एजाज हुसेन मुजावर

सोलापूर : आगामी लोकसभा आणि विधानसभेसह स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजप व काँग्रेसह इतर पक्षांची आपापल्या कुवतीप्रमाणे तयारी झाली आहे. विशेषतः लोकसभेसाठी भाजपचे सूक्ष्मनियोजन होत असताना काँग्रेसने आमदार प्रणिती शिंदे यांची उमेदवारी गृहीत धरून हालचाली सुरू केल्या आहेत. तर दुसरीकडे शरद पवारप्रणीत राष्ट्रवादी काँग्रेसमध्येही आमदारकीसाठी तिघा प्रमुख दावेदारांनी राजकीय पर्याय खुले ठेवत सोलापूर शहर मध्यच्या जागेवर लढण्याची तयारी सुरू केली आहे.

Ambedkarist activists active in support of Mavia Discuss the danger of changing the constitution
‘मविआ’च्या समर्थनार्थ आंबेडकरवादी कार्यकर्ते सक्रिय; राज्यघटना बदलली जाण्याच्या धोक्याची चर्चा
NCP releases manifesto
भाजपला नकोसे मुद्दे राष्ट्रवादीच्या जाहीरनाम्यात; जातनिहाय जनगणना, किमान आधार मूल्याचे अजित पवार गटाकडून आश्वासन
Prakash Ambedkar, North Indians,
“भाजपला मनसेच्या पाठिंब्यामुळे उत्तर भारतीयांमध्ये असुरक्षिततेची भावना”, प्रकाश आंबेडकरांचे विधान; म्हणाले, “भाजपने…”
25 prominent politicians joined BJP
आधी भ्रष्टाचाराच्या आरोपांनी ‘कलंकित’; भाजपमध्ये येताच ‘चकचकीत’

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अलिकडे फूट पडल्यानंतर या पक्षाचा सोलापूर जिल्ह्यातील उरलासुरला बालेकिल्ला पूर्णतः ढासळला असताना सुदैवाने सोलापूर शहरात पक्षाची ताकद जेमतेम स्वरूपात असून पक्ष काही अपवाद वगळता जवळपास अभेद्य राहिला आहे. नेहमीच राजकीय विश्वासार्हतेच्या मुद्यावर चर्चेत राहणारे माजी महापौर महेश विष्णुपंत कोठे, माजी आमदार दिलीप माने आणि तौफिक इस्माईल शेख यांची भूमिका आगामी विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर उत्सुकतेचा विषय ठरला आहे. महेश कोठे यांनी आमदारकीसाठी सुशीलनिष्ठा सोडून दहा वर्षांपूर्वी काँग्रेसमधून शिवसेनेत गेले होते. परंतु तरीही आमदारकीची माळ गळ्यात पडली नाही म्हणून पुन्हा दुस-यांदा ताकद पणाला लावली.

हेही वाचा >>> मराठवाड्यातील कोरड्या सिंचनाच्या दुसऱ्या भागाचे ‘ढोलताशे’

परंतु आमदारकीचे स्वन अपुरेच राहिले. त्यामुळे त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसशी घरोबा केला. त्यातही राज्यात सत्तांतराचे नाट्य घडून एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री झाले, तेव्हा महेश कोठे यांच्या राजकीय भूमिकेत गोंधळ सुरू झाला असता त्यांची राजकीय विश्वासार्हता पुन्हा कसोटीला लागली. याच पार्श्वभूमीवर राष्ट्रवादीत मोठी फूट पडून अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील गट भाजपबरोबर सत्तेत सहभागी झाला असता सोलापूर शहरात शरद पवार यांच्या नेतृत्वाला फारसा धक्का लागला नाही. अशा अडचणीच्या प्रतिकूल काळात महेश कोठे यांनी पुण्यातील काही उद्योजकांच्या सहकार्याने सोलापुरात आयटी पार्कची उभारणी हाती घेतली. या आयटी पार्कच्या भूमिपूजनासाठी शरद पवार यांना आमंत्रित करून आपली निष्ठा दाखवून दिली. त्याशरद पवार यांनीही कोठे यांना शहरात मोकळीक दिलेली.

