राजेश रंजन ऊर्फ पप्पू यादव आता काँग्रेसमध्ये दाखल झाले असून, त्यांचा पक्ष पूर्णपणे काँग्रेसमध्ये विलीन झाला आहे. पप्पू यादव काँग्रेसमध्ये गेल्याने काँग्रेसला मोठा फायदा होऊ शकतो, असे मानले जात आहे. सीमांचलमध्ये पप्पू यादव यांचा बराच प्रभाव असल्याचे मानले जाते. पप्पू यादव १९९१ ते २०१४ पर्यंत पाच वेळा ते खासदार राहिले आहेत. याआधी ते मधेपुरा लोकसभा मतदारसंघांतर्गत येणाऱ्या सिंहेश्वर विधानसभा मतदारसंघातून अपक्ष आमदारही होते. खरं तर दुसऱ्या टप्प्यात पूर्णिया लोकसभा मतदारसंघात निवडणूक होत आहे. होळीनंतर लगेच म्हणजेच २८ मार्चपासून येथे नावनोंदणी सुरू होईल. यापूर्वी तीनदा पूर्णियातून खासदार म्हणून निवडून आलेले राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव यांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन झाल्यानंतर महाआघाडीच्या उमेदवाराबाबतची शक्यता दूर झाल्याचं म्हटलं तरी इंडिया आघाडीत या जागेवरून वाद होण्याची शक्यता आहे. इंडिया आघाडीतील जागावाटपाची औपचारिक घोषणा अद्याप व्हायची असली तरी काँग्रेसने पूर्णिया जागेवर आधीच दावा केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

पूर्णियातून निवडणूक लढवण्याची घोषणा

राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव यांनी काँग्रेसमध्ये येण्यापूर्वी बराच काळ पक्ष वाढीसाठी मेहनत घेतली होती. जन अधिकार पक्षाचे आधारस्तंभ या नात्याने पूर्णियातून कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवणार असल्याची त्यांनी घोषणा केली होती, त्यांच्या काँग्रेस प्रवेशामुळे ते येथे महाआघाडीचे उमेदवार ठरण्याची शक्यता अधिक आहे. राजदला हिरवा कंदील न मिळाल्याने यात अडचण निर्माण झाल्याची अटकळ राजकीय वर्तुळात बांधली जात आहे. आचारसंहिता लागू होण्याच्या अवघ्या तीन दिवस आधी पप्पू यादव यांनी राजद अडचणीत अडकल्याचा आरोप फेटाळून लावला होता. एनडीएच्या अंदाजानुसार, या निवडणुकीतही पूर्णियाची जागा जेडीयूच्या खात्यात आहे. सध्या जेडीयूचे खासदार संतोष कुमार कुशवाह यांनी येथून सलग दोन विजय नोंदवले आहेत. गेल्या निवडणुकीत त्यांचे प्रमुख प्रतिस्पर्धी काँग्रेसचे उदयसिंग होते, मात्र विजय-पराभवातील फरक तीन लाखांहून अधिक होता. त्यामुळे पुन्हा एकदा एनडीएकडून संतोषकुमार कुशवाह मैदानात उतरण्याची शक्यता आहे. दोन्ही आघाड्यांमधून ही शक्यता आकाराला आली तर निश्चितच येथील लढत रंजक होणार आहे. दोन्ही बाजूंच्या वाटाघाटीमध्ये सामील असलेल्या नेत्यांच्या मते, आरजेडीने पप्पू यादव यांना पूर्णियाची जागा देण्यास नकार दिला आहे. काँग्रेसने निर्णय घेण्यासाठी गुरुवारी सायंकाळपर्यंतची मुदत दिली असून, पक्ष आपल्या निर्णयावर ठाम राहिल्यास काँग्रेसने एकट्याने निवडणूक लढवण्याची धमकी दिली आहे. पप्पू यादव काय आम्हाला धमक्या देतात, यादव व्होटबँक जमवण्याचा ते दावा करतात ती आमच्याकडे आधीपासूनच आहे, असे राजदच्या एका वरिष्ठ नेत्याने सांगितले.

हेही वाचाः पोटनिवडणुकीनंतर हिमाचलमधील काँग्रेस सरकार कोसळण्याची भीती; राज्यसभेतील क्रॉस व्होटिंग प्रकरण भोवणार?

