राजस्थानमध्ये प्रचाराच्या तोफा आता थंडावल्या आहेत. या विधानसभा निवडणुकीत काँग्रेस पक्षाने आपले अंतर्गत वाद बाजूला सारत सर्वांनी एकत्र येत निवडणूक लढवली. आपली सत्ता कायम राखण्यासाठी या पक्षाने पूर्ण ताकदीने प्रयत्न केला. मात्र, एकीकडे निवडणुकीचा प्रचार जोमात असताना काँग्रेसचे नेते अशोक गहलोत आणि सचिन पायलट यांच्यातील याआधीच्या वादाची नेहमीच चर्चा होत राहिली. या वादाचा भाजपानेही फायदा घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, आता गहलोत आणि सचिन पायलट हे अद्यापही एकत्र असून त्यांच्यात कोणतेही मतभेद नाहीत, असे सांगण्याचा प्रयत्न काँग्रेसकडून करण्यात आला आहे. त्याचाच एक भाग म्हणून काँग्रेसने या निवडणुकीच्या शेवटच्या क्षणी सचिन पायलट यांचा संदेश देणारा एक व्हिडीओ जारी केला आहे.

अशोक गहलोत प्रचाराच्या केंद्रस्थानी

या व्हिडीओत सचिन पायलट राजस्थानच्या जनतेला काँग्रेसलाच मतदान करा, असे आवाहन करताना दिसत आहेत. विशेष म्हणजे हा व्हिडीओ अशोक गहलोत यांनीदेखील शेअर केला आहे. काँग्रेसने आपल्या प्रचारात अशोक गहलोत यांनाच केंद्रस्थानी ठेवले. ठिकठिकाणी गहलोत यांचेच प्रतिमासंवर्धन करण्याचा प्रयत्न करण्यात आला. शेवटी मात्र राजकीय महत्त्व आणि संभाव्य फायदा ओळखून सचिन पायलट यांच्याकडून काँग्रेसने हा आवाहनपर व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ आपल्या समाजमाध्यम खात्यांवर शेअर करून, सचिन पायलट आणि माझ्यात कोणतादी वाद नाही, आम्ही दोघेही एकत्र निवडणूक लढवत आहोत, काँग्रेसच्या विजयासाठी प्रयत्न करत आहोत, असे सांगण्याचा प्रयत्न अशोक गहलोत यांनी केला आहे. विशेष म्हणजे हा व्हिडीओ शेअर करताना अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांचा युवा नेता असा उल्लेख केला आहे, तर दुसरीकडे भूतकाळातील सर्व गोष्टी विसरून काँग्रेसला विजयी करण्यासाठी काँग्रेसच्या ‘हाताचा पंजा’ याच निवडणूक चिन्हाचे बटण दाबा, असे आवाहन सचिन पायटल यांनी या व्हिडीओमध्ये केले आहे.

Ganesh Naik, Thane, eknath shinde,
गणेश नाईक यांची ठाणे लोकसभेच्या उमेदवारीवरून प्रतिक्रिया, मुख्यमंत्र्यांना भेटलो, हस्तांदोलन झाले आणि…
loksatta explained article, Chief Minister, BJP, seat allocation, influence, eknath shinde, mahayuti, lok sabha election 2024
विश्लेषण : जागावाटपात भाजपवर मुख्यमंत्र्यांची सरशी? महायुतीत शिंदेंचा प्रभाव वाढतोय का?
Delhi Police issues notice to Telangana Chief Minister Revanth Reddy for tampering with Home Minister Amit Shah footage
तेलंगणच्या मुख्यमंत्र्यांना चौकशीसाठी पाचारण; गृहमंत्री अमित शहा यांच्या चित्रफितीत फेरफार केल्याचा आरोप
vishal patil sanjay raut
“…म्हणून भाजपाने लिफाफा घेऊन दुसरा उमेदवार पाठवला”, राऊतांचा विशाल पाटलांना टोला; म्हणाले, “त्यांच्यामागे…”

२०० पैकी साधारण ४० जागांवर गुज्जर समाजाची संख्या लक्षणीय

सचिन पायलट हे गुज्जर समाजातून येतात. गुजरातमध्ये या समाजाचे प्रमाण साधारण ९ ते १० टक्के आहे. म्हणजेच निवडणुकीच्या दृष्टिकोनातून हा समाज फार महत्त्वाचा आहे. राजस्थानमधील एकूण २०० पैकी साधारण ४० मतदारसंघांत या समाजाचे प्रमाण लक्षणीय आहे. त्यामुळे निवडणूक जिंकायची असेल तर या समाजाची मतं काँग्रेसला गरजेची आहेत. गेल्या निवडणुकीत या ४० जागांपैकी बहुसंख्य जागांवर काँग्रेसचा विजय झाला होता. काँग्रेस सत्तेत आल्यास सचिन पायलट मुख्यमंत्री होतील, या एका आशेपोटी गुज्जर समाजाने काँग्रेसला मत दिले होते. मात्र, ऐनवेळी अशोक गहलोत यांची मुख्यमंत्रिपदी निवड करण्यात आली. सध्याच्या निवडणुकीतही गुज्जर समाजाची मते भाजपाकडे जाऊ नयेत म्हणून काँग्रेसने आता सचिन पायलट यांना पुढे करत काँग्रेस पक्षाला मतदान करण्याचे आवाहन केले आहे.

गुज्जर समाज मतदान करणार का?

मागील अनेक दिवसांपासून सचिन पायलट हे मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी प्रयत्न करत आहेत. या खुर्चीसाठी त्यांनी एकदा बंडदेखील केले. मात्र, प्रत्येकवेळी त्यांना अपयशच आले. याच कारणामुळे गुज्जर समाजही अस्वस्थ असल्याचे म्हटले जाते. परिणामी या निवडणुकीत काँग्रेसला गुज्जर समाज मतदान करणार का? हे पाहावे लागणार आहे. अलवरपासून ते झालावाड जिल्ह्यापर्यंत गुज्जर समाजाचे लोक राहतात.

सचिन पायलट यांना दिले प्रचारासाठी हेलिकॉप्टर

काँग्रेसने या निवडणुकीत अशोक गहलोत यांनाच केंद्रस्थानी ठेवून प्रचार केला. मात्र, काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सचिन पायलट यांचे वडील राजेश पायलट यांचा उल्लेख करत काँग्रेसवर टीका केली. याच कारणामुळे गुज्जर समाजाची मते दुरावण्याची शक्यता लक्षात घेऊन काँग्रेसने सचिन पायलट यांनाही प्रचारादरम्यान महत्त्वाचे स्थान दिले. मोदी यांच्या टीकेनंतर काँग्रेसने आपल्या पोस्टर्समध्ये सचिन पायलट यांना महत्त्वाचे स्थान दिले. तसेच गेल्या काही दिवसांपासून सचिन पायलट यांना प्रचारासाठी एक हेलिकॉप्टर देण्यात आले. पूर्व राजस्थानमध्ये जास्तीत जास्त ठिकाणी पायलट यांना प्रचार करता यावा, म्हणून हा निर्णय घेण्यात आला. गेल्या काही आठवड्यांत सचिन पायलट यांनी एका दिवशी साधारण चार ते पाच सभांना संबोधित केलेले आहे.

त्यामुळे आगामी काळात नेमके काय होणार? काँग्रेसला अपेक्षेप्रमाणे गुज्जर समाजाची मते मिळणार का? काँग्रेस निवडणूक जिंकणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.