हेही वाचा >>> धनंजय मुंडे यांचा लातूरकरांना हिसका

आगामी विधानसभा निवडणूक लढविण्यासाठी सध्या भाजपचा मजबूत बालेकिल्ला राहिलेल्या सोलापूर शहर उत्तर मतदारसंघात उभे राहण्याची तयारी कोठे यांनी चालविल्याचे स्पष्ट संकेत मिळाले. परंतु यात आता कोठे यांची धरसोडीची भूमिका पाहायला मिळत आहे. विधानसभेची जागा कोठे हे लढविणार आहेत, हे स्पष्ट झाले असले तरी नेमक्या कोणत्या मतदारसंघातून शहर उत्तर की शहर मध्य जागेवरून ? महत्वाचे म्हणजे कोणत्या पक्षाकडून, या प्रश्नावर चर्चा सुरू झाली आहे. कोठे हे शरद पवार यांच्याजवळ असले तरी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही तेवढेच मधूर संबंध टिकवून आहेत. त्यामुळे विधानसभा निवडणुकीत राजकीय वा-याची दिशा ओळखून सोयीनुसार भूमिका ठरविण्याची महेश कोठे यांची मानसिकता दिसून येते.

हेही वाचा >>> भाजपच्या खेळीने नाना पटोलेंच्या इच्छेवर पाणी

सोलापूर शहर उत्तर विधानसभेची जागा भाजपचा अभेद्य बालेकिल्ला असून येथे आमदार विजय देशमुख हे सलग चारवेळा प्रचंड मताधिक्याने निवडून येत एकहाती वर्चस्व टिकवून आहेत. महेश कोठे यांनी यापूर्वी २००९ सालच्या विधानसभा निवडणुकीत याच मतदारसंघातून काँग्रेसकडून भवितव्य अजमावून पाहिले होते. या मतदारसंघातून उभे राहण्याची तयारी कोठे यांनी चालविल्याचे वरवर दिसून येत असले तरी त्यादृष्टीने त्यांचे धाडस होईल काय, याची सार्वत्रिक उत्सुकता आहे. अलिकडे राष्ट्रवादीच्या फाटाफुटीनंतर सोलापूर शहर युवक अध्यक्ष निवडीची प्रक्रिया राबविण्यात आली. यात अक्षय वाकसे, सर्फराज शेख आणि नजीब शेख यांच्यात स्पर्धा होती. महेश कोठे यांनी वाकसे यांच्या बाजूने ताकद लावून बाजी मारली. वाकसे हे शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील सलगर वस्ती भागात राहतात. कोठे यांची इच्छा जर शहर उत्तर विधानसभेच्या जागेवर आमदारकीची निवडणूक लढविण्याची असेल तर त्यांनी शहर मध्य भागातील कार्यकर्त्याला युवक अध्यक्षपद का मिळवून दिले, असा सवाल आता पक्षाच्या वर्तुळात उपस्थित केला जात आहे.

यात आणखी वैशिष्ट्य असे की, पक्षाचे शहराध्यक्ष भारत जाधव, महिला शहराध्यक्षा सुनीता रोटे आणि नवीन युवक शहराध्यक्ष अक्षय वाकसे हे तिघेही शहर मध्य विधानसभा मतदारसंघातील-एकाच प्रभागातील आहेत. पक्षाचे सर्व चारही नगरसेवकही याच एकमेव प्रभागातील होते. त्यापैकी तिघेजण अलिकडे अजित पवार यांच्या गोटात सामील झाले आहेत. युवक शहराध्यक्षपदासाठी हाॕटेल व्यावसायिक नजीब शेख यांच्या नावाचा आग्रह दुसरे नेते तौफिक शेख यांनी धरला होता. त्यांची निराशा झाली असून याच पार्श्वभूमीवर तौफिक शेख हे अजित पवार यांच्या गोटाशी संपर्क वाढविला आहे. हेच शेख यापूर्वी काँग्रेसमध्ये सुशीलनिष्ठ होते. नंतर २०१४ सालच्या विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर त्यांनी एमआयएमच्या माध्यमातून काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांना झुंजविले होते. तर तत्कालीन शिवसेनेचे महेश कोठे हे तिस-या क्रमांकावर फेकले गेले होते. कोठे आणि शेख दोघेही आमदारकीसाठी पुन्हा इच्छूक आहेत. काँग्रेस व शिवसेना प्रवास केलेले माजी आमदार दिलीप माने हे अलिकडे राष्ट्रवादी काँग्रेसच्या संपर्कात होते. पक्षाची फूट पडल्यानंतर बदलत्या समीकरणात त्यांची भूमिका तळ्यात-मळ्यात असल्याचे बोलले जाते. माने हे यापूर्वी २००९ साली दक्षिण सोलापूर मतदारसंघातून काँग्रेसतर्फे विधानसभेवर निवडून गेले होते.