वसई : वसईच्या राजकारणात प्रमुख पक्ष असलेल्या बहुजन विकास आघाडीने यंदाची लोकसभा निवडणुक लढविण्याचा निर्णय अखेर जाहीर केला आहे. मागील काही निवडणुकांचा अनुभव पहाता हितेंद्र ठाकूर यांचा हा पक्ष पालघर जिल्ह्यात लक्षवेधी मते घेतो असा अनुभव आहे. २००९ मध्ये झालेल्या निवडणुकीत या पक्षाचा खासदारही निवडून आला होता. राज्यातील बदललेल्या राजकीय समीकरणात ठाकूरांचा पक्ष कोणता निर्णय घेतो याविषयी सर्वत्र उत्सुकता असताना बहुजन विकास आघाडीचा हा निर्णय भाजप-शिवसेनेच्या पथ्यावर पडेल का अशी नवी चर्चा आता या मतदारसंघात सुरु झाली आहे.

मागील काही दिवसांपासून संपूर्ण जिल्ह्यात बहुजन विकास आघाडीच्या बैठकांना सुरवात झाली आहे. वसई विरारच्या राजकारणात आमदार हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे वर्चस्व आहे. पक्षाचे तीन आमदार असून गेल्या अनेक वर्षांपासून महापालिकेत एकहाती सत्ता आहे. पालघर जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्था तसेच सहकार क्षेत्रावरही या पक्षाची पकड आहे. २००९ मध्ये पक्षाचे बळीराम जाधव हे खासदार म्हणून निवडून आले होते. ३ आमदार असल्याने पक्षाचे महाराष्ट्राच्या राजकारणात वजन आणि महत्व आहे. हितेंद्र ठाकूर यांनी विधानपरिषद आणि राज्यसभेच्या निवडणुकीत भाजपाला साथ दिली होती. राज्यातही शिंदे-फडणवीस सरकारला पाठिंबा दिला आहे. त्यामुळे या लोकसभा निवडणुकीत बहुजन विकास आघाडी उतरणार नाही, असे वातावरण तयार केले जात होते. परंतु गेल्या काही दिवसात राजकीय चित्र झपाट्याने बदलू लागले आहे. मागील दोन तीन दिवसांपासून पक्षाने जिल्ह्यात ठिकठिकाणी आपल्या कार्यकर्त्यांच्या बैठका घेण्यास सुरवात केली आहे. गेल्या काही दिवसांपासून पक्षाचे आमदार आणि स्थानिक नेते विविध विकास कामांचे उद्घटन आणि लोकार्पण करत होते. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता जाहीर होण्याच्या पुर्वसंध्येलाच बहुजन विकास आघाडीने लोकसभा निवडणूक लढविणार असल्याचे पक्षाचे प्रवक्ते आणि संघटक अजीव पाटील यांनी जाहीर केले आहे. गेल्या काही दिवसांपासून बहुजन विकास आघाडी निवडणूक लढविणार नाही वगैरे अफवा पसरविल्या जात होत्या. मात्र आम्ही यंदाही निवडणूक लढवून १०० टक्के विजयी होऊ, असे पाटील सांगितले.

mamata banerjee
‘काँग्रेस, कम्युनिस्ट हे भाजपाचे एजंट’, ममता बॅनर्जी इंडिया आघाडीवर कडाडल्या
Hitendra Thakur, left, support from the left,
डाव्यांची साथ नसल्याने हितेंद्र ठाकूर यांच्या पक्षाच्या उमेदवाराला फटका बसणार ?
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश
Hemant Godse still hopeful for Nashik seat It is claimed that Chief Minister is also insistent
नाशिकच्या जागेसाठी हेमंत गोडसे अजूनही आशावादी, मुख्यमंत्रीही आग्रही असल्याचा दावा

हेही वाचा : गावपातळीवरील प्रचाराची तऱ्हाच निराळी

कुणाच्या पथ्यावर ?

बहुजन विकास आघाडी हा स्थानिक पक्ष असून विकास कामे हेच त्यांचे धोरण आणि प्रचाराचा मुद्दा असतो. अद्याप इंडिया आघाडी किंवा महायुतीने पालघर मधील आपला उमेदवार जाहीर केलेला नाही. पालघरची जागा भाजप लढविणार की शिंदे गटाची शिवसेना लढविणार ते देखील अधिकृतपणे नक्की झालेले नाही. अशा वेळी बहुजन विकास आघाडीने निवडणुक लढविण्याची घोषणा केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. उमेदवार कोण असेल ते नेहमीप्रमाणे गुलदस्त्यात ठेवले आहे. आम्ही कार्यकर्त्यांशी सभा घेऊन त्यांची मते जाणून घेत आहोत. कार्यकर्ते ठरवतील तोच उमेदवार असेल असे अजीव पाटील यांनी सांगितले. उमेदवाराचे नाव नंतर जाहीर केले जाईल असे त्यांनी सांगितले.

हेही वाचा : विदर्भातील राजकीय रणांगण बिनचेह-यांचे !

या निवडणुकीत बहजुन विकास आघाडी उतरणार असल्याने तिरंगी लढत होणार असल्याचे आता स्पष्ट झाले आहे. गेल्या काही वर्षात शिवसेना, राष्ट्रवादी पक्ष फुटला आहे. त्यामुळे पक्षाला आपले मतदार किती आहेत त्याची चाचपणी करता येणार आहे. त्यावरून पुढील विधानसभा आणि महापालिका निवडणुकांचे आखाडे बांधता येणार आहे. बहुजन विकास आघाडीला पुढील राजकीय भविष्यासाठी बहुजन विकास आघाडीला ही लोकसभा निवडणूक महत्वपूर्ण ठरणार आहे.