खंडाळा घाटात दुतर्फा आठ किलोमीटरच्या रांगा
पुणे- मुंबई द्रुतगती मार्गावरील अपघातांचे सत्र सुरूच असून, रविवारी खंडाळा बाह्य़वळणाजवळ तीव्र वळण व उतारावर मुंबईच्या दिशेने जाणारा सिमेंटचा टँकर रस्त्याच्या मधोमध दुभाजकावर उलटल्याने मुंबई व पुणे या दोन्ही माíगका बंद झाल्या होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास हा अपघात झाला. दोन्ही माíगका बंद झाल्याने दुतर्फा जवळपास आठ ते दहा किमी अंतरापयर्ंत वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.
महामार्ग पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, लोणावळा व खंडाळा परिसरात आज पावसाच्या हलक्या सरी सुरु होत्या. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास मुंबईच्या दिशेने निघालेला सिमेंटचा टँकर चालकाचा गाडीवरील ताबा सुटल्याने दोन्ही माíगकांच्यामध्ये दुभाजकावर उलटल्याने पुणे व मुंबई या माíगका बंद झाल्या होत्या. टँकर दोन क्रेनच्या साहाय्याने तो काहीसा बाजूला घेत सात वाजण्याच्या सुमारास मुंबईकडे जाणारी वाहतूक सुरु करण्यात आली. अपघातग्रस्त टँकर पुण्याच्या माíगकेवर तिसऱ्या लेनवर घेऊन एक लेन साडेसातच्या सुमारास सुरु करण्यात आली. दरम्यान, तब्बल अडीच तास वाहतूक बंद राहिल्याने वाहनांच्या रांगा जवळपास आडोशी बोगद्याच्या मागे गेल्या. या मार्गाने प्रवास करणारे अनेक प्रवासी रस्त्यात अडकून पडले होते. या प्रकाराबाबत तीव्र संताप व्यक्त करण्यात आला. या मार्गावरील वाहतूक रात्री उशिराने पूर्वपदावर येऊ शकली.