TMC on Parliament Security Breach : संसदेचं हिवाळी अधिवेशनात शुन्य प्रहारात खासदार त्यांचं म्हणणं मांडत असताना अचानक प्रेक्षक गॅलरीतून दोन तरुणांनी लोकसभेच्या सभागृहात उड्या मारल्या. यानंतर त्यांनी स्मोक कॅनमधून पिवळ्या रंगाचा धूर सोडला. यामुळे सभागृहात एकच गदारोळ झाला. या घटनेनंतर संसदेच्या सुरक्षेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. यावर अनेक प्रतिक्रिया येत आहेत. त्यात तृणमूल काँग्रेसच्या खासदारांचाही समावेश आहे. त्यांनी महुआ मोईत्रा यांच्यावरील कारवाईचा उल्लेख करत या सुरक्षेतील कमतरतेवर बोट ठेवलं आणि मोदी सरकारवर हल्लाबोल केला.

“…तर सभागृहातील प्रत्येकाचा मृत्यू झाला असता”

टीएमसीचे राज्यसभेतील खासदार साकेत गोखले म्हणाले, “काही दिवसांपूर्वीच मोदी सरकारने तृणमूल काँग्रेसच्या खासदार महुआ मोईत्रा यांना लोकसभेतून बडतर्फ केले. त्यांच्यावर संसदेच्या पोर्टलचा लॉग इन आयडी आणि पासवर्ड इतरांना दिल्याने राष्ट्रीय सुरक्षेचा भंग झाल्याचा आरोप केला. आज संसदेवरील हल्ल्याला २३ वर्षे पूर्ण झाले असताना काही घुसखोरांनी लोकसभेच्या चेंबरमध्ये येऊन गॅस सोडला. हा सुरक्षेचा गंभीर मुद्दा आहे. त्यांनी सोडलेला गॅस जर विषारी असता, तर सभागृहातील प्रत्येकाचा मृत्यू झाला असता.”

Santosh Parab attack case,
संतोष परब हल्ला प्रकरण : नितेश राणे यांना मंजूर जामीन रद्द करा, राज्य सरकारच्या याचिकेवर उच्च न्यायालयाची राणे यांना नोटीस
rahul gandhi clarifies his stance on the controversy over the congress manifesto
जातगणनेच्या नावाने ‘देशभक्त’ भयग्रस्त; राहुल गांधी यांची टीका, संपत्तीच्या फेरवाटपाच्या आरोपांनाही उत्तर
CM Mamata Banerjee On Attack NIA team
‘एनआयए’च्या पथकावर जमावाचा हल्ला, ममता बॅनर्जी यांनी तपास यंत्रणेच्या अधिकाऱ्यांनाच सुनावले, म्हणाल्या, “मध्यरात्री लोकांच्या घरात…”
aap party leader aatishi
‘आप’च्या नेत्या आतिशी यांना नोटीस; भाजपवर केलेल्या आरोपांबाबत उत्तर देण्याचे निर्देश

“काहीही घडू शकलं असतं, आम्ही मागणी करतो की…”

“कुणीतरी प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात उडी मारतं ही खूप धक्कादायक गोष्ट आहे. या दोन घुसखोरांना भेटीसाठीचा पास भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी दिला होता. भाजपा आणि मोदी सरकार या देशाच्या सुरक्षेशी किती तडजोड करणार आहेत. त्यांनी दोन घुसखोरांना संसदेत प्रवेश करून गॅस सोडू दिला.तेथे काहीही घडू शकलं असतं. आम्ही मागणी करतो की, प्रताप सिम्हा यांना तातडीने बडतर्फ करावं,” अशी मागणी साकेत गोखले यांनी केली.

व्हिडीओ पाहा :

“घुसखोर संसदेत कसे घुसले याचं मोदी सरकारने उत्तर द्यावं”

“ज्या दिवशी संसदेवर हल्ला झाला होता त्याच दिवशी हे घुसखोर संसदेत कसे घुसले, त्यांना संसदेत प्रवेश कसा मिळाला, त्यांनी देशाचे कायदे करणाऱ्यांची सुरक्षा धोक्यात कशी टाकली? याची उत्तरं मोदी सरकारने दिली पाहिजे,” अशीही मागणी साकेत गोखले यांनी केली.

“घुसखोरांना पास देणाऱ्या भाजपा खासदारावर काय कारवाई?”

टीएमसी खासदार डोला सेन म्हणाल्या, “टीएमसीच्या खासदार महुआ मोईत्रा यांनी केवळ लॉग इन पासवर्ड इतरांशी शेअर केला म्हणून सुरक्षेशी तडजोड केल्याचं सांगत त्यांना बडतर्फ करण्यात आलं. आता आम्हाला विचारायचं आहे की, भाजपा खासदार प्रताप सिम्हा यांनी लोकसभेत घुसखोरी करणाऱ्यांना प्रवेश पास दिले तो प्रकार सुरक्षेशी तडजोड नव्हती का?”

व्हिडीओ पाहा :

हेही वाचा : संसदेतील राड्याप्रकरणी अटक झालेल्या चौघांची नावं जाहीर, कटात लातूरच्या तरुणाचाही समावेश

“त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोटोही आहे”

“लोकसभेत प्रेक्षक गॅलरीतून सभागृहात कुणीतरी उडी मारली, गॅस सोडला आणि आणखीही काही घडू शकलं असतं. हा सुरक्षेचा मुद्दा नाही का? पास देणारा भाजपा खासदार आहे आणि त्यांचा पंतप्रधान नरेंद्र मोदींबरोबर फोटोही आहे. घुसखोरांकडे भाजपा खासदाराने स्वाक्षरी केलेलाच पास आहे. मग त्या भाजपा खासदाराला बडतर्फ का केलं जात नाही? या प्रकरणात नितिमत्ता समिती कुठे आहे?” असे प्रश्न डोला सेन यांनी विचारले.