राजस्थानचे माजी उपमुख्यमंत्री सचिन पायलट यांनी काँग्रेस नेतृत्वाच्या विरोधात जाऊन आपली पाच दिवसांची पदयात्रा अखेर सुरू केली. गुरुवारी (दि. ११ मे) अजमेरहून ही यात्रा निघाली. युवकांचे प्रश्न आणि राज्यातील भ्रष्टाचाराच्या विरोधात ही यात्रा काढली असल्याचे सचिन पायलट सांगत असले तरी विद्यमान मुख्यंमत्री अशोक गेहलोत यांच्या विरोधात स्वतःचे नेतृत्व प्रस्थापित करण्याचा त्यांचा हा प्रयत्न असल्याचे बोलले जाते. गुरुवारी जयपूरहून ट्रेनने अजमेरला आल्यानंतर पायलट यांनी अशोक पार्क येथे एक छोटीशी सभा घेऊन आपली यात्रा सुरू केली. काँग्रेस पक्षाने त्यांना बाजूला सारल्याबाबत माध्यमांनी प्रश्न विचारला असता, पायलट म्हणाले, “राजकारण हा आगीचा समुद्र असून, तो पोहूनच मला पलीकडे जायचे आहे.”

पोहून पलीकडे जायचे आहे, याचा अर्थ पायलट यांना अजमेर ते जयपूर ही १२५ किलोमीटरची यात्रा या कडक उन्हाळ्यात पाच दिवसांत पूर्ण करायची आहे. दररोज २५ किमी चालून पाच दिवसांत जयपूरला पोहोचण्याचे त्यांचे लक्ष्य आहे. ही यात्रा कुणा नेत्याच्या विरोधात नसून भ्रष्टाचाराच्या विरोधात आणि युवकांच्या महत्त्वाकांक्षा पूर्ण करण्यासाठी आहे. पायलट यांच्या यात्रेबाबत बोलत असताना मुख्यमंत्री अशोक गेहलोत म्हणाले की, जो सर्वांना सोबत घेऊन चालतो, तोच माणूस यशस्वी होतो. जो फक्त स्वतःसाठी गट-तट पाडून चालण्याचा प्रयत्न करतो, तो कधीही यशस्वी होत नाही.

congress bjp manifesto climate change
गेल्या पाच वर्षांत देशाला अतिवृष्टी, पूर, दुष्काळाचा फटका, याविषयी भाजपा-काँग्रेसच्या जाहीरनाम्यात काय?
Parambans Singh Romana on Narendra Modi
“आज ते असतील तर उद्या आपणही…”; मोदींच्या ‘त्या’ विधानावरुन शिरोमणी अकाली दल आक्रमक
PM narendra Modi about changing Constitution India Bloc Rahul Gandhi loksabha election 2024
“स्वत: आंबेडकर आले, तरी घटना बदलू शकत नाही”; या निवडणुकीत राज्यघटनेच्या मुद्यावरून एवढा वादंग का होतोय?
mayawati bsp in up loksabha
बसपच्या मुस्लिम, ब्राह्मण उमेदवार यादीमुळे इंडिया आघाडीसमोर नवे आव्हान; पारंपरिक व्होट बँकेवर कसा होणार परिणाम?

हे वाचा >> भाजपाच्या घोडेबाजारापासून काँग्रेसचे सरकार वाचविण्यासाठी वसुंधरा राजेंनी गेहलोत यांना मदत केली; राजस्थानमध्ये खळबळ

राजस्थानमधील काँग्रेसच्या दोन मोठ्या नेत्यांमध्ये सत्ताकारणावरून संघर्ष सुरू असताना काँग्रेस पक्षाने त्यांच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून एक व्हिडीओ ट्विट केला आहे. ज्यामध्ये अशोक गेहलोत विद्यार्थ्यांच्या प्रश्नांसंबधी चर्चा करताना दिसत आहेत. या व्हिडीओला ‘जन जन के मुख्यमंत्री’ असे कॅप्शन देण्यात आले आहे.

गेहलोत पुढे म्हणाले, “जेव्हा माझ्या नेतृत्वाखाली १९८८ साली पहिले मंत्रिमंडळ स्थापन झाले होते, तेव्हा मी सर्वांचा त्यात सहभाग करून घेतला होता. तुम्ही एकतर पक्षश्रेष्ठींचे माणूस होऊ शकता, सोनिया गांधींचे माणूस असू शकता किंवा काँग्रेसचे नेते होऊ शकता. मी अनेक लोक पाहिले जे गटातटाचे राजकारण करतात. तुझं-माझं (राजस्थानी भाषेत म्हणाले, तारी-म्हारी) करत बसतात, असे लोक कधीही यशस्वी होत नाहीत. ते पक्षाशीही प्रामाणिक राहत नाहीत.” मागच्या काही दिवसांपासून सचिन पायलट हे मुख्यमंत्री गेहलोत यांच्यावर तुटून पडत आहेत. भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावर त्यांनी आपल्याच सरकारविरोधात शड्डू ठोकला आहे.

