गडचिरोली : क्षेत्रफळाच्या दृष्टीने सर्वात मोठा लोकसभा मतदारसंघ असलेल्या गडचिरोली-चिमूर मतदारसंघात भाजप विरुद्ध काँग्रेस अशी थेट लढत होणार आहे. प्रचार शेवटचा टप्प्यात पोहोचला आहे. तरी कुणाचे पारडे जड याचा अंदाज वर्तवणे कठीण झाल्याने येथे चुरशीची लढत असल्याचे चित्र आहे. भाजपकडून विद्यमान खासदार अशोक नेते तिसऱ्यांदा विजयी होणार असा दावा करीत असले तरी सत्ताविरोधी वातावरणामुळे आम्हीच जिंकणार असा विश्वास काँग्रेसचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांना आहे. गडचिरोली-चिमूर मतदारसंघात एकूण १० उमेदवार रिंगणात आहेत. मतदारसंघातील सहा विधानसभेतील एकंदरीत वातावरण बघता महायुतीचे अशोक नेते आणि महाविकास आघाडीचे उमेदवार डॉ. नामदेव किरसान यांच्यात थेट लढत होणार असेच चित्र आहे.

भाजपचे अशोक नेते हे तिसऱ्यांदा लोकसभेच्या रिंगणात उतरले आहेत. दोनवेळा मोदी लाटेत निवडून आलेले नेते यांना याहीवेळी तिकिटासाठी शेवटपर्यंत वाट पाहावी लागली. यंदा त्यांना सत्ताविरोधी वातावरणाचा फटका बसू शकतो. कार्यकर्त्यांना अनेक ठिकाणी रोषाचा सामना करावा लागतो आहे. तर रेल्वे, राष्ट्रीय महामार्ग, अंतर्गत रस्ते यासह विविध विकासकामे, पक्षसंघटन आणि मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांच्यासह प्रचारासाठी उतरलेली नेत्यांची फळी ह्या त्यांच्या जमेच्या बाजू आहेत.

Will the candidate s controversial image be a problem for Shinde group in South Mumbai lok sabha constituency
मतदारसंघाचा आढावा : दक्षिण मुंबई, शिंदे गटासाठी उमेदवाराची वादग्रस्त प्रतिमा अडचणीची ठरणार ?
Dhule lok sabha, BJP,
मतदारसंघाचा आढावा : धुळे; विरोधी मतांचे विभाजन टळल्याने भाजपपुढे आव्हान
Pune Lok Sabha, Pune ,
मतदारसंघाचा आढावा : पुणे; पुणे भाजप की काँग्रेसचे ?
Supriya Sule, polling,
मतदानाच्या पूर्वसंध्येला सुप्रिया सुळेंची मोठी मागणी
Rae Bareli Brief history Feroze Gandhi Rahul Gandhi Gandhi Nehru family
फिरोज ते राहुल गांधी व्हाया इंदिरा- सोनिया: रायबरेली मतदारसंघाचा इतिहास काय सांगतो?
sangli lok sabha marathi news, sangli lok sabha bjp marathi news
मतदारसंघाचा आढावा : सांगली; महाविकास आघाडीतील गोंधळाचा भाजपला फायदाच
congress fighting 15 of the 17 lok sabha constituencies directly with bjp In maharashtra
१५ मतदारसंघांत काँग्रेस-भाजप सामना; दोन ठिकाणी काँग्रेसची शिंदे गटाशी लढत
Bihar Loksabha Election 2024 CPM Khagaria Left party
एकमेव मुस्लीम खासदाराने सोडली एनडीएची साथ; डाव्या पक्षाच्या उमेदवाराला दिला पाठिंबा

हेही वाचा : पहिल्या टप्प्यामध्ये भाजपला जाट, ठाकुरांच्या रागाची धास्ती

काँग्रेसचे डॉ. नामदेव किरसान हे सरकारी अधिकारी राहिलेले आणि गोंदिया जिल्ह्यातील रहिवासी आहेत. ते मागील काही वर्षांपासून गडचिरोली काँग्रेसमध्ये सक्रिय आहेत. ते हलबी समजाचे प्रतिनिधित्व करतात. नेते यांची तिसरी टर्म असल्याने सत्ताविरोधी वातावरणाचा त्यांना लाभ मिळू शकतो. उमेदवारी देताना नवा चेहरा म्हणून त्यांना समोर करण्यात आले होते. त्यांनी लोकसभा क्षेत्र पिंजून काढले असल्याने त्यांचा विचार करण्यात आला. यामुळे दुखावलेल्या डॉ. उसेंडी, डॉ. चंदा व नितीन कोडवते यांनी पक्षाला सोडचिठ्ठी देत भाजपमध्ये प्रवेश केला. सोबतच काही जुने नेते नाराज असल्याने बहुसंख्याक आदिवासी समाजातील नेतृत्व काँग्रेसमध्ये नावापुरते शिल्लक असल्याने याचा फटका किरसान यांना बसू शकतो.

महायुती आणि महाविकास आघाडीतील मित्रपक्षांत असलेली नाराजी दूर करण्याचे आव्हान देखील उमेदवारांना पेलावे लागत आहे. प्रचारादरम्यान मतदार राष्ट्रीय ऐवजी स्थानिक मुद्यांना अधिक प्राधान्य देत असल्याने उमेदवारांची चांगलीच पंचाईत होत आहे.

हेही वाचा : भाजपामध्ये असताना पटनाईक सरकारवर करायच्या जोरदार टीका; आता त्याच पक्षाकडून दोन महिला लढवणार निवडणूक

प्रचारासाठी दमछाक

नाट्यमय घडामोडीनंतर शेवटच्या क्षणी भाजप आणि काँग्रेसने उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे प्रचारासाठी कमी कालावधी मिळालेला आहे. एका टोकापासून दुसऱ्या टोकापर्यंत पाचशे किलोमीटरपेक्षा अधिक अंतर असल्याने प्रचारासाठी राजकीय पक्षांची चांगलीच दमछाक होत आहे.

हेही वाचा : ‘फिर एक बार’साठी तीन महिन्यांत ३८ कोटींचा खर्च, ऑनलाइन जाहिरातींमध्ये भाजपचाच वाटा मोठा, २०१९च्या तुलनेत तिप्पट वाढ

‘ही’ मते निर्णायक?

काँग्रेस भाजप व्यतिरिक्त रिंगणात असलेले ‘बीआरएसपी’ वंचित बहुजन आघाडी, बीएसपी आणि अपक्ष उमेदवार किती मते घेणार यावर देखील विजयाचे गणित अवलंबून आहे. मागील तीन निवडणुकांचा विचार केल्यास वंचित आणि बीएसपी यांना एक लाखाच्यावर मते मिळाली होती. पण यंदा दोन्ही पक्षाने दिलेले उमेदवार फार प्रभावी नसल्याने ही मते कुणाच्या पारड्यात पडणार याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. सोबतच बहुसंख्याक आदिवासी समाज यावेळी कुणाच्या पाठीशी उभा राहतो, हेही तितकेच महत्त्वाचे आहे.