गुजरातमधील जुनागडमध्ये प्रक्षोभक भाषण देऊन प्रसिद्धीच्या झोतात आलेले मुंबईचे मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांना वर्षभर तुरुंगात राहावे लागू शकते. इस्लामिक धर्मगुरू मुफ्ती सलमान अझहरी यांना अहमदाबादमध्ये केलेल्या कथित प्रक्षोभक भाषणांशी संबंधित प्रकरणांमध्ये जामीन मंजूर करण्यात आला होता, परंतु गुरुवारी रात्री वडोदरा पोलिसांनी सामाजिक विरोधी हालचाली प्रतिबंधक कायदा (PASA) लागू केल्यानंतर त्यांना अटक केली. तुरुंगाबाहेर त्यांचे अनेक समर्थक जमा झाले होते, त्यामुळे त्यांना कडक सुरक्षा उपायांमध्ये वडोदरा मध्यवर्ती कारागृहात नेण्यात आले.

यापूर्वी ते मुंबईतील घाटकोपरमधील पंके शाह बाबा दर्ग्यात इमाम होते

इजिप्तमधील कैरो येथील अल अझहर विद्यापीठात शिकलेले अझहरी इस्लामच्या सुन्नी बरेलवी शाळेचे विद्यार्थी आहेत. सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरील त्यांच्या बायोनुसार त्यांची लोकप्रियता वाढण्यापूर्वी ते मुंबईतील घाटकोपर येथील पंके शाह बाबा दर्ग्यात इमाम होते आणि देशभरातील मुस्लिम समुदायाने त्यांना आमंत्रित केले होते.

Hajj pilgrims, app, devotees,
हज यात्रेकरूंच्या समस्या निवारणासाठी ॲपची निर्मिती; नव्या उपक्रमाने भाविकांना दिलासा
Sushil Kumar Modi passes away
सुशील कुमार मोदी यांचे निधन; जाणून घ्या त्यांचा राजकीय प्रवास
चिप चरित्र: सरकारदरबारी अमेरिकी चिप उद्याोग!
Who is Shantigiri Maharaj Why is his candidature in Nashik becoming troublesome for Mahayutti
शांतिगिरी महाराज कोण? त्यांची नाशिकमधील उमेदवारी महायुतीसाठी डोकेदुखी का ठरतेय?
parveen shaikh
मुंबईतील मुख्याध्यापिकेकडून हमासचं समर्थन, शाळा प्रशासनाने बडतर्फ केल्यानंतर म्हणाल्या, “राजकीय हेतूने…”
Nagpur, Smartphones, parents,
‘पाल्यांच्या कोवळ्या मनातील सुप्त प्रश्नांची उत्तरे पालकांनीच शोधावी’
bikes become expensive due to high tax says rajiv bajaj
जास्त करामुळे दुचाकी महागल्या! राजीव बजाज यांची टीका; नियामक चौकटीकडेही बोट
Naima Khatoon, Vice-Chancellor,
शंभर वर्षं… आणि नईमा खातून यांची कुलगुरूपदी निवड

हेही वाचाः अखिलेश यादवांचा अखेर ‘भारत जोडो न्याय यात्रे’त सहभाग, काँग्रेसकडून शक्तिप्रदर्शनाचा प्रयत्न; उत्तर प्रदेशात ‘इंडिया आघाडी’ला यश मिळणार?

पीआर टीम त्यांच्या प्रवचनांचे व्हिडीओ पोस्ट करीत असते

सोशल मीडियामुळे अझहरी विशेषतः तरुणांमध्ये खूप लोकप्रिय आहे. त्यांचे हजारो फॉलोअर्स आहेत. त्यांची भाषणे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. यानंतर त्यांची ऑनलाइन उपस्थिती चांगलीच वाढली आहे. त्यांची जनसंपर्क टीम देशभरात त्याच्या धार्मिक प्रवचनांचे व्हिडीओ सतत पोस्ट करीत असते.

हेही वाचाः सदाभाऊ खोत यांचे शिंदे गटाला आव्हान, हातकणंगलेवर दावा

फेब्रुवारीच्या सुरुवातीला गुजरात पोलिसांनी त्यांना पहिल्यांदा पकडले होते

इस्लामिक धर्मगुरू मौलाना मुफ्ती सलमान अझहरी यांच्या अटकेनंतरही त्यांची टीम नियमितपणे त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर त्यांच्यावरील विविध खटल्यांच्या स्थितीबद्दल अपडेट्स पोस्ट करीत आहे. फेसबुकवर त्यांचे ९२ हजारांपेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत, तर इन्स्टाग्रामवर त्यांचे ७.८३ लाख फॉलोअर्स आहेत. ३१ जानेवारी रोजी जुनागढमध्ये कथित द्वेषपूर्ण भाषण केल्याप्रकरणी अझहरीला गुजरात पोलिसांनी ५ फेब्रुवारी रोजी मुंबईतून अटक केली होती. यानंतर ३१ जानेवारी रोजी कच्छ जिल्ह्यातील समखियारी गावात भडकाऊ भाषण केल्याप्रकरणी कच्छ पूर्व पोलिसांनी त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आणि ८ फेब्रुवारीला त्यांना अटक केली. त्यांना अटक करण्यासाठी गुजरात पोलीस मुंबईतील घाटकोपर पोलीस ठाण्यात आले असता जवळपास तीन हजार लोकांचा जमाव पोलीस ठाण्याच्या बाहेर जमला होता. जमाव पांगवण्यासाठी मुंबई पोलिसांना लाठीचार्ज करावा लागला आणि त्यानंतरच गुजरात पोलिसांना सलमान अझहरीला घेऊन जाण्याचा मार्ग मोकळा करावा लागला. गुजरात पोलिसांनी नंतर त्यांच्याविरुद्ध तिसरा गुन्हा दाखल केला, ज्यात आयपीसी कलम १५३ (बी)(समाजांमध्ये धार्मिकतेतून फूट पाडणे), ५०५(२) (सार्वजनिकरीत्या प्रक्षोभक विधानं करणे) समावेश आहे.

…म्हणून गुजरात पोलिसांनी त्यांनी अटक केली

पोलिसांनी अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती (अत्याचार प्रतिबंध) कायद्यांतर्गत समाजातील इतर जातींविरोधात अपमानास्पद टिप्पणी केल्याबद्दल त्यांच्या विरोधात गुन्हा लागू केला आहे. अझहरी यांना यापूर्वी दोन गुन्ह्यांमध्ये जामीन मिळाला होता. मात्र, जामीन मिळाल्यानंतर ते बाहेर जात असताना वडोदरा पोलिसांनी त्याच्याविरुद्ध PASA लागू केला, त्यानंतर त्यांना पुन्हा अटक करण्यात आली आणि सध्या ते तुरुंगात आहेत. असदुद्दीन ओवैसी यांच्या नेतृत्वाखालील एआयएमआयएमच्या मुंबई युनिटचे नेते वारिस पठाण म्हणाले की, त्यांचे वकील अझहरीच्या टीमला या प्रकरणात योग्य प्रक्रिया पार पाडण्यासाठी मदत करीत आहेत. काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या उज्मा शाकीर यांनासुद्धा शनिवारी हैदराबादमध्ये पोलिसांनी ताब्यात घेतले. अझहरी यांच्यावर लावण्यात आलेला PASA रद्द करण्याच्या मागणीसाठी त्या प्रदेश भाजप कार्यालयासमोर धरणे धरत बसल्या होत्या.