१५ राज्यांमधील राज्यसभेच्या ५६ जागांसाठी मंगळवारी निवडणूक होणार आहे. डिसेंबरमध्ये तीन हिंदी भाषिक राज्यांच्या विधानसभा निवडणुकीत भाजपाचा निर्णायक विजय झाला. बिहारमधील बदलती राजकीय समीकरणं असूनही राज्यसभेच्या रचनेत लक्षणीय बदल होण्याची शक्यता नाही, असे पूर्वीच्या अंदाजांवरून संकेत मिळत आहेत. परंतु उत्तर प्रदेश, हिमाचल प्रदेश आणि कर्नाटकमध्ये क्रॉस व्होटिंगच्या वृत्तांदरम्यान अनपेक्षित निकाल समोर येण्याची शक्यता आहे.

मतदानाच्या दिवशी सत्ताधारी एनडीएच्या वरच्या सभागृहात १०९ खासदार होते, २३८ सदस्य असलेल्या राज्यसभेत १० सदस्य कमी होते. विरोधी इंडिया आघाडीचे ८९ खासदार उपस्थित होते. उत्तर प्रदेशमध्ये सर्वाधिक १० जागांसाठी मतदान होत आहे, त्यानंतर महाराष्ट्र आणि बिहार प्रत्येकी ६ जागांसाठी निवडणूक होत आहे. मध्य प्रदेश आणि पश्चिम बंगाल (प्रत्येकी ५), कर्नाटक आणि गुजरात (प्रत्येकी ४), ओडिशा, तेलंगणा, आंध्र प्रदेश, आणि राजस्थान (प्रत्येकी ३) आणि उत्तराखंड, हिमाचल प्रदेश, हरियाणा आणि छत्तीसगड (प्रत्येकी १) जागांवर निवडणूक होत आहे.

Loksabha Election 2024 BJD 33 percent women candidates
भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक
Chief Minister Shinde Deputy Chief Minister Pawar instructions to the office bearers of the Grand Alliance not to make controversial statements offensive actions Pune news
वादग्रस्त विधाने, आक्षेपार्ह कृती नको! मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री पवार यांची महायुतीच्या पदाधिकाऱ्यांना तंबी
Pappu Yadav’s claim on Purnea
पप्पू यादव पूर्णियातून लढण्यावर ठाम; काँग्रेस-राजदमधील जागावाटपाचा तिढा सुटेना
BJP In himachal pradesh
काँग्रेसचे ‘ते’ सहा बंडखोर आमदार भाजपात! ‘या’ राज्यात राजकीय उलथापलथींना वेग, पोटनिवडणुकीनंतर सत्तांतर होणार?

हेही वाचाः “केरळमधून निवडणूक लढवून राहुल किंवा काँग्रेसला काय फायदा?” सीपीआय वायनाडच्या उमेदवार म्हणाल्या, “मला वाटते…”

विधानसभेच्या संख्याबळानुसार, उत्तर प्रदेशमध्ये भाजपा आणि प्रमुख विरोधी पक्ष समाजवादी पक्ष (SP) या दोघांकडे मूळ सभागृहात प्रत्येकी ७ आणि ३ सदस्य पाठवण्यासाठी पुरेशी संख्या होती, परंतु भाजपाने संजय सेठ यांना उमेदवारी दिल्याने हे चित्र बदलले. कारण भाजपाने आठवा उमेदवार दिला. आता १ जागेचा निकाल क्रॉस व्होटिंगद्वारे ठरवला जाऊ शकतो. भाजपाला ८ जागा आणि सपाला २ जागा मिळू शकतात. कर्नाटकमध्ये काँग्रेसचे ३ आणि भाजपाचे १ खासदार निवृत्त होत आहेत. पण जनता दल (धर्मनिरपेक्ष)बरोबर युती करून आणि राज्यसभेच्या जागेसाठी १ सदस्य नामनिर्देशित केल्यानंतर भाजपाने चार रिक्त जागांसाठी ५ उमेदवारांमध्ये लढत निश्चित केली आहे. १३४ आमदार असलेल्या काँग्रेसने दावा केला आहे की, त्यांना ३ अपक्षांचाही त्यांना पाठिंबा आहे. भाजपा-जेडी(एस) युतीकडे ८५ आमदार आहेत, दोन खासदार निवडण्यासाठी आवश्यक असलेल्या ९० मतांपैकी पाच कमी आहेत.

हेही वाचाः Loksabha Election: बारामुल्लामधून पीपल्स कॉन्फरन्सचे अध्यक्ष निवडणुकीच्या रिंगणात; कोण आहेत सज्जाद लोन?

हिमाचल प्रदेशमध्ये जिथे काँग्रेस २०२२ च्या विधानसभा निवडणुकीत ४० आमदारांसह सत्तेत आहे, तिथे फक्त १ राज्यसभेची जागा आहे, जी भाजपाच्या जे पी नड्डा यांनी रिक्त केली आहे. पक्षांतर्गत असंतोषाचा अर्थ असा आहे की, मंगळवारी किमान ९ आमदारांनी क्रॉस व्होटिंग केल्याच्या बातम्या आल्यात. काँग्रेसने अभिषेक मनु सिंघवी यांना उमेदवारी दिली आहे, तर विरोधी भाजपाचे उमेदवार हर्ष महाजन आहेत. योगायोगाने २५ आमदारांसह ६८ सदस्यांच्या विधानसभेत भाजपाला निम्म्यापेक्षा नऊ मते कमी आहेच. निवृत्त होणाऱ्या ५६ खासदारांपैकी २८ भाजपाचे आणि १० काँग्रेसचे आहेत. जवळपास तितक्याच जागा राखण्याची अपेक्षा असलेल्या भाजपाला आता उत्तर प्रदेश आणि हिमाचल प्रदेशात अतिरिक्त जागा मिळू शकतात.