काँग्रेस सरचिटणीस प्रियंका गांधी वाड्रा यांनी पप्पू यादव यांना पक्षात सामील करण्यात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. पण पप्पू यादव यांच्या जवळच्या सूत्रांनी हे पाऊल उचलण्याआधी राजदला नेहमीच विश्वासात घेतले होते. मंगळवारी संध्याकाळी पप्पू यादव यांनी काँग्रेसमध्ये सामील होण्यासाठी दिल्लीला जाण्यापूर्वी आरजेडीचे प्रमुख लालू प्रसाद आणि बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते तेजस्वी यादव यांची भेट घेतली होती. आरजेडीच्या आशीर्वादानेच ते काँग्रेसमध्ये सामील झालेत. ते मधेपुरामधून निवडणूक लढवू शकतात, परंतु आम्ही पूर्णियासाठी आग्रह धरला आहे, ज्यावर पप्पू यादव एक वर्षाहून अधिक काळ काम करीत आहेत,” असेही पप्पू यादव यांच्या जवळच्या व्यक्तीने सांगितले.

हेही वाचाः बलात्कार प्रकरणातील आरोपीची पाठराखण करणारा ‘हा’ भाजपाचा नेता काँग्रेसमध्ये; कसा आहे त्यांचा राजकीय प्रवास

पप्पू यादव यांनी मधेपुरा लोकसभा मतदारसंघातून दोनदा आणि पूर्णिया मतदारसंघातून तीनदा विजय मिळवला. त्यांच्या पत्नी रंजिता रंजन या छत्तीसगडमधून काँग्रेसच्या राज्यसभा सदस्य आहेत. सीमांचलच्या मागासलेल्या पट्ट्यातील पूर्णिया लोकसभा मतदारसंघातील सुमारे १९ लाख मतदारांपैकी २१ टक्के मतदार मुस्लिम आहेत आणि त्यात यादवांची ६ टक्के लोकसंख्या आहे. JD(U) चे विद्यमान खासदार संतोष कुमार यांनी पप्पू यादव यांच्या उमेदवारीबाबतच्या शक्यतांच्या पार्श्वभूमीवर मोठं वक्तव्य केलं आहे. यादव आणि मुस्लिमांशिवाय त्यांना कोण मत देणार आहे. दुसरीकडे एनडीएला पाच जातींचा पाठिंबा आहे, कुर्मी-कुशवाह समाज, महादलित, अत्यंत मागास जाती, पासवान आणि इतर सर्व जाती या भाजपाबरोबर आहेत. २०१९ च्या निवडणुकीत त्यांना जवळपास ३०-३२ टक्के मते मिळतील, तर आम्ही ६० टक्क्यांच्या जवळ जाऊ,” असेही संतोष कुमार म्हणालेत. दरम्यान, सिवान लोकसभा मतदारसंघही वादाचा केंद्रबिंदू ठरत आहे. सीपीआय (एमएल) ने या जागेवर दावा केला आहे, परंतु आरजेडी सोडण्यास तयार नाही. आरजेडी आणि सीपीआय (एमएल) यांच्यातील चर्चा या मुद्द्यावरून ठप्प झाली आहे. ते आम्हाला फक्त तीन जागांवर रोखू इच्छितात. परंतु आता विधानसभेतील आमच्या ताकदीनुसार, त्यांनी आम्हाला सिवानसह किमान पाच जागा द्याव्यात, असे सीपीआय (एमएल) नेत्याने सांगितले.

पप्पू यादव १९९१ मध्ये पहिल्यांदा खासदार म्हणून निवडून आले होते

काँग्रेसमध्ये दाखल झालेले राजेश रंजन उर्फ ​​पप्पू यादव १९९१ मध्ये पूर्णिया मतदारसंघातून पहिल्यांदा खासदार झाले होते. १९९६ मध्येही ते सलग दुसऱ्यांदा विजयी झाले होते. १९९९ मध्ये ते तिसऱ्यांदा खासदार म्हणून निवडून आले. परंतु कुशवाह २०१४ पासून इथून खासदार आहेत. पूर्णियाचे खासदार संतोष कुमार कुशवाह यांनी सलग दोन विजय नोंदवले आहेत. २०१४ मध्ये त्यांनी पहिल्यांदाच निवडणूक जिंकून सर्वांना चकित केले. नंतर २०१९ च्या निवडणुकीत ते सुमारे तीन लाख मतांनी विजयी झाले. पक्षाकडून औपचारिक घोषणा होणे बाकी असले तरी ते येथून निवडणूक लढवणार हे निश्चित मानले जात आहे.

मराठीतील सर्व सत्ताकारण बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Pappu yadav jan adhikar party merges with congress india failure again in the alliance vrd
Show comments