आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर हरियाणातील १० जागांसाठी काँग्रेसमधून २९९ इच्छुक कार्यकर्त्यांनी अर्ज केले आहेत. महत्त्वाचे म्हणजे २०१९ ची लोकसभा निवडणूक लढविलेल्या एकाही काँग्रेस उमेदवाराचे नाव या यादीत नाही. पक्षाकडून तिकिटाची मागणी करणाऱ्या काही प्रमुख चेहऱ्यांमध्ये कर्नालमधून माजी विधानसभा अध्यक्ष कुलदीप शर्मा यांचे पुत्र चाणक्य पंडित आणि गुरुग्राममधून सेवानिवृत्त आयपीएस अधिकारी सुभाष यादव यांचा समावेश आहे.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटी (एआयसीसी) हरियाणाचे प्रभारी दीपक बाबरिया यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले की, काही जागा सोडल्यास इतर सर्व जागांवर पक्षकार्यकर्ते आणि नेत्यांमध्ये खूप उत्साह आहे. बाबरिया म्हणाले, “१३ फेब्रुवारीला स्क्रीनिंग कमिटीची बैठक होणार असून, ही समिती हायकमांडला शिफारशी पाठविणार आहे. या महिन्याच्या १५ किंवा १६ तारखेला नवी दिल्लीत अंतिम बैठक होणे अपेक्षित आहे. या बैठकीनंतर उमेदवारांची नावे जाहीर केली जातील.” अर्जदारांच्या यादीत पक्षातील प्रमुख नेत्यांची नावे नाहीत, याबद्दल प्रतिक्रिया व्यक्त कताना बाबरिया म्हणाले, “वरिष्ठ नेत्यांना अनेकदा असे वाटते की, पक्षाने त्यांनाच निवडणूक लढविण्यासाठी आमंत्रित करायला हवे. पक्ष लवकरच अंतिम उमेदवारांची यादी जाहीर करील.”

boy and girl conversation my dreams joke
हास्यतरंग : माझी स्वप्न…
bjp ravindra chavan
Ravindra Chavan : ‘उपरा’ डोंबिवलीकर ते भाजप प्रदेश…
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू
मानव-वन्यजीव संघर्ष : चंद्रपूर जिल्ह्यात ३७ वन्यप्राण्यांचा तर २९ नागरिकांचा मृत्यू

काँग्रेस हा लोकशाही प्रक्रियेचे पालन करणारा पक्ष

‘द इंडियन एक्स्प्रेस’शी बोलताना पक्षाच्या एका दिग्गज नेत्याने सांगितले की, पक्षाच्या यादीत निवडणूक लढविण्यास इच्छुक असणार्‍या सर्वांच्या नावांचा समावेश आहे. काँग्रेस हा लोकशाही प्रक्रियेचे पालन करणारा पक्ष आहे. प्रामुख्याने उमेदवार निवडताना जिंकण्याची क्षमता पहिली जाते. उमेदवाराचे नाव जाहीर करण्यापूर्वी इतरही बाबी पहिल्या जातात. एखाद्या मतदारसंघात अन्य पक्षाचा कार्यकर्ता किंवा नेता मजबूत असल्याचे हायकमांडला वाटले, तर तेही लक्षात घेतले जाते. निवडणुका जवळ असताना कधी कधी बड्या नेत्यांनाही उमेदवार म्हणून घोषित केले जाते.”

इच्छुक उमेदवारांच्या या यादीत सोनिपत मतदारसंघातून सर्वांत जास्त ७९ उमेदवारांनी अर्ज केला आहे; तर रोहतक मतदारसंघातून सर्वांत कमी म्हणजे केवळ तीन उमेदवार या जागेसाठी इच्छुक आहेत. ७ फेब्रुवारीपर्यंत अर्ज सादर केलेल्या २९९ इच्छुक उमेदवारांपैकी २०१९ साली केवळ एका व्यक्तीनेच निवडणूक लढवली होती आणि ती व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ काँग्रेस नेते व तोशमचे आमदार किरण चौधरी यांच्या कन्या माजी खासदार श्रुती चौधरी. हरियाणा प्रदेश काँग्रेस कमिटीच्या चार कार्यकारी अध्यक्षांपैकी एक असलेल्या श्रुती चौधरी यांनी भिवानी-महेंद्रगड लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यासाठी अर्ज केला आहे. इतर चार इच्छुक उमेदवारांनीही या जागेसाठी अर्ज केला आहे.