सचिन पायलट यांनी भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरून ११ एप्रिल रोजी एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले होते. उपोषणस्थळी काँग्रेस पक्षाचे झेंडे आणि चिन्ह लावण्यात आले होते. अनेक आमदारांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता. मात्र त्या वेळी उपस्थित असलेले आमदार पदयात्रेत सामील झालेले नाहीत. तसेच पदयात्रेत पक्षाच्या झेंड्याच्या जागी राष्ट्रध्वज आणि देशभक्तिपर गीते वाजत आहेत. याबद्दल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष गोविंद सिंह दोतसारा म्हणाले की, या यात्रेचा आणि पक्षाचा काहीही संबंध नाही. पायलट यांचा हा व्यक्तिगत कार्यक्रम आहे. काँग्रेसची यात्रा असेल तरच पक्षाचा झेंडा, चिन्ह आणि राष्ट्रीय अध्यक्ष खरगे, राहुल गांधी आणि सोनिया गांधी यांचे फोटो वापरता येतात. या यात्रेसाठी पक्षाकडून किंवा अखिल भारतीय काँग्रेस समितीकडून परवानगी मागण्यात आलेली नाही.

हे ही वाचा >> Rajasthan : सोनिया गांधी नाही वसुंधरा राजे आहेत गेहलोत यांच्या खऱ्या नेत्या; सचिन पायलट यांची टीका

अजमेर लोकसभा मतदारसंघातून सचिन पायलट मागे खासदार राहिलेले आहेत. त्यामुळे त्यांचा या भागात चांगला दबदबा आहे. तसेच राजस्थान लोकसेवा आयोगाचे (RPSC) मुख्यालयदेखील अजमेर येथे आहे. मागच्या काही काळात आरपीएससीच्या पेपरफुटी प्रकरणामुळे युवकांमध्ये मोठ्या प्रमाणात नाराजी होती. या पेपरफुटीप्रकरणी पायलट यांनी राज्य सरकारला जबाबदार धरले आहे. पायलट या प्रकरणावर म्हणाले की, स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पहिल्यांदाच आरपीएससीच्या सदस्याला अटक झालेली आहे. पण एका अधिकाऱ्याला अटक करून हे प्रकरण संपणार? यामागे कोण लोक आहेत? या प्रकरणात मध्यस्थीची भूमिका घेणाऱ्याच्या (भूपेंद्र सरन) घरावर बुलडोझर कधी फिरवणार? असे काही प्रश्न उपस्थित करत पायलट यांनी ‘भारत माता की जय’ असा नारा देऊन आपले भाषण संपविले.

मागच्या रविवारी (दि. ७ मे) ढोलपूर येथे सभेत बोलत असताना अशोक गेहलोत यांनी सांगितले की, २०२० साली माजी मुख्यमंत्री आणि भाजपा नेत्या वसुंधरा राजे यांनी काँग्रेसचे सरकार पडण्यापासून वाचविले. त्यानंतर पायलट यांनी गेहलोत यांच्यावर जोरदार टीका केली. गेहलोत हे सोनिया गांधी यांचे नेते नसून वसुंधरा राजे यांचे नेते आहेत. तसेच कर्नाटकामध्ये काँग्रेस पक्ष आघाडीवर आहे, त्याचे कारण म्हणजे तिथे काँग्रेसने भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरला. त्यामुळे इथेही भ्रष्टाचाराचा मुद्दा लावून धरावा, असा त्यांचा आग्रह आहे.

२०२० साली भाजपाने काँग्रेस सरकार पाडण्यासाठी घोडेबाजार केला होता, असा आरोप गेहलोत यांनी केला. सरकार पाडण्यासाठी बंडखोर आमदारांनी भाजपाकडून पैसे घेतले होते आणि नंतर ते शाह यांना परत केले, असे विधान त्यांनी केले होते. या विधानावर प्रत्युत्तर देत असताना पायलट म्हणाले की, माझे कुटुंब मागच्या ४५ वर्षांपासून राजकारणात आहे. आजवर एकाही प्रतिस्पर्धी किंवा विरोधकांनीदेखील माझ्या चारित्र्यावर संशय घेतलेला नाही.