रवींद्र जुनारकर

चंद्रपूर : घुग्घुससारख्या अतिशय छोट्या गावातील प्रभाग अध्यक्ष, भाजपच्या चंद्रपूर (ग्रामीण) जिल्हाध्यक्ष तर अवघ्या २१ व्या वर्षी घुग्घुसचे सरपंच व पुढे चंद्रपूर पंचायत समिती सभापती आणि त्यानंतर चंद्रपूर जिल्हा परिषदेचे अध्यक्ष अशी यशस्वी राजकीय कारकीर्द लाभलेले देवराव भोंगळे जिल्ह्यातील भाजपचा युवा चेहरा म्हणून राजकीय पटलावर झळकले आहेत.

former Vice President M Venkaiah Naidu criticises freebies trend
पक्ष बदलला की जुन्या नेत्यांना शिव्या देणं चुकीचं: माजी उपराष्ट्रपती व्यंकय्या नायडूंची टीका
Doordarshan logo, saffron logo,
दूरदर्शनचा भगवा लोगो… रंगांना राजकारणात एवढं महत्त्व का?
loksatta explained article, bahujan vikas aghadi, hitendra thakur, politics, Vasai, Palghar
विश्लेषण : पालघर-वसईत हितेंद्र ठाकुरांशी सर्वच पक्षांना जुळवून का घ्यावे लागते? ठाकुरांच्या यशाचे रहस्य काय?
raj thackray mns latest news
मनसेच्या विश्वासार्हतेला उतरती कळा; बदलत्या भूमिकेमुळे पदाधिकारी-कार्यकर्त्यांत संभ्रम

हेही वाचा… अंबादास दानवे : संघटनेस आकार देणारा आक्रमक नेता

देवराव यांचे राजकीय गुरू असलेले जिल्ह्याचे पालकमंत्री तथा वन व सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार १९९५ मध्ये चंद्रपूर विधानसभा मतदारसंघातून आमदारकीची निवडणूक लढवीत असताना भोंगळे यांनी कार्यकर्ता म्हणून भारतीय जनता पक्षाचे काम सुरू केले. त्या कामाची दखल घेत घुग्घुस शहरातील वार्ड अध्यक्ष पदाची सूत्रे त्यांच्याकडे सोपविण्यात आली. त्यानंतर घुग्घुस तालुका भाजप सचिव, भाजप चंद्रपूर तालुका युवा मोर्चा अध्यक्ष, चंद्रपूर जिल्हा भाजप युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष पदावर कार्य केले. २००० साली झालेल्या घुग्घुस ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत सदस्य म्हणून निवडून आल्यानंतर अवघ्या २१ व्या वर्षी राज्यातील सर्वात युवा सरपंच होण्याची संधी मिळाली. घुग्घुसचे सरपंच झाल्यानंतर भोंगळे यांनी गावात अनेक महत्त्वाची विकासकामे केली. याच दरम्यान भारतीय जनता पक्षाच्या जिल्हा कार्यकारिणीत सचिवपदी नियुक्ती झाली. सलग दहा वर्ष या पदावर काम केल्यानंतर थेट भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष पदावर निवड केली गेली. मागील अडीच ते तीन वर्षांपासून जिल्हाध्यक्ष पदाची धुरा यशस्वीपणे सांभाळत आहेत. सलग दुसऱ्यांदा ग्राम पंचायत सदस्य निवडून आले. त्यानंतर चंद्रपूर पंचायत समिती सभापतीपदी निवड झाली. २०१२ मध्ये घुग्घुस येथून जिल्हा परिषद सदस्य म्हणून विजय मिळविला. २०१७ मध्ये घुग्घुस जिल्हा परिषदेची जागा आरक्षित झाल्याने भोंगळे यांनी पोंभूर्णा तालुक्यातील चिंतलधाबा-घोसरी जिल्हा परिषद क्षेत्रातून निवडणूक लढली. तिथेही त्यांनी विजय संपादन केला. २०१७ मध्ये चंद्रपूर जिल्हा परिषद अध्यक्ष पदाची निवडणूकही त्यांनी जिंकली. सलग अडीच वर्षे त्यांनी यशस्वी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून काम केले. ग्रामीण भागातून येणारे भोंगळे यांचे वय आता ४४ वर्षे आहे. त्यांची जिल्ह्याच्या राजकारणावर चांगली पकड आहे.

हेही वाचा… प्रकाश आबिटकर : विकास आणि जनतेशी नाळ

राज्यशास्त्र व समाजशास्त्र या दोन विषयात पदव्युत्तर शिक्षण घेतलेल्या भोंगळे यांनी शिक्षणशास्त्राची (बीएड)पदवी घेतली आहे. विशेष म्हणजे, आठ दिवसांपूर्वीच त्यांनी गोंडवाना विद्यापीठाची पीएचडीसाठीची पेट परीक्षाही उत्तीर्ण केली आहे. लवकरच पीएचडीही पूर्ण करू असा आत्मविश्वास त्यांना आहे. ट्रान्सपोर्ट व्यावसायिक असले तरी अतिशय अभ्यासू राजकारणी म्हणून त्यांच्याकडे बघितले जाते. राजकारणात आल्यापासून ते भाजपशी एकनिष्ठ आहेत. पक्षाचे काम करत राहणे हीच राजकीय महत्त्वाकांक्षा ठेवून पक्षात सक्रिय असलेल्या भोंगळे यांनी २०१९ मध्ये राजुरा विधानसभा मतदारसंघातून उमेदवारीसाठी प्रयत्न केले होते. आताही ते लोकसभा व विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक आहेत. पक्षाने जबाबदारी दिली तर निवडणुकीच्या रिंगणात उतरू, असेही ते सांगतात. पक्षातील ज्येष्ठ नेत्यांसोबतच सर्वांना सोबत घेऊन चालण्याचे राजकीय कौशल्य त्यांच्या अंगी आहे. अभ्यासू वृत्ती ही त्यांची सर्वात जमेची बाजू असून राजकारणात सत्ताधारी व विरोधक म्हणून त्यांनी केलेली नावीन्यपूर्ण आंदोलने लक्षवेधी ठरली आहेत.