कराड : माढा मतदारसंघात मोहिते-पाटील कुटुंबापाठोपाठ फलटणच्या रामराजे निंबाळकर गटानेही भाजप उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांच्या विरोधात उघड पवित्रा घेतल्याने भाजपपुढे मोठे आव्हान उभे राहिल्याचे स्पष्ट झाले आहे. महायुती किंवा महविकास आघाडी काय. वेगवेगळे पक्ष एकत्र येताना स्थानिक पातळीवर असलेले हेवे­-दावे हे तसेच कायम राहत असल्याचा अनुभव आता माढ्यातील दोन्हीही उमेदवारांना आला आहे.

अकलूजच्या मोहिते-पाटलांच्या पक्ष बदलण्याच्या ऐतिहासिक निर्णयाला खतपाणी घालणारे फलटणचे रामराजे निंबाळकर कुटुंबियांची भूमिका आणि त्याचा परिणाम आता महत्वाचा आहे. रामराजे आज अधिकृतपणे ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटात असेलतरी त्यांचा भाजप उमेदवाराला राहिलेला उघड विरोध ही फुटच असल्याने ‘महायुती’ला त्याचा जबरदस्त धक्का बसला आहे.

Umesh Patil on Shrirang Barne
महायुतीत वादाची ठिणगी? श्रीरंग बारणेंच्या आरोपानंतर उमेश पाटील म्हणाले, “थोडंफार उन्नीस बीस…”
P V Narasimha Rao tenure How the Narasimha Rao years changed India
बाबरी मशिदीचा पाडाव, बदलले राजकारण आणि नरसिंहरावांची वादग्रस्त कारकीर्द!
BJP in Rae Bareli Amit Shah Rahul Gandhi in Rae Bareli Lok Sabha seat
राहुल गांधींविरुद्ध उभे ठाकलेल्या भाजपा उमेदवाराला पाठिंबा द्यावा की नाही? पक्षांतर केलेल्या नेत्यांच्या मनात टू बी ऑर नॉट टू बी
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Ganesh Naik, Shinde sena, thane,
गणेश नाईक-शिंदेसेनेच्या मनोमिलन मेळाव्याला मुहूर्त मिळेना
Devendra Fadnavis
“सदाभाऊ यावेळी संधी पक्की, पण पुढच्या वेळी…”; देवेंद्र फडणवीसांचं शिंदे गटाच्या नेत्याबाबत मोठं विधान
Sanjay Raut on Ajit pawar (1)
“मला सुनेत्रा पवारांची दया येते, त्यांच्या पतीराजाने…”, संजय राऊतांची बोचरी टीका; म्हणाले, “एका गृहिणीला…”
Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…

आणखी वाचा-भाजपाच्या जाहीरनाम्यात नवीन काय? कुठले मुद्दे वगळले? कशाबाबत मौन?

धैर्यशील मोहिते-पाटलांनी तुतारी हाती घेवून भाजपचे उमेदवार रणजितसिंह निंबाळकरांना पर्यायाने महायुतीला दिलेल्या जबरदस्त धक्याचे कर्तेकरविते रामराजे हेच आहेत. पण, ‘राष्ट्रवादी’च्या अजित पवार गटातील ही त्यांची बंडाळी कायम राहणार का? हाही प्रश्न आहे. रामराजेंवर पक्षश्रेष्ठी उपमुख्यमंत्री अजित पवारांचा प्रचंड दबाव असताना, त्यांचे बंधू रघुनाथराजेंनी आपण मोहिते-पाटलांसोबत असून, भाजपचे उमेदवार रणजितसिंहांच्या पराभवाचा निर्धार व्यक्त केला आहे. त्यातून रामराजे हेच रघुनाथराजेंच्या तोडून बोलत असल्याचे मानले जात आहे.

रामराजे आणि विजयसिंह मोहिते-पाटील गटाचा आपाआपल्या भागात दबदबा आहे. परंतु, अलीकडच्या काळात हे नेते व त्यांचे सगेसोयरे थेट सत्तेपासून बाजूला राहिल्याने त्यांचा पूर्वीप्रमाणे प्रभाव राहिला का, हेही महत्वाचे आहे. राम जेगट गतखेपेस राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार संजयमामा शिंदेसाठी आटोकाट प्रयत्नशील राहिले. आज मात्र, राजेगट स्वपक्षाशी फारकत घेत रणजितसिंहांना विरोध कायम ठेवून आहेत. रामराजेंचे विशेषतः फलटण, माण व खटाव हे तीन तालुक्यांचे प्रभावक्षेत्र. पण, कोणतीही निवडणूक. पक्ष अन् उमेदवार कोणीही असो इथे रामराजे आणि रणजितसिंहांचा आमने-सामने संघर्षच राहिला आहे. दोघांमध्ये कायम हेवे-दावे असल्याने त्यांचे पक्ष जरी एकत्र आलेतरी हे दोघे मनाने जुळले नाहीत. त्याचे वैरभाव कायम दिसले आहे.

आणखी वाचा-नगर, शिर्डीमध्ये गेल्या निवडणुकीतील प्रतिस्पर्धी यंदा एकत्र

खरेतर रामराजेंनी गतखेपेसही रणजितसिंहांना कडवा विरोध केला होता. आताही त्यांचा तोच पवित्रा. पण, हे गृहीत धरून भाजपनेही मोर्चेबांधणी केल्याने त्यात आपला प्रभाव दाखवणे आणि धैर्यशील मोहिते-पाटलांना यशस्वी साथ करणे ही रामराजेंसाठी कसोटी असेल.

जावई भाजपचे उमेदवार?

रामराजे नाईक निंबाळकर हे राष्ट्रवादीत राहून आडपडद्याने भाजपचे रणजितसिंह निंबाळकर यांना विरोध करीत आहेत. दुसरीकडे, रामराजे यांचे जावई आणि विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना बहुधा दक्षिण मुंबईतून भाजपच्या वतीने उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे. रामराजेंची नक्की भूमिका काय असेल, असा प्रश्न त्यातून उपस्थित होत आहे.