छत्रपती संभाजीनगर : भाजपमध्ये घराणेशाहीला थारा नाही. सामान्य कार्यकर्ता पुढे येतो, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यापासून पक्षाचे दिल्ली ते गल्लीतील नेते वारंवार दावा करीत असतात. पण मराठवाड्यातील भाजपच्या नेत्यांचा त्याला अपवाद असावा. कारण रावसाहेब दानवे व बबनराव लोणीकर यांच्या पाठोपाठ केंद्रीय वित्त राज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी मुलगा व बहिणीला पुढे आणले आहे. दोघांची पक्षाच्या कार्यकारिणीत वर्णी लागली आहे.

केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यानंतर ‘चला मुलांना पुढे आणू’ या सूत्रावर आता अर्थराज्यमंत्री डॉ. भागवत कराड यांनी काम सुरू केले. शहर कार्यकारिणीमध्ये डॉ. हर्षवर्धन कराड आणि बहीण उज्वला डोईफोडे यांना अनुक्रमे सरचिटणीस आणि उपाध्यक्ष ही पदे देण्यात आली आहेत. केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांचे चिरंजीव संतोष दानवे हे भोकरदन मतदारसंघाचे आमदार आहेत. तसेच माजी मंत्री व आमदार बबनराव लोणीकर यांचे चिरंजीव राहुल लोणीकर हे भारतीय जनता युवा मोर्चाचे प्रदेश अध्यक्ष आहेत. ‘सारे काही घरात हवे’ असे राजकीय चित्र भाजपमध्येही दिसू लागले आहे.

ajit pawar sharad pawar (3)
“…तेव्हा शरद पवार म्हणालेले अजितला राजकारण करू द्या, मी शेती करतो”, उपमुख्यमंत्र्यांनी सांगितला १९८९ मधला प्रसंग
dekhi cabinet minister raajkumar anand
‘आप’ला धक्का! ईडीच्या छाप्यानंतर केजरीवाल सरकारमधील दलित मंत्र्याचा राजीनामा, कोण आहेत राज कुमार आनंद?
Beed Lok Sabha
बीडमधील प्रचाराला ‘राज’कन्या विरुद्ध ‘शेतकरी पुत्र’ लढतीचा रंग
Why Are the Rajput community angry at the statement of Union Minister Rupala
गुजरातमध्ये भाजपच्याच नेत्यामुळे भाजप अडचणीत? केंद्रीय मंत्री रुपाला यांच्या विधानावर रजपूत समाज संतप्त का?

हेही वाचा – “मुख्यमंत्रीपद मला सोडत नाही, ते सोडेल असेही वाटत नाही!”; गेहलोत यांची पायलटांसह केंद्रीय नेतृत्वाला चपराक

काँग्रेसच्या ‘घराणेशाही’वर कडाडून टीका होत असताना आता जिल्हापातळीवर भाजप नेते आपापल्या मुलांना पुढे आणण्यासाठी प्रयत्न करत आहेत. नांदेडमधून खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांची मुलगी प्रगती यादेखील भारतीय जनता महिला मोर्चामध्ये कार्यरत होत्या. आता त्या प्रदेश कार्यकारिणी सदस्य म्हणून काम करत आहेत. भाजपच्या मंत्र्यांनी आपापल्या मुलांना पुढे आणण्यासाठी खासे प्रयत्न सुरू केले आहेत.

हेही वाचा – राजस्थान : काँग्रेसमधील अंतर्गत मतभेदामुळे उमेदवारांची पहिली यादी जाहीर होण्यास उशीर?

भाजपपूर्वी सत्तेतील शिवसेना नेत्यांनीही हे सूत्र पद्धतशीरपणे अवलंबले आहे. रोजगार हमीमंत्री संदीपान भुमरे यांनी त्यांचा मुलगा विलास यांना आतापासून रिंगणात उतरविले आहे. १७ सप्टेंबर रोजी घेण्यात आलेल्या मंत्रिमंडळ बैठकीच्या स्वागत फलकांवर आपल्या मुलांचे फलक अधिक लागायला हवेत, असे त्यांनी प्रयत्न केले. त्यांच्या पावलावर पाऊल टाकत आमदार प्रदीप जैस्वाल यांनीही त्यांचा मुलगा ऋषिकेश जैस्वाल यांना पुढे आणण्याचे प्रयत्न केले. आमदार संजय शिरसाट यांनी त्यांच्या मुलाला महापालिकेच्या राजकारणात स्थिर करण्याचा प्रयत्न केला. आपापल्या मुलांना आणि नातेवाईकांना पुढे आणण्यात आता डॉ. कराड यांनीही पुढाकार घेतला आहे. गेल्या काही वर्षांपासून डॉ. कराड हे छत्रपती संभाजीनगर लोकसभा मतदारसंघातून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्न करत आहेत.