहेत. २०१४ मध्ये ते राजकारणात आले. १९६० च्या बॅचचे आयएएस अधिकारी यशवंत सिन्हा २४ वर्षे सरकारी सेवेत राहिले. त्यांची बिहार, दिल्ली आणि अगदी परदेशातही बदली झाली. राज्यशास्त्रात पदव्युत्तर पदवी मिळविल्यानंतर त्यांनी आयएएसमध्ये सामील होण्यापूर्वी पाटणा विद्यापीठात व्याख्याता म्हणून आपली कारकीर्द सुरू केली.

जनता पक्षात काम केल्यानंतर यशवंत यांनी जनता दलात प्रवेश केला. चंद्रशेखर यांनी जनता दलात फूट पाडून जनता दल (समाजवादी) पक्ष स्थापन केला, तेव्हा सिन्हा त्यांच्याबरोबर गेले आणि १९९०-९१ मध्ये जेव्हा चंद्रशेखर राजीव गांधींच्या नेतृत्वाखालील काँग्रेसच्या पाठिंब्याने पंतप्रधान झाले तेव्हा सिन्हा केंद्रीय अर्थमंत्री झाले.

पुढे यशवंत सिन्हा भाजपाकडे वळले. १९९८ पासून त्यांनी हजारीबागमधून भाजपाचा उमेदवार म्हणून निवडणूक लढवली. काही वर्षे ते अटलबिहारी वाजपेयी सरकारमध्ये अर्थमंत्री राहिले. त्यानंतर त्यांनी २००२ ते २००४ या काळात परराष्ट्र मंत्रिपद भूषवले. अर्थमंत्री असताना सिन्हा यांनी संसदेत संध्याकाळी ५ ते ११ या वेळेत अर्थसंकल्प सादर करण्याची औपनिवेशिक परंपरा बदलली.

वाजपेयींनंतरच्या काळात भाजपामधील दबदबा कमी

२००४ मध्ये सिन्हा यांनी हजारीबागची जागा गमावली, पण लवकरच ते राज्यसभेतून संसदेत परतले. परंतु, वाजपेयींनंतरच्या काळात भाजपामधील त्यांचा दबदबा कमी होऊ लागला. त्यानंतर दिल्लीमध्ये मुरली मनोहर जोशी आणि जसवंत सिंह यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्यांप्रमाणे सुषमा स्वराज, अरुण जेटली, वेंकय्या नायडू आणि अनंत कुमार हे पक्षाचे प्रमुख नेते म्हणून उदयास आले. राज्यांमध्ये नरेंद्र मोदी, शिवराजसिंह चौहान आणि रमणसिंह हे पक्षाचे चेहरे झाले. यशवंत सिन्हा अजूनही भाजपाच्या मुख्यालयात किंवा संसदेच्या संकुलात आर्थिक विषयांवर अधूनमधून पत्रकार परिषद घेत असत. २००९ च्या निवडणुकीतही त्यांनी हजारीबागची जागा परत मिळवली.

नितीन गडकरी भाजपाचे अध्यक्ष असताना, यशवंत सिन्हा पडले. गडकरी पक्षाध्यक्षपदी दुसऱ्यांदा निवडून येण्याच्या प्रयत्नात होते. १९८० मध्ये पक्ष स्थापन झाल्यापासून भाजपाने पक्षाध्यक्षपदासाठी कधीही स्पर्धा पाहिली नव्हती. सर्वत्र असे मानले जात होते की, लालकृष्ण अडवाणी यांच्यासह सिन्हा यांना गडकरींची पक्षप्रमुख म्हणून पुनरावृत्ती नको होती. शेवटच्या क्षणी, गडकरींच्या जागी राजनाथ सिंह यांची नियुक्ती करण्याचा निर्णय पक्षाने घेतला.

२०१४ च्या निवडणुकीत, हजारीबागमधून भाजपाने यशवंत सिन्हा यांचा मुलगा जयंत यांना निवडणूक रिंगणात उतरवले. जयंत दीर्घकाळापासून वडिलांना आणि भाजपाला अनौपचारिकपणे मदत करत होते. जयंत सिन्हा हजारीबाग मतदारसंघातून निवडून आले आणि अशा प्रकारे त्यांनी कुटुंबाची जागा सुरक्षित ठेवली. मोदी सरकारच्या पहिल्या कार्यकाळात त्यांची २०१४ ते २०१६ पर्यंत तत्कालीन अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अंतर्गत वित्त राज्यमंत्री म्हणून आणि २०१६ ते २०१९ पर्यंत नागरी विमान वाहतूक राज्यमंत्री म्हणून नियुक्ती करण्यात आली.

यशवंत सिन्हा यांची पक्षविरोधी भूमिका

२०१७ पर्यंत यशवंत सिन्हा मोदी विरोधी टीका करू लागले. २०१७ मध्ये त्यांनी टीका केली की, नोटाबंदी आणि जीएसटी हा एक विनोद होता; ज्याने गरिबीच्या काठावर असलेल्यांना दारिद्र्यरेषेखाली ढकलले. मात्र, मुलगा जयंत यांनी विरुद्ध भूमिका घेतली. त्यांनी नवीन अर्थव्यवस्थेची प्रशंसा केली. मुलाला वडिलांच्या विरोधात उभे करणे ही युक्ती असल्याचा आरोपही यशवंत सिन्हा यांनी केला. जयंत आपल्या पदासाठी सक्षम होते, मग वर्षभरापूर्वी त्यांना अर्थमंत्रालयातून का काढून टाकण्यात आले, असा प्रश्नही सिन्हा यांनी उपस्थित केला.

हेही वाचा : कुरुक्षेत्रावर भाजपा आणि शेतकरी आमनेसामने; नवीन जिंदाल का सापडले अडचणीत?

जुलै २०१८ मध्ये, जयंत सिन्हा वादात सापडले, जेव्हा त्यांनी लिंचिंग केल्याप्रकरणी दोषी ठरलेल्या आणि तुरुंगातून जामिनावर बाहेर आलेल्या झारखंडमधील मांस व्यापारी अलिमुद्दीन अन्सारी यांच्यासह अनेकांना हार घातला. तेव्हा यशवंत सिन्हा म्हणाले, “माझ्या मुलाची कृती मला मान्य नाही.” हजारीबागमधून मोठा विजय मिळवूनही जयंत २०१९ मध्ये जयंत यांना मंत्रिपद मिळाले नाही. यशवंत यांनी सतत मोदी सरकारला लक्ष्य केल्यामुळे जयंत यांना मंत्रिपद नाकारल्याचे राजकीय वर्तुळात मानले जाते.

यशवंत यांनी मात्र मोदी सरकारवर टीका करणे सुरूच ठेवले. ते ममता बॅनर्जी यांच्या नेतृत्वाखालील तृणमूल काँग्रेस (टीएमसी) मध्ये सामील झाले. २०२२ च्या राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत भाजपाच्या नेतृत्वाखालील एनडीएच्या उमेदवार द्रौपदी मुर्मू यांच्या विरोधात ते विरोधी पक्षांचे संयुक्त उमेदवार होते. राष्ट्रपतीपदाची निवडणूक ही व्यक्तींऐवजी विचारधारेची स्पर्धा आहे, असे सांगून यशवंत म्हणाले, “माझा मुलगा त्याचा राजधर्म पाळतो आणि मी माझ्या राष्ट्रधर्माचे पालन करतो.”