२०१९ मध्ये अंबालामधून कुमारी सेलजा, कुरुक्षेत्रातून निर्मल सिंह, सिरसामधून अशोक तंवर, हिसारमधून भव्या बिश्नोई, कर्नालमधून कुलदीप शर्मा, सोनिपतमधून भूपिंदर सिंग हुडा, रोहतकमधून दीपेंद्र सिंग हुडा, भिवानीमधून श्रुती चौधरी, गुडगावमधून सिंग यादव, फरिदाबादमधून अवतार सिंग भदाना यांनी निवडणूक लढवली. मात्र, भाजपाच्या उमेदवारांकडून या सर्वांचा पराभव झाला. त्यापैकी अशोक तंवर आणि भव्य बिश्नोई आता भाजपामध्ये असून, बिश्नोई हे आदमपूरमधून हरियाणा विधानसभेत भाजपाचे प्रतिनिधित्व करीत आहेत.

उत्तराखंडच्या एआयसीसी प्रभारी, सरचिटणीस कुमारी सेलजा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “पूर्वीही मी तिकिटासाठी अर्ज केला नव्हता. मला कुठून उमेदवारी द्यायची आहे, हे पक्षाचे हायकमांड ठरवतील. मला यावेळी विधानसभा निवडणूक लढवायची आहे. हे पक्षाला मी आधीच कळवले आहे.” विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री भूपिंदर सिंग हुड्डा यांनी ‘द इंडियन एक्स्प्रेस’ला सांगितले, “मी कधीही तिकिटासाठी अर्ज केलेला नाही. कोण कोणत्या मतदारसंघातून निवडणूक लढवेल ते पक्षच ठरवेल. पक्षाचे कार्यकर्ते उमेदवारीसाठी अर्ज करीत आहेत हे चांगले आहे. त्यांचाही विचार केला जात असल्याची त्यांची भावना आहे. सर्व अर्ज तपासल्यानंतर हायकमांड अंतिम निर्णय घेईल. पक्ष जो निर्णय घेईल, त्याच्याशी मी सहमत असेल.”

हेही वाचा : नझूल जमिनीवरील अवैध बांधकामामुळे उत्तराखंडमध्ये हिंसाचार, पण ‘नझूल जमीन’ म्हणजे काय? वाचा सविस्तर…

२०१९ मध्ये हरियाणात भाजपाने संपूर्ण १० जागा जिंकत जोरदार विजय मिळवला होता. भाजपाचे संजय भाटिया यांनी कुलदीप शर्मा यांचा ६.५ लाख मतांनी पराभव केला होता; तर कृष्ण पाल गुर्जर यांनी अवतार सिंग भदाना यांना ६.३ लाख मतांनी पराभूत केले होते. या दोन्ही जागांवर सर्वांत जास्त मतांच्या अंतराने काँग्रेसचा पराभव झाला होता. तर, याला अपवाद म्हणजे भूपिंदर हुडा यांचा मुलगा दीपेंद्र हुडा हा अरविंद कुमार शर्मा यांच्याकडून केवळ ७,५०० मतांनी पराभूत झाला होता. खुद्द भूपिंदर हुडा यांचाही रमेश चंदर कौशिक यांच्याकडून १.६ लाख मतांनी पराभव झाला होता; तर श्रुति चौधरी यांचा धरमबीर यांच्याकडून ४.४ लाख मतांनी पराभव झाला.

Story img